दुनिया गोल आहे...
"आ रहा हैं क्या इंटरव्ह्यू लेने? टेलिफोनिक हैं." त्याने मीटींग रुमचा दरवाजा उघडताना मला विचारलं. तो मला साडे चार पाच वर्षांनी सिनियर. त्याची माझी ओळख फक्त एक दिवसाची. अगदी कालचीच.
मी त्याला हो म्हटलं.
साहेबांनी उमेदवाराला कॉल केला. समोरचा पठठया पोचलेला निघाला.
"इटस थ्री ट्वेंटी. आय हॅड आस्कड युअर एचार टू शेज्युल माय इंटरव्ह्यू एनीटाईम बीफोर थ्री. नाऊ आय अॅम इन ओडीसी. आय कान्ट गो अहेड विथ धिस इंटरव्ह्यू.". समोरच्या पठठयाने त्याची वेळ न पाळल्यामुळे आम्हाला निकालात काढले होते.
मिसळपाव