लेखकआशु जोगयांनी गुरुवार, 15/09/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळीवर वावरताना
आपल्या लक्षात येइल. मिसळीची एक स्वतःची भाषा आहे.
काही स्वतःचे शब्द आहेत. आपण त्याची यादी करुया
उदा...
मोठे व्हा
जिलब्यापाडू लिखाण
हलवाई
भंपक
आपल्याला आठवणार्या शब्दांची आपण भर घालावी
---
लेखकचित्रगुप्तयांनी शनिवार, 10/09/2011 या दिवशