Skip to main content

प्रकटन

नात्यातले लुकडे जाडे

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 03/09/2015 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वजनाने मोठा असतो त्याचेकडून सतत डाएटिंगची आणि जास्त कामाची अपेक्षा केली जाते. केवळ वजनाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व खाण्यापिण्याला आणि आरामाला मुरड घालावी लागते. पण हाच जाड्या असलेला व्यक्ती जेव्हा लुकड्याला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र लुकडा जर त्याचे ऎकत नसेल आणि जाड्याला योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल.

इतर भारतीय भाषांमधुन मराठीत अनुवादीत पुस्तके सुचवा.

लेखक जेपी यांनी गुरुवार, 03/09/2015 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, या धाग्यावर इतर भारतीय भाषांमधुन मराठीत अनुवादित पुस्तके सुचवावी ही विनंती. भारतीय लेखकांची इंग्रजीतुन मराठीत अनुवादित पुस्तकेही चालतील. धन्यवाद. प्रतिसादातुन भर टाकेन.

मिपावर ट्रॉल वाढत आहेत

लेखक इस्पिक राजा यांनी गुरुवार, 03/09/2015 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मिपावरील ट्रोलांची संख्या बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या मिपावर वेगाने ट्रोलांची संख्या वाढते आहे. मिपा सारख्या संस्थळावर जिथे चांगल्या लेखकांना मखरात सजवले जाते, तिथे अशा प्रकारचे ट्रोल बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का की आज आपल्याला जेन्युइन आयडी दुरापास्त होत आहेत. ज्यांनी मिपाला उत्तमोत्तम प्रतिसादांनी सजवले, आपला वेळ देउन मोठे केले तेच आज (असल्या टोळांमुळे) मिपापासुन दूर गेलेले पाहून मन दु:खी होते. सामान्य वाचक अशी आशा करतात की चांगले लेखक उत्तमोत्तम लेख देत राहतील.

वांझ

लेखक यमन यांनी बुधवार, 02/09/2015 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
ही कथा मी " श श क " स्पर्धेसाठी लिहायला घेतली होती . शब्दसंख्या अंदाज न आल्यानी अंमळ गंडली होती. पण आता कुठले शब्द उडवू तेच समजेनासं झालंय. वांझ सूर्य झाडाच्या पायाशी पेटायचा आणि कमरेशी विझायचा ;रोज ;रोज ;गेली कित्येक वर्ष . त्याचं झाडाला कसलं अप्रूप असणार ? स्वतःचा अपूर्ण ;शुष्क ; जमिनीत खोलवर रुजलेला संसार घेऊन झाड जगत होतं . जगण्यात कुठला सोहळा नाही ;मरणही येत नाही .अगदी एकटं . पानं ;फुलं ;फळं एवढंच काय पावसाळ्यातलं शेवाळ पण झाडावर बहिष्कार टाकून होतं . गर्भारिणी ; पहिलट करणी झाडाची वाट शक्यतो टाळायच्या .

असा सांगतात पत्ता...

लेखक माधुरी विनायक यांनी सोमवार, 31/08/2015 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट तशी जुनी. मुंबईत चर्चगेट भागातल्या प्रतिष्ठा भवन या इमारतीमध्ये माझं काही काम होतं. पत्ते, रस्ते लक्षात ठेवणं, हा माझा प्रांत नव्हे. म्हणजे लग्नापूर्वी नवं घर घेतल्यानंतर आणि लग्नानंतर सुरूवातीच्या काळात त्या घरी जातानाही मी दोन-तीन वेळा रस्ता चुकून भलतीकडे पोहोचल्याचं आठवतंय. तर... मला प्रतिष्ठा भवनात काही काम होतं. चर्चगेट भागातल्या कार्यालयात होते मी. तिथले आमचे वरीष्ठ नुकतेच नागपूरहून बदली होऊन आले होते. त्यांनी तिथवर पोहोचायचे दोन-तीन मार्ग मला उत्साहाने सांगितले. पत्ते समजून घेताना माझा घोळ होतो, असं त्यांना सांगितलं आणि मला समजेल अशा सोप्या प्रकारे पत्ता सांगा, अशी विनंती केली.

