Skip to main content

प्रकटन

तू बोले तो बन जाऊं मैं, बुल्लेशा सौदाई

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 08/12/2016 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
सूफ़ीज़म एक अनोखा धर्म आहे. अस्तित्त्वाकडे काव्यात्मकतेनं पाहाण्याचा असा दृष्टीकोन दुर्लभ. आपण पुरुष आहोत आणि सर्व प्रकटजग स्त्री आहे. तस्मात, प्रसंग कोणताही असो, जगणं म्हणजे आपण आणि अस्तित्त्वात चाललेली, इष्काची जुगलबंदी आहे. मग प्रत्यक्षात ती, पत्नीशी झालेली ताटातूट असो, आर्थिक आपत्ती असो, शारीरिक दुर्घटना असो की कडेलोटाला नेणारी मानसिक दुरावस्था असो.... अस्तित्त्वानं, किंवा स्त्रीनं, ती आपल्याशी केलेली इष्कबाजी आहे. हा सूफ़ी जगण्याचा अंदाज़ आहे. सूफ़ीजमचा नज़रिया कळला तर इर्शाद क़ामिलचा हा कलाम, हृदयाला स्पर्शून गेल्याशिवाय राहाणार नाही.

गतं न शोच्यं ! !

लेखक जयन्त बा शिम्पि यांनी बुधवार, 07/12/2016 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या भारतात दोन परंपरा सुरु आहेत. त्याविषयी येथे लिहिण्याचा हा प्रयत्न.शासकिय उच्च पदावरील व्यक्ती, जेंव्हा मरण पावते, त्यावेळी राष्ट्रभर अथवा राज्यभर सात्/तीन्/एक दिवसाचा दुखवटा पाळला जाण्याची घोषणा केली जाते.शासकिय जाहिर केलेले कार्यक्रम रद्द केले जातात. मरण कोणालाही चुकलेले नाही, हे त्रिकालाबाधीत सत्य आहे, हे काही नवीन नाही. कोणतीही व्यक्ती, मग ती आपल्या घरातील असो, समाजातील असो वा उच्च पदावरील असो, दु:ख्ख तर होणारच." मरणांती वैराणी " असे आपल्या कडे म्हटले जाते. मरण पावल्यानंतर, त्या व्यक्तिशी असलेले वैर संपुष्टात येते, आलेच पाहिजे.

आव्हान जम्मू काश्मीरमधील छुप्या युद्धाचे पुस्तकाला पारितोषिक

लेखक नरेंद्र गोळे यांनी सोमवार, 05/12/2016 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या अनुवादाला,
"आव्हान जम्मू काश्मीरमधील छुप्या युद्धाचे" ह्या
ब्रिगेडिअर हेमंत महाजन लिखित पुस्तकाला,
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे,
’लोकहितवादी रा.ब.गोपाळ हरी देशमुख’ पारितोषिक देण्याचे ठरले आहे.

इष्ट जनांस आमंत्रण आहेच.

शेतकरी चळवळीचे भवितव्य आणि आव्हाने

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 04/12/2016 22:27 या दिवशी प्रकाशित केले.

शेतकरी चळवळीचे भवितव्य आणि आव्हाने

                 शरद जोशींच्या पश्चात शेतकरी चळवळीचे भवितव्य काय, असा प्रश्न माझ्यासहित अनेकांना सतावत आहे. शेतकरी चळवळ शरद जोशींनी एवढ्या उंचीवर नेऊन ठेवली की ती उंची पार करण्याचा विचार राहू द्या; त्या उंचीच्या आसपास पोचण्याचीही नेतृत्वक्षमता कुणात नाही, ही वास्तविकता नजरेआड करता येत नाही.

ड.. ड... डेलीसोप चा!

लेखक प्राजु यांनी रविवार, 04/12/2016 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेतून भारतात परत आल्याला आता ४ वर्ष पूर्ण झाली आहेत. इथे येतानाच मनाशी काही गोष्टी ठरवल्या होत्या. ज्या गोष्टी करून फक्त मराठी मंडळातून कौतुक होत होतं .. त्या गोष्टी प्रत्यक्ष मराठी भूमीत राहून करायच्या होत्या. ते म्हणजे लेखन. नावावर १ पुस्तक, २ ओडिओ अल्बम इतकच काय ते होतं! जेव्हा प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाली तेव्हा.. पटकथा लेखन कशाशी खातात हेही माहिती नव्हतं. अर्थात आत्ताही पूर्ण माहिती आहे असा दावा मी करत नाहीच. पण हळू हळू काम करत असताना , एक लक्षात आलं कथेचा गाभा प्रचंड भरीव असणं गरजेच आहे. आणि कथा बीज जर कमकुवत असेल तर पटकथा अतिशय बांधीव असणं फार महत्वाच असतं.

आमची (ही) शनिवार सकाळ ... किनारे किनारे दारिया ... कश्ती बांदो रे ….. (भाग २)

लेखक अमर विश्वास यांनी गुरुवार, 01/12/2016 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
आमची (ही) शनिवार सकाळ ... किनारे किनारे दारिया ... कश्ती बांदो रे ….. (भाग २) सीडीज आवरणे .. एकदम सोपे काम... शात्रीय संगीत एका बाजूला , नाट्यसंगीत वेगळे . पुलं , वपु, शंकर पाटील यांच्या साठी एक वेगळा कोपरा हिंदी गाणी खालच्या कप्प्यात.. त्यातही रफीसाहेबांसाठी वेगळा कोपरा. गझलस वेगळ्या बाजूला ... डोक्यात सगळं पक्क होत.. पटापट आवरू . दोन अडीचशे सीडीज आवरायला कितीसा वेळ लागतो ... ----------------------------------------------------------------------------------------२ धडाक्यात कामाला सुरवात केली. काही पत्ता चुकलेल्या सीडीजना योग्य पत्त्यावर पोचवले ...

पुरुषांचाही विनयभंग होतो!!!!!?

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी गुरुवार, 01/12/2016 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
२०१२ साली दिल्लीत झालेल्या निर्भयाच्या अमानुष बलात्काराच्या घटनेनंतर देश ढवळुण निघाला.स्त्री सुरक्षे विषयक कायदे कडक केले गेले.देशात स्त्रीयांना भोगायल्या लागणार्या छेडछाड ,विनयभंग ,बलात्कार इत्यादी प्रश्नावर मंथन झाले ,चालू आहे.स्त्री सुरक्षा आपली सर्वांची प्रार्थमिकता असायला हवी या बाबतीत दुमत नाहीच.पण पुरुषांच्याही काही लैंगिकतेच्या अनुषंगाने सामाजिक समस्या असु शकतात याविषयी मात्र ब्र देखिल उच्चारला गेला नाही.प्रत्येकवेळी पुरुषच शोषणकर्ता असतो असा एकांगी विचार मांडायला गेलो तर योग्य होणार नाही. बायकाही पुरुषांचे लैंगिक शोषण करतात /करु शकतात असे गृहीतक जर कुणी मांडले तर ते एकतर खोटे आहे अथ

मांसाहाराची लागलेली चटक कशी सोडवावी?????

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी बुधवार, 30/11/2016 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
तर मंडळी " दिसा माजी काहीतरी ते लिहावे,प्रसंगी अखंडीत वाचीत जावे" असे समर्थ रामदास स्वामींनी सांगुन ठेवले आहे .या उक्तीचा मी पाईक असल्याने रोज काहीतरी हितगुज आपल्याशी करावे असे वाटत राहाते.असो. तर आजचा विषय आहे नॉन व्हेज .आपल्या सर्वांचा आवडीचा विषय.उत्क्रांतीवादानुसार माणुस हा मिश्र आहारी आहे .तो शाकाहार आणि मांसाहार दोन्ही आवडीने करतो.त्याला मी कसा अपवाद असणार? जसे मला कळत आहे तेव्हापासुन मि मांसाहाराचा भोक्ता आहे.आम्ही भावंड लहान असताना आठवड्यातून एकदा आमच्या घरी मटण किंवा चिकन शिजायचे.लहाणपणी तिखट सहन होत नसल्याने मी अळणी खायचो.म्हणजे तिखट वजा.पण नळीसाठी मात्र माझा हट्ट असायचा.पुढे वडीलांन

आमची (ही) शनिवार सकाळ ... किनारे किनारे दारिया ... कश्ती बांदो रे ....

लेखक अमर विश्वास यांनी मंगळवार, 29/11/2016 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
आमची (ही) शनिवार सकाळ ... किनारे किनारे दारिया ... कश्ती बांदो रे .... शनिवार आणि रविवार हे आम्हा कष्टकरी लोकांच्या दृष्टीने खास दिवस . सोमवार ते शुक्रवार भरपुर कष्ट केल्यानंतर (पुण्यातील ट्रॅफिकमधुन वाट काढत ऑफिसला पोचणे हे मुख्य कष्ट .... ऑफिसमध्ये कामाचे वेगळे .. ) हे सुट्टीचे दोन दिवस म्हणजे जणू संजीवनीच .... तर अशाच एका शनिवार सकाळची ही कहाणी ---------------------------------------------------------------------------------------- शनिवार सकाळ ... जरा आरामातच उठलो. अर्थात मी सूर्यवंशी नाही (सेटमक्सवर सूर्यवंशम पहिल्यापासून हे मी फारच अभिमानाने सांगतो).

(फक्त) ऑफिस ला पर्याय...

लेखक चांदणे संदीप यांनी गुरुवार, 24/11/2016 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो ! कृपया मला कुणी (फक्त) ऑफिसला साजेसा पर्याय सांगेल का? अवतीभवती अशी बरीचशी माणसे आहेत ज्यांना तिथे काम करणे आवडत नाही आणि उपाशी राहणेही योग्य वाटत नाही. अशांसाठी काही पर्याय माहित असल्यास सुचवावे. धन्यवाद.