Skip to main content

प्रकटन

अजय-अतुल लाईव्ह वगैरे...!

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 18/10/2016 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच अजिंठा महोत्सवात सुप्रसिद्ध गायक-संगीतकार जोडी, अजय-अतुल यांच्या लाईव्ह कार्यक्रमात गाणे सुरु असताना मधेच ट्रॅक बंद झाल्याने गाणे थांबले आणि ही जोडी फक्त ओठ हलवत गाण्याचा अभिनय करत असल्याचे प्रेक्षकांना पहायला मिळाले. प्रेक्षकांना हा धक्का होताच, पण मोठ्ठ्या रकमेचे तिकीट घेऊन असे झाल्याने फसवणुकीची भावना झाली, आणि बरेच प्रेक्षक उठून गेले असे बातम्यांवरून समजते.

परीकथा - भाग बारा - फेसबूक स्टेटस २.५ - २.७ वर्षे

लेखक तुमचा अभिषेक यांनी मंगळवार, 18/10/2016 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
५ सप्टेंबर २०१६ पॉडर लगाना कोई बच्चोंका खेल नही है ! आंघोळ घालण्याचे काम बाथरूमपर्यंतच माझ्या हद्दीत येते. पण आज सारे गणपतीच्या नैवेद्याच्या तयारीत व्यस्त असल्याने अंग पुसून पावडर लावायचे कामही माझ्याकडेच लागले. टॉवेल खेचत अंग तिने स्वत:च पुसून घेतले, त्यामुळे हे एक त्रासदायक काम वाचले. अन्यथा तिच्या इच्छेविरुद्ध अंग पुसणे एक दिव्य असते. त्यानंतर पावडर कशी, कुठे, आणि किती लावायची याच्या सूचना मी तिच्या मम्मीकडून घेईस्तोवर ईथे ही पावडरचा डब्बा घेऊन सुरूही झाली होती. मानेला पावडर स्वत:च लावून झाली होती.

छंदांतून अर्थार्जन अथवा आवडीचे व्यवसायात रूपांतर

लेखक तेजस आठवले यांनी रविवार, 16/10/2016 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, बऱ्याच जणांना काही छंद असतात, किंवा वैयक्तिक आवडीनिवडी असतात ज्याचे रूपांतर व्यवसायात केले जाऊ शकते अथवा केलेले असते. अशा लोकांच्या वाटचालीची माहिती मिळवण्यासाठी हा धागा काढतो आहे. मला वैयक्तिकरित्या अश्या लोकांचे कौतुक वाटते. आपल्या पैकी काही लोक जर असे व्यवसाय/ अर्थार्जन करत असतील तर जरूर माहिती द्यावी. अर्थार्जन हा मुख्य हेतू नसलेल्या पण कामाचे समाधान देण्याऱ्या व्यवसायाबद्दल पण माहिती आली तर उत्तमच ,प्रत्येक वेळेला पैसे हा घटक महत्वाचा असेलच असे नाही.

पाच रुपयांचा फंडा

लेखक सस्नेह यांनी शुक्रवार, 14/10/2016 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
पिंग पिंनिंग ..पिंग पिनिंग ... मोबाईलात सहाचा गजर झाला. धडपडत उठून ब्रश केलं, तोंड धुतलं आणि फ्रीज उघडल. दुध कालच संपलेलं. पन्नासची नोट आणि कॅरी बॅग घेऊन दुधवाल्याकडे गेले. दुधाचे दुकान कॉलनीच्या त्या टोकाला. लीटरचा पाउच घेतला आणि पन्नासची नोट त्याच्या हातावर टिकवली ‘छे रुपया छुट्टा देव भाबी.’ ‘सुबे सुबे कैसा छुट्टा ? अब्बी तो निकली.’ ‘तो चार रुपयेका क्या दू बोलो.’ ‘कुच्च नको मेरेको..’ ‘तो ठैरो अब्बी दुसरा गिराक आये तब लेना.’ घरात पडलेली सकाळची कामं आठवत तिथेच उभी राहिले. पाच सात मिनिटांनी चार रुपये हातात पडले. पळत सुटले. ‘एक कोल्हापूर.’ मी पन्नासची नोट कंडक्टरच्या हातात ठेवली.

काटा वजनाचा --६

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 13/10/2016 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
काटा वजनाचा -१ काटा वजनाचा -२ काटा वजनाचा -३ काटा वजनाचा --४ काटा वजनाचा --५ अति खाण्याचे सामाजिक मानसशास्त्र-- आता हे आणिक काय ? अशी कल्पना करून पहा आपण आपले वजन कमी करण्याचा सु(दृढ) निश्चय केलेला आहे आणि नेमका त्यात आपल्या मित्रांबरोबर मेजवानीचा बेत ठरला आहे. आपण निश्चय केला आहे आहे कि उगाच तेथे अरबट चरबट खायचे नाही.