व्यथा

लेखक भिंगरी यांनी सोमवार, 31/08/2015 07:21 या दिवशी प्रकाशित केले.
आजच चेपूवर हे वाचले आणि मन सुन्न झाले. एक असे ठिकाण आहे, जिथे तरुणींना, अल्पवयीन मुलींना जबरदस्ताने ढकलले जाते. ते ठिकाण गावोगावची वेश्यालय. मात्र याच परिसरात जन्म घेणार्‍या आणि तिथेच लहानाच्या मोठ्या झालेल्या मुलींना लहानपणापासूनच या गोष्टी शिकवल्या जातात. तिथल्या मुलांचे कोमेजलेले विश्व कसे असते? पश्चिम बंगालच्या कोलकाताच्या सोनागाछी परिसरात एक डॉक्युमेंट्री चित्रित झाली होती. (तिला त्या वर्षीचे ऑस्करदेखील मिळाले होते.) हा परिसर वेश्यालयासाठी ओळखला जातो. अशा परिसराला 'बदनाम गली' असे सामान्य भाषेत म्हटले जाते.

अजब महाभारत

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 29/08/2015 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, सध्या मिपावर महाभारताविषयी पुन्हा एकदा चर्चा घडून येत आहे. मी गेल्या दोन-तीन वर्षात महाभारतावर जे (सचित्र) लेख लिहिले, त्यांचे दुवे (विशेषतः मिपाच्या नवीन सदस्यांसाठी) देतो आहे. 'अजब महाभारत' हे शीर्षक माझ्या लेखात मांडल्या गेलेल्या आगळ्या-वेगळ्या दृष्टीकोनाला अनुलक्षून दिले आहे. वाचा आणि सांगा तुम्हाला काय वाटले ते. १. कुणी घडवून आणले 'महाभारत'? (महाभारत भाग १) २. मत्स्यगंधेची प्रतिज्ञा ( महाभारत भाग २) ३.

कुछ ना कहो...<3 ;)

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 28/08/2015 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
बाप्पा जेमतेम पंधरवड्यावर येउन ठेपलेले आहेत. त्यामुळे सद्ध्या साफसफाई, आवराआवरीमधे संध्याकाळ आणि जमेल तेवढा वेळ निघुन जातोय. घर आवरायला एवढा वेळ लागतो का वगैरे छापाचे प्रश्ण विचारु नये. आमच्याकडे घर आवरणे हा कार्यक्रम घर शिफ्ट करणे ह्याच्याएवढाचं किंबहुना त्याहुन मोठा असतो. माळ्यावरच्या फक्त गणपतीमधे/ दिवाळीमधे वगैरे लागणार्‍या वस्तु काढत असताना आमच्या मातोश्रींच्या नजरांना उंची पुरत नसली तरी त्या तिकडच्या मागच्या कोपर्‍यामधल्या पोत्यामधली कढई आणि त्यामधे ठेवलेली पंचामृताची पंचपळी किंवा तांब्याची मोठी ताम्हनं बरोबर दिसलेली असतात.

महाभारताचे जीवन सार: (भाग २)

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 26/08/2015 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
अर्धसत्य आणि सत्याचे प्रकटीकरण: आपणांस माहिती असेल की महाभारतातील युद्धात कौरवांच्या बाजूने लढत असलेल्या द्रोणाचार्यांचे धैर्य खच्चीकरण करण्यासाठी आणि त्यांनी शस्त्र त्यागण्यासाठी त्यांचा मुलगा अश्वत्थामा युद्धात मारला गेला असे त्यांना खोटे सांगण्यासाठी कृष्णाने सत्यवादी युधिष्ठिराला त्यांचेकडे पाठवले. पण युधिष्ठिर मोठा सत्यवादी. त्याचेकडून खोटे बोलणे शक्य नव्हते. मग अश्वत्थामा नावाचा एक हत्ती भीमाने मारला आणि मग युधिष्ठिरानं द्रोणाला सांगितलं, "हो अश्वत्थामा मेला" आणि मग हळूच त्यांना ऎकू येणार नाही असे बोलला," पण तो हत्ती होता" द्रोणांनी शस्त्रं त्यागली.

लोणीभक्ती आणि पराठे

लेखक डॉन व्हिटो कॉर्लिऑन यांनी मंगळवार, 25/08/2015 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा पेर्णास्त्रोतः मातृभक्ती आणि मराठे या देहाची लोणीभक्ती, लोणीप्रेम वादातीत आहे. लोणी देवो चवः, लोणी देवो सवः, पराठे देवो भवः असे म्हणतानाच पराठ्याबरोबरच्या लोण्याच्या चवीचे महत्त्व सुभाषितकाराने सांगीतलेलं आहे. लोण्याचा सुवर्णकाळ, शतके ज्यांनी लोकांच्या पोटावर राज्य केलं असे 'अमुल' त्यांची ती अमुलकन्या सुरभी, आपल्या पराठ्यावर चापुन लोणी लावत असे. लोणीप्रेमावतंस पराठापती *** पराठावाले. ह्यांच्या बालपणापासुनचं प्रत्येक पराठ्यांवर त्यांच्या पाकसम्राज्ञी आईसाहेबांचा प्रभाव आढळतो.