गुलजार!
महान कवी, गीतकार गुलजार यांचा १८ ऑगस्ट हा वाढदिवस! गुलजार यांच्या प्रतिभेबद्दल आणि शब्दप्रभूत्त्वाबद्दल मी काय लिहिणार? पण त्यांच्याबद्दल आधी धागा येऊन गेला की कसे याबद्दल माहिती नाही. म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या गीतांबद्दल, त्यांच्या काही आठवणी प्रतिसादांमधूनही वाचायला मिळतील म्हणून हा धागा काढत आहे.
खरे तर माझ्या बालपणातली बरीच वर्षे मी फक्त त्याच काळातली गाणी ऐकणे, पाठ करणे यातच रमले होते. आईबाबांना जुन्या गाण्यांची आवड असली तरी ठराविकच गाणी ऐकण्यात आली. केबल तर आमच्याकडे नव्हतीच, रेडिओही फार काही चालू नसायचा.
मिसळपाव