Skip to main content

प्रकटन

एक सिगारेट पिणारी मुलगी

लेखक तुमचा अभिषेक यांनी रविवार, 28/04/2013 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज ती दिसली.. जवळपास तीन-साडेतीन वर्षांनी.. ट्रेनमध्ये, जरा दूरच्याच सीटवर बसलेली.. मला ती दिसत होती, म्हणजे ती देखील मला बघू शकत असणार.. बस्स, अजून तिचे लक्ष गेले नव्हते माझ्याकडे.. पण गेले तरी ओळखेल का..? का, नाही ओळखणार..? मी नाही का ओळखले तिला..? तसा फारसा बदल ही झाला नव्हता तिच्यात.. माझ्यात तरी कुठे फारसा झाला होता.. बस्स, बर्‍याच काही घडामोडी घडल्या होत्या आयुष्यात.. या गेल्या तीन-साडेतीन वर्षांत.. वाशीवरून वी.टी.ला जाणारी ट्रेन पकडली. बायकोबरोबर तिच्या माहेरहून परतत होतो. रविवारची संध्याकाळ अन फर्स्टक्लासचा डब्बा. गर्दी नेहमीपेक्षा तशी कमीच.

सरकारी नोकरी २

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 25/04/2013 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
१९९० साली मी विक्रांत मध्ये प्रमुख वैद्यकीय अधिकारी होतो.(मी एकटाच होतो) जहाजात साधारण पणे डॉक्टर हा कल्याण कारी(WELFARE) अधिकारी म्हणून सुद्धा काम करतो कारण त्याची बढती हि वार्षिक अहवाला वर नसते. जहाजाचे स्वास्थ्य विषयक काम हे त्याच्या अखत्यारीत येते यात सर्व स्वयंपाकी वाढपी (COOKS AND STEWARDS) यांची दर महिन्याला तपासणी करणे, स्वयमपाकघर, जेवणघर इ गोष्टीची तपासणी करणे. कीटक, उंदीर इत्यादीपासून प्रतिबंध ठेवणे हे सर्व येते तसेच सर्व सैनिक आणी अधिकारी यांची वार्षिक स्वास्थ्य/वैद्यकीय तपासणी बढतीपूर्व वैद्यकीय तपासणी हे सुद्धा येते त्यामुळे डॉक्टरला बरेच अधिकार आणी शक्ती असते.

सरकारी नोकरी

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 25/04/2013 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या पहिल्या अर्थमंत्र्यांनी आय ए एस अकॅडमी मध्ये केलेल्या भाषणात तिथल्या होऊ घातलेल्या सचिव अधिकार्यांना असे म्हटले होते कि आता तुम्ही जगातल्या सर्वात सुरक्षित अशा नोकरीत शिरत आहात जेथे तुम्ही जरी खून केलात तरी शिक्षा म्हणून फक्त बदली होते. आणी बर्याच वेळा तीसुद्धा बढती च्या पदावर. इतकी सुरक्षित नोकरी असल्यावर आपण त्याचा वापर जनहितासाठी केला पाहिजे. परंतु तीरुनेल्लाई नारायणन शेषन या भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या लेखनातील एक वाक्य आठवत आहे.

महाराज

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 25/04/2013 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
श्री निसर्गदत्त महाराज या औलीयाची तुम्हाला ओळख व्हावी म्हणून हा लेख. एक अत्यंत सामान्य माणूस सुद्धा सिद्ध होऊ शकतो याचा दाखला म्हणजे महाराज. आपल्याला त्यांच्या जीवनात डोकावण्याच कारण नाही. ते सामन्याहून सामान्य होते, त्यांची शैक्षणिक, आर्थिक किंवा कौटुंबिक स्थिती फारशी आशादायक नव्हती इतकी माहिती पुरेशी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते मराठी होते. त्यांनी स्वतः तपासलेलं आणि त्यांच्या सिद्धत्वाची अपूर्व झलक दाखवणारं एकमेव पुस्तक म्हणजे 'सुखसंवाद'.

मामाचं गाव (इसावअज्जा)

लेखक दशानन यांनी मंगळवार, 23/04/2013 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
"राज्या, परिक्षेत किती मार्क पडले रे." मे महिन्याच्या सुटीसाठी बस स्टॅन्डवरुन अजून घरात पाऊल न ठेवलेल्या आपल्या एकुलत्या एक भाच्याला उंबरठ्यावरच प्रश्न विचारणारा मामा आठवला की या मामा लोकांनी माझे लहानपण कसे वाया घालावले याबद्दल दोन-चार आश्रु मी गाळून घेतो. दिड-दोन फुटी आपला भाचा वर्षभर मास्तर व बाईचा मार खाऊन खाऊन वैतागलेला, अभ्यास कर हे एकच पालूपद वर्षभर ज्याच्या मानगुटीवर भुतासारखे बसलेले, तिमाही, सहामाही, वार्षिक च्या सोबत असंख्य तोंडी परीक्षेतून पार पडून थोडा निवांत झालेला असतो तर लगेच घरात टूम निघते..