शिवरायांचा कालचा दसरा

लेखक भटकंती अनलिमिटेड यांनी बुधवार, 12/10/2016 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
भर उत्तररात्री थोरल्या वाड्याला जाग आली होती. शिरकाई मंदिरातून देवीच्या नामाचा गजर शरदाच्या थंड वार्‍यावर ऐकू येत होता, डफ-संबळाचा आवाज घुमत होता. तिथे गेले नऊ दिवस देवीचा जागर चालू होता. शारदीय नवरात्रीचे दिवस. दशमीचा चांदवा

जप

लेखक निनाद यांनी मंगळवार, 11/10/2016 05:15 या दिवशी प्रकाशित केले.
इशारा: सदर लेख धार्मिक लिखाण या प्रकारात येऊ शकतो. ज्यांना या लिखाणाची अ‍ॅलर्जी असेल त्यांनी येथेच थांबावे, पुढे वाचू नये. तसेच या लेखात प्राचीन भारतीय विचारांची भलामणही आहे. ज्यांना याचा त्रास होतो त्यांनीही त्यांनी येथेच थांबावे, पुढे वाचू नये. या लेखातील दावे काही जणांना वैज्ञानिक स्वरूपाचे वगैरे वाटू शकतील. तर ते दावे तसे नसतीलच अथवा असतीलच असेही नाही. इशारा संपला! --- हा लेख येथे का? पैसा ताईंनी प्राचीन भारतीय वेद पुराणे विज्ञान हा कायप्पा समुह काढताना सांगितले होते की तेथे काही चांगली चर्चा झाली तर ती येथे ही यावी.

आकर्षणाचे नियम

लेखक उपयोजक यांनी सोमवार, 10/10/2016 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
Law of attraction अर्थात आकर्षणाचा नियम याविषयावरचा whatsapp समुह सुरु करत आहोत. आकर्षणाचा नियम याबद्दल बर्याच जणांनी वाचलं असेल,"सिक्रेट" हे पुस्तक तसेच याच विषयावरचा चित्रपटही पाहिला असेल. तुम्ही सतत जो विचार कराल तसेच परिणाम तुम्हाला मिळतील.ही या नियमाची सुरुवात;पण फक्त सकारात्मक विचार करुन हवं तसं घडेल का? मग त्यासाठी काय करावं लागेल? काय करता येईल? ते सकारात्मक विचार फलद्रुप होण्यासाठी आणखी काय काय करावं लागतं? त्यासंबंधी चर्चा ,माहितीची देवाणघेवाण यासाठीच आहे हा समुह. हा आकर्षणाचा नियम आहे तरी काय? तो कसा वापरायचा? वापरताना होणार्या चुका कोणत्या?

गीतगुंजन - २२: बेबी, व्हेन यो'र गॉन...

लेखक प्रास यांनी गुरुवार, 06/10/2016 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
जगात प्रेमाच्या संदर्भात दोन मतप्रवाह आढळतात. पहिला म्हणजे स्वभाव जुळले पाहिजेत आणि दुसरा अपोझिट अट्रॅक्स. असंच काहीसं मैत्रीच्या बाबतीतही होतं आणि म्हणूनच कधी कधी संभ्रम होतो, ही निखळ मैत्री आहे की प्रेम? स्वभाव जुळले म्हणून किंवा स्वभाव विरुद्ध आहेत म्हणून वादविवादाचे प्रसंग टाळता येत नाहीत. किंबहुना ते तसे येतातच. मग सुरू होतो राग आणि अबोला यांचा सिलसिला! एकान्तात राहवत नाही आणि गर्दी भावत नाही. काऊन्टर करण्यासाठी नेमका विषय टाळून कुणाशी गप्पा, नाटक-सिनेमा-रेडीओ-पुस्तक यामध्ये मन गुंतवण्याचे प्रयत्न सुरू होतात. दिवस कशा ना कशा त-हेने पार पडतो पण मग रात्रं खायला उठते.

नवरात्र नऊ रंग , स्त्री-शक्ति आणि आम्ही ( मागे वळून पाहताना .....)

लेखक माझीही शॅम्पेन यांनी बुधवार, 05/10/2016 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
नवरात्र नऊ रंग , स्त्री-शक्ति आणि आम्ही ( मागे वळून पाहताना .....) माझा मूळ लेख आणि त्यावरील प्रतिक्रिया ह्यावर बराच गदारोळ झाला आणि शेवटी तो फक्त वाचन मात्र झाला..