Skip to main content

प्रकटन

कोकणस्थ सिनेमाची थोडक्यात गोष्ट...

लेखक भडकमकर मास्तर यांनी मंगळवार, 07/05/2013 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
गोखले नावाचा बॅंकेतला एक अधिकारी असतो. तो स्वेच्छानिवृत्ती स्वीकारतो. त्याच्या निरोपसमारंभात त्याचे गुणवर्णन चालू आहे. त्याच्या हाताखालचा अधिकारी साहेबांनी आम्हाला अमुक शिकवलं, ढमुक शिकवलं , साहेब मोठ्ठे गुणी, " एड्युकेटेड लॉ अबायडिंग पीस लविंग सोशली स्टेबल नो नॉनसेन्स "हे सगळं दीड मिन्टाच्या भाषणात जाणवेल असं.. वेळ असला तर प्रत्येक गुण दर्शवणारे ब्यांकेतले प्रसंग.. प्रेक्षकांत त्याची बायको. ती शाळेत अर्थातच शिक्षिका असते. " एड्युकेटेड लॉ अबायडिंग पीस लविंग सोशली स्टेबल नो नॉनसेन्स " असतेच कारण तीही कोकणस्थ. वेळ असला तर प्रत्येक गुण दर्शवणारे तिच्या शाळेतले प्रसंग...

अंधेरी ते वसई..एक छोटेखानी प्रकटन.. :)

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 07/05/2013 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
काही स्थानकं आणि काही आठवणी.. आज जरा अंधेरी ते वसई हा पश्चिम रेल्वेचा पट्टा आला डोळ्यासमोर.. अंधेरीची माधुरी दीक्षित..योगीनगर, अंधेरी पूर्व. अगदी योगीनगरच्या गणेशोत्सव मंडळातला माधुरीचा नाचदेखील आम्ही प्रचंड गर्दीत जाऊन पाहिला.. पुढे ती एकदा अंधेरीच्या विजयनगरीतल्या नेहमी चट्टेरेपट्टेरी हाफ प्यँन्ट घालून सा-या विजयनगरीत वावरणा-या गोखल्यांकडे आली होती. सौ गोखले आणि माधुरीची आई म्हणे काहीतरी चुलत की मावस बहिणी-बहिणी.. पुढे माधुरी जाम फेमस झाली आणि मग तिचं गोखल्यांकडे येणंही बंद झालं.. गोखले वारले तेव्हा फक्त ५ मिनिटं कारमधून येऊन चटईवर निजलेल्या गोखल्यांना बघून गेली म्हणे.. माधुरी ६८ सालची.

अंड्याचे फंडे ७ - खादाडी

लेखक साळसकर यांनी मंगळवार, 07/05/2013 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
नाक्यावरच्या भटकंतीची ठरलेली वेळ, संध्याकाळच्याच आसपासची. तोच रस्ता, तीच दुकाने, आजूबाजुला भटकणारी तीच ती माणसं. पण आज संध्याकाळी मात्र एका मुलीला पाणीपुरी खाताना बघत होतो. तुम्ही तर रोजच बघत असाल नाही, पण राव ऐका तर पुढे. भैय्याने पाणीपुरी वाटपासाठी एक प्लेट तिच्या हातात धरताच तिने त्याच्याकडून एक चमचा मागून घेतला. आता त्या पाणीपुरीच्या गाडी कम स्टॉलवर "विठ्ठल शिंदे पाणीपुरीवाला, आमची कुठेही शाखा नाही" असे शुद्ध मराठीत लिहिले असले तरी विठठल भाऊंनी पाणीपुरीवाटप करायला हाताखाली एक भैय्याच ठेवला होता. कारण आपल्याकडे भैय्याचा हात लागल्याशिवाय पाणीपुरीतला खारटपणा जाणवत नाही ना..

थोडे मर्मबंधातील ...

लेखक ढालगज भवानी यांनी सोमवार, 06/05/2013 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
खरं तर थोडा बायकी विषयच. मध्यम वयाची माझी व्याख्या ही की असे वय जेव्हा पहील्यांदाच आपली आई, आपल्याला उमजू लागली आहे आणि मुलगी जी की इतका काळ अतिशय सन्निध होती ती पौगंडावस्थेत प्रवेश करती झाल्याने दुरावू लागली आहे, असे वय. आईला लहानपणी "आई" म्हणून आणि फक्त "आई" म्हणून पाहीलेले असते. बालपणी, "आईला अन्य व्यक्तीमत्वच नाही, रोल नाही" हा चश्मा डोळ्यांवरुन न काढता आल्याने असंख्य वेळा तिला समजून घेता आलेले नसते , जे की आता समजून घेता येते.

विक्रांत वरील आयुष्य २

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 05/05/2013 01:08 या दिवशी प्रकाशित केले.
विक्रांत ( किंवा कोणतीही विमानवाहू नौका) हे एक चालते बोलते शहरच असते. विक्रांत वर बेकरी होती आइस क्रीम तयार करता येत असे. तेथे तीन बेडरूम घरा एवढे कोल्ड स्टोअरेज होते. डॉक्टर म्हणून तुम्हाला तेथे प्रत्येक गोष्टीचे आरोग्यदायी वातावरण ठेवण्याच्या दृष्टीने पर्यवेक्षण फेरी(sanitary round)महिन्यात एकदा करावी लागत असे.यात स्वयंपाक घर जेवणाचा हॉल पासून अन्न आणि शिधा ठेवण्याच्या जागा सुद्धा तपासल्या जात असत.

हो, मीच ती... एक सिगारेट पिणारी मुलगी..!

लेखक तुमचा अभिषेक यांनी शनिवार, 04/05/2013 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
----------------------------------------------------------------------------- एक सिगारेट पिणारी मुलगी - http://misalpav.com/node/24641 ----------------------------------------------------------------------------- हो, मीच ती... एक सिगारेट पिणारी मुलगी..! आज तो दिसला, तब्बल तीन साडेतीन वर्षांनी .. ट्रेनमध्ये बसला होता.. एका मुलीबरोबर... मुलगी.?? अंह, गळ्यात लायसन झुलत होते तिच्या. सौभाग्याच्या ईतर ही सतरा खुणा, त्याची ताई किंवा वहिनी तर नसावी.. छे.. मग असे खेटून बसले नसते, ते ही ट्रेन बर्‍यापैकी खाली असताना.

लहानपण देगा देवा....

लेखक किसन शिंदे यांनी शुक्रवार, 03/05/2013 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
बालपणीचा काळ सुखाचा असं म्हणतात ते अगदीच काही खोटं नाही. आणि या काळात सर्वात जास्त सुख मिळतं ते मे महिन्यातल्या किंवा दिवाळीतल्या सुट्टीत गावी गेल्यावर! त्यातल्या त्यात दिवाळीपेक्षा मे महिन्यात मिळणारी लांबलचक सुट्टी मिळाली म्हणजे आनंदाला उधान यायचं फार!! याचं कारण म्हणजे बहुतेक सगळी नातेवाईक मंडळी त्यांच्या कच्च्याबच्च्यांसह या काळात गावी आवर्जून यायची. वार्षिक परीक्षा संपलेली असायची आणि डोक्यावरचं एक मोठ्ठं ओझं आणि मनावचं एक अनामिक दडपण शतपटीने उतरलेलं असायचं.

विक्रांत वरील आयुष्य

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 01/05/2013 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
एका विमान वाहू नौकेवरील आयुष्य कसे असते त्यावरील हा चक्शुर्वैसत्यम अनुभव विक्रांत हि १९६१ च्या डिसेम्बर मध्ये भारतीय नौदलात दाखल झाली. तेंव्हापासून ती समुद्रात उभी असल्यामुळे गंज लागणे हा भाग नित्याचा असतो. त्यामुळे काहीही केले नाही तरी त्याचा गंज लागलेला भाग साफ करणे आणि त्याला पुन्हा रंग लावणे हा नित्य देखरेखीच भाग होता. त्यावर साधारण पणे ८००-८५० नौसैनिक आणि ७० ते ८० अधिकारी कामावर हजर असत आणि जेंव्हा समुद्रावर जात असू तेंव्हा त्या ५० अधिकारी आणि २०० सैनिक गोव्याच्या नौदल तळावरून येत असत यात वैमानिक अभियंते आणि तंत्रज्ञ असत. हे सर्व लोक विमानाची पूर्ण दुरुस्ती जहाजावरच करू शकत असत.

अथातो धर्मजिज्ञासा - महावीराची वर्धमान अहिंसा

लेखक राजघराणं यांनी सोमवार, 29/04/2013 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
अथातो धर्मजिज्ञासा - महावीराची वर्धमान अहिंसा ********************************************************************************* अथातो धर्मजिज्ञासा - महावीराची वर्धमान अहिंसा ********************************************************************************* संदर्भ : १) आकलन (नरहर कुरुंदकर ). २) भारतीय तत्वज्ञान (श्रीनिवास दीक्षित ) जैन आणि बौद्ध हे वैदिक नसलेले भारतीय धर्म आहेत . त्यांची परंपरा म्हणजे श्रमण परंपरा . या परंपरेत अहिंसेचे स्थान फार मोठे आहे. हि अहिंसा पुढे सर्वच भारतीयांनी निदान तत्व म्हणुन तरी मान्य केली आहे .

मामाचं गाव (इसावअज्जा) - भाग-२

लेखक दशानन यांनी रविवार, 28/04/2013 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
त्यांनी मला पोहायला शिकवले, त्यांनी मला निर्धास्तपणे पाण्याशी खेळणे शिकवले मग ते पाणी, विहरीचे असो, वाहत्या ओढ्याचे किंवा तुडुंब भरलेल्या कृष्णेचे!
भाग -१ इसावअज्जा मला शेतात घेऊन जेव्हा जात असे तेव्हा खरी मज्जा येत असे. मी विचारलेल्या एक आणि एक प्रश्नाला खरी-खोटी जशी समजतील तशी इसावअज्जा उत्तर देत असे. मग पेरु हिरवाच का? प्रश्नाचे उत्तर पानांचा रंग लागतो ना म्हणून हिरवा. विहीर गोल का?