अंड्याचे फंडे ६ - शॉपिंग मॉल

लेखक साळसकर यांनी रविवार, 21/04/2013 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
अंड्याने तिसर्‍यांदा पलटून पाहिले. अन खात्री केली की ती पुतळाबाईच आहे. फसलोच जरा, पण अंड्याची फसायची ही काही पहिलीच वेळ नव्हती. बरेचदा असे होते ना, मोठमोठ्या मॉलमध्ये फिरताना, कृत्रिम चेहर्‍यांच्या गर्दीमध्ये, एखादा टवटवीत चेहरा उठून दिसावा. आपला चेहरा हरखून यावा, पण निरखून पाहता तो कपड्यांचे प्रदर्शन मांडण्याकरता उभारलेला मानवी पुतळा निघावा.

धोबी घाट सबकी धुलाई|

लेखक कापूसकोन्ड्या यांनी शनिवार, 20/04/2013 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
धोबी घाट न्युज लाँड्री-न्युज चॅनेलच्या जंगलात सफर करताना त्यावर चाललेल्या चर्चा हा मनोरंजनाचा भाग समजावा.

अबोलीच्या निमीत्ताने...

लेखक नीलकांत यांनी शुक्रवार, 19/04/2013 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, अबोली नावाचा नवा विभाग मिपावर सुरू करायचे ठरले. पाडव्याला याची घोषणा झाली. आता एवढ्यात हा विभाग सुरू होईल. अपेक्षेप्रमाणे मिपावर याबाबतीत उलटसुलट चर्चा सुरू झाली. मिपावर काही एक नवीन होतंय तर त्यावर मिपाकरांच्या प्रतिक्रिया अपेक्षीत आहेत. काहींना हा विभाग आवडला तर काहींना अजिबात नाही आवडला. काहींनी आपला संबंधच नाही त्यामुळे कोरड्या शुभकामना दिल्यात तर काहींनी विभाग कधी सुरू होतो अशी चौकशीसुध्दा केली. मात्र काही लोकांच्या प्रतिक्रिया जरा मर्यादा सोडलेल्या वाटल्या त्याचे वाईट वाटले. आता त्याचे कारण काय? याच्या खोलात जायला नको. मात्र तरीही काही विचार या निमीत्ताने मांडायचे आहेत.

बोल एनिथिंग बट अ नो बॉल ...

लेखक चौकटराजा यांनी रविवार, 14/04/2013 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
कालच दि. १३ एप्रिल २०१३ रोजी आय पी एल मधे बंगलोर व चेन्नई संघात टी २० चा सामना झाला. The game is not finished unless the last ball is bowled.या क्रिकेट मधील कुठेही लिखित न झालेल्या नियमाचा प्रत्यय आला. शेवटच्या चेडूवर २ धावा जिकण्यासाठी चेन्नईला हव्या होत्या.आर पी सिंग ने रवींद्र जडेजाला चेडू टाकला .त्याने तो थर्ड मॅनच्या दिशेने उंचावून मारला. थर्ड मॅनला असलेल्याने तो झेलला. झाले. बंगलोरच्या खेळाडूनी हवेत उंच उड्या मारून सेलेबब्रेशन करायला सुरूवात देखील केली. छोट्या पडद्यावर नवेच द्ष्य दिसू लागले. इकडे पिवळा ड्रेस वाले चेनाईकर ही आनंदाने मैदानाकडे अर्थात विजयी मुदद्रेने धाव घेउ लागले.

पुरुष विभाग - धागा क्र. १ - सेक्सी स्टबल आणि गर्लफ्रेंड/बायकोच्या तक्रारी

लेखक राजेश घासकडवी यांनी शनिवार, 13/04/2013 22:09 या दिवशी प्रकाशित केले.
पुरुषांचे काही खास प्रश्न असतात. त्यांच्या जिव्हाळ्याचे काही विषय असतात. बहुतकरून स्त्रियांना त्यांच्यात रस असतोच असं नाही. आणि काही विषय तर स्त्रियांना लागूच होत नाही. त्यामुळे अशा विषयांवर स्त्रियांचे प्रतिसाद कितपत ग्राह्य धरावे हा प्रश्नच पडतो. तरी पुरुष आयडींनी मनमोकळेपणाने प्रतिसाद द्यावेत ही विनंती. आता तुम्ही म्हणाल, की असं काय आहे जे पुरुषांना असतं आणि स्त्रियांना नसतं? उत्तर सोपं आहे - दाढी. किंबहुना एका प्रसिद्ध मनोवैज्ञानिक सिद्धांतानुसार अनेक तरुणींना बीअर्ड एन्व्ही निर्माण होते त्यामुळे ती कमतरता झाकण्यासाठी त्या पुरुषांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात.