Skip to main content

प्रकटन

मी आर्ची बोलत्येय.

लेखक आंबट चिंच यांनी गुरुवार, 28/07/2016 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
काय मस्त सकाळ उजाडलीये अजुनही झोपुन राहावसे वाटतंय , पण आईने तरीही उठवलेच. नाही तर शाळेला उशीर झाला असता. सगळं लवकर आटोपले तेवढ्यात शैला, शारदा आल्याच. मग डबा दफ्तरात टाकुन तशीच पळाले शाळेला. शाळेत जाता जाता वाटेत त्यांना काल आईकडे नागराजदादा आलेला सांगितले आणि कायतरी पिक्चर काढाणारे म्हणे तर मला काम करायला पाठवशील का हे विचारत होता. तशा "अय्या खरंच" दोघी एकदमच किंचाळल्या. "ए मग तु हिरोईन झलीस की आम्हाला नाही ना विसरणार? " आणि "हिरो कोण आहे ?" "काय नाव पिक्चरचं?" प्रश्नाचं मोहोळ माझ्या मागे लावले. अगं अजुन कशात काय नाही मलाच माहित नाही तर तुम्हाला काय सांगु.

बापाचा गुण

लेखक vcdatrange यांनी गुरुवार, 28/07/2016 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली आम्हा बापलेकीचं बरंच गुळपीठ जमलयं, एक तर, आम्ही तिघेही आपापल्या दिनक्रमात अडकल्यामुळे, पुरवठा कमी झाला की मागणी वाढते, या नियमाने असेल कदाचित. मग काल एक नविन फर्मान निघालं, इथुनपुढे घरातील सगळे निर्णय मतदानाने घ्यायचे. विषय होता, पुढच्या दाराला अजुन एक लोखंडी दरवाजा बसवण्याचा. पहिले प्रदीर्घ चर्चा, दरवाजा बसवण्याची आवश्यकता, उपलब्ध पर्याय आणी उपयुक्तता यावर. आम्ही राहतो तिसर्या मजल्यावर, इमारत जुनी असल्यानं लिफ्ट नाहीय.

आज मिपावर पहिल्यांदाच पोस्ट करत आहे .

लेखक nishapari यांनी मंगळवार, 26/07/2016 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार , मिसळपाव वर ही माझी पहिलीच पोस्ट आहे . तसं इथे खातं सुरु करून एक वर्ष तीन महिने झाले असले तरी सुरुवातीचं वर्ष मी इथे जवळजवळ कधीच फिरकले नव्हते . तेव्हा सगळा वेळ फेसबुकवर जायचा , तिथे सचिन परांजपे , स्मिता जोगळेकर , राज जैन , संजीव पालेकर , सर्जेराव जाधव , रुचिरा कुळकर्णी आणि अशा कितीतरी उत्तम लेखकांचं लिखाण वाचताना दिवस कधी सरायचा तेच समजायचं नाही . सकाळी ब्रश करायच्याही आधी , रात्री अंथरुणात पडून २- ३ वाजेपर्यंत आणि दिवसभरातले बरेच तास फेसबुकवरच जाऊ लागले जेव्हा आपण प्रचंड फेसबुक अॅडिक्ट झालो आहोत हा साक्षात्कार झाला आणि मनावर मोठ्ठा दगड ठेवून फेसबुक खातं डिलीट केलं . पण काहीतरी दर्जेदार वाचायची भूक स्वस्थ बसू देत नव्हती तेव्हा मिपाकडे वळणं झालं . साधारण गेल्या ३ महिन्यांपासून मी मिपावर सक्रिय आहे . इथे फेसबुकएवढा वेळ जात नाही आणि उत्कृष्ट पोस्ट्सही वाचायला मिळतात . इथल्या पोस्ट्स वाचत आहे . फक्त १० - १२ पोस्ट्सवर प्रतिसाद दिला आहे . इथल्या २-३ रेसिपीज ट्राय केल्या आहेत :) . स्वतःचं काही लिहिण्याएवढी प्रतिभा / उत्साह माझ्यात बहुधा नसावा , निदान सध्यातरी .

मी बी ढेकर देईन म्हणतो : हवाबाणी तडका

लेखक पगला गजोधर यांनी सोमवार, 25/07/2016 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
कधी चवीची, कधी अगदीच पांचट, लाल तर्रीची मिसळ कधीतरी ओर्पीन म्हणतो मी बी ढेकर देईन म्हणतो...!! मिसळीवर तवंगतर्री भेटली काय, न भेटली काय मिपाकार्याला रवंथ करायची उपजत सवयच हाय जिलबीतून पाकरस सुटला काय, न सुटला काय मिपाकार्याला तोबरे भरायाची सवयच हाय शेवटच्या तुकड्यापर्यंत मी बी दाबून खाईन म्हणतो...!! चयापचयाची काळजी सोडून देईन म्हणतो मी बी हाटेलामधीच चूळ भरीन म्हणतो...!! अपचनाचे प्रश्न सुटलेत काय, न सुटलेत काय या हावऱ्या मिपाकर्‍याले उपास-तापास लंघनाची अक्कलच नाय त्रिफळाचे चूर्ण हॉलमधीच घेईन म्हणतो सगळीकडून ढेकर देईन म्हणतो...!! टोपाच्या रिकम्या खडखडाटशी प्रतारणा करून वळसेवाली जि

पत्ता

लेखक टीपीके यांनी शनिवार, 23/07/2016 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
नाही, मी माझा पत्ता नाही सांगत आहे इकडे, त्या आणि ह्या धाग्याचा काहीच संबंध नाही तर आता मुख्य विषयाकडे , मला वाटत जेव्हा केव्हा मानवी संस्कृती निर्माण झाली , माणसाला एक ठिकाणाहून दुसरीकडे मुद्दामून जायची गरज निर्माण झाली, किंवा दुसऱ्याला पाठवायची/ बोलवायची गरज निर्माण झाली, तेव्हा पासून पत्ता या संकल्पनेची सुरवात झाली असेल. त्यातूनच एखाद्या मानवी वस्तीला गाव संबोधून त्याला नाव देणे, रस्त्याला नाव देणेही चालू झाले असेल. अर्थात पत्ता हि संकल्पना का निर्माण झाली याचा हा शोध निबंध नाही.

गणित प्रज्ञा आणि पेढे!

लेखक रुपी यांनी बुधवार, 20/07/2016 05:32 या दिवशी प्रकाशित केले.
"सारख्या तुझ्या मुलांच्या परीक्षा!" आजोबा आईकडे तक्रार करत होते. झालं असं होतं, की मेच्या पहिल्या आठवड्यात माझ्या मामेबहिणीचं लग्न होतं. आईच्या लग्नानंतर तिच्या माहेरी पहिलंच लग्न. ती सगळ्या भावंडांत लहान त्यामुळे सगळ्यांचीच लाडकी! त्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्या, साहजिकच तिने लग्नाच्या बरेच दिवस आधीपासून माहेरी यावे अशी आजी-आजोबांची इच्छा होती. पण माझ्या चौथीच्या स्कॉलरशीप परीक्षेचं कारण आलं. आईच्या माहेरी तेव्हा तरी असल्या(!) बाहेरच्या परीक्षेंचे कुणाला महत्त्व नव्हते - खरे तर फारसे अभ्यासाचेच महत्त्व नव्हते. आजोबांसाठी तर ते अगदीच फुटकळ कारण.

कम्युनिटी (समूह) रेडिओची ओळख

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 19/07/2016 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
कम्युनिटी (समूह) रेडिओची ओळख बालपणीच रेडिओशी संपर्क आला - रेडिओ हेच मनोरंजन आणि माहितीचे साधन असल्यामुळे खूप रेडिओ ऐकत असे. गाण्यांसाठी बिनाका गीतमाला अन विविध भारती, तर क्रिकेटवेडापायी सुशील दोशी यांचे धावते वर्णन वेळी अवेळी तासनतास ऐकले असेल. पुढे इलेक्ट्रॉनिक्स शिकतांना स्वतःचा इवलासा प्रक्षेपक तयार केला होता. पण फक्त प्रयोगच. गुरुजींनी तो प्रयोगाव्यतिरिक्त वापरणे बेकायदेशीर असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्याच्यातला उत्साह मावळला होता. पण रेडिओ नेहेमीच जवळचा सोबती राहिला. आजही दूरचित्रवाणीपेक्षा विविध भारती किंवा इंटरनेट रेडिओ जास्त ऐकतो.

ठाकरे सर ः एक ‘नारळी’ व्यक्तिमत्त्व

लेखक पी महेश००७ यांनी मंगळवार, 19/07/2016 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
धिप्पाड शरीरयष्टी, भेदक नजर... असं हे धडकी भर‍वणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे ठाकरे सर. ते कोणता विषय शिकवतात हे अद्याप मला कळलेलं नाही; पण पिंपळगाव बसवंतच्या के. के. वाघ कॉलेजमध्ये ते आम्हाला एनसीसीला होते एवढं मात्र ठामपणे सांगू शकतो. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर जाणवलं, की ते भयंकर वगैरे काही नव्हते. ते तर ‘नारळी व्यक्तिमत्त्व’ होतं! होय, नारळीच!! नारळ बाहेरून टणक असलं तरी आतून मात्र गोड असतं. तसंच काहीसं. एनसीसीतली एक छोटीशी आठवण आहे. एकदा माझी एनसीसीच्या कॅम्पसाठी निवड झाली नाही.

तस्मै श्रीगुरवे नमः

लेखक सतिश गावडे यांनी मंगळवार, 19/07/2016 02:28 या दिवशी प्रकाशित केले.
"माझे नाव सतिश वसंत गावडे. रायगड जिल्हा परिषद शाळा वडगांवकोंड" आपल्या बोलण्यात "अशुद्ध" शब्द येणार नाही याची काळजी घेत मी वर्गाला माझी ओळख करुन दिली. शाळेचा पहिला दिवस. गोरेगांवच्या ना. म. जोशी विद्याभवनचा इयत्ता पाचवी ब चा वर्ग. गोरेगांव तसं शहरवजा खेडेगांव. आजूबाजूच्या पंधरा-वीस खेडेगावांचे बाजार हाट करण्याचे ठिकाण. शाळा पुर्ण जिल्ह्यात नावाजलेली. अगदी माणगांव, महाड, म्हसळा आणि श्रीवर्धन या चार चार तालुक्यांच्या ठिकाणांहून मुलं ना. म. जोशीला शिकायला यायची. आजही येतात. असा शाळेचा नावलौकिक. आमचं गाव वडगांवकोंड गोरेगांवपासून तीन किमी अंतरावर. गावातील जिल्हा परिषदेची शाळा चौथीपर्यंतच.

<भग्न शरीरे>

लेखक अनुप ढेरे यांनी रविवार, 17/07/2016 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
गेले आठ दिवस श्रवंती शेखरला भेटायचा प्रयत्न करत होती. दर तासाला फोन करत होती पण साहेब काही फोन उचलत नव्हते. त्यांच्या सगळ्या कॉमन मित्र मैत्रीणीना फोन करून झाले होते पण कुणालाच कल्पना नव्हती काय झाले त्याची. सिक लिव्ह घेतलीये एवढंच कसंबस कळलं होत. एरवी कधीही असं न वागणाऱ्या शेखरला असं अचानक काय झालं हे तिला काही केल्या कळत नव्हतं. डॉकटरकडे जायचंय म्हणालेला. आता घरी जाऊन खात्री केल्याशिवाय चैन पडणार नाही असा विचार करून श्रवंती ऑफिसमधून बाहेर पडली. काकांनी दार उघडलं आणि त्यांना वाटलं कुणी सेल्समन आलिए की काय म्हणून त्यांनी "कसली औषधं विकायला आलायत?" असं विचारलं. "काका, एक मिनिट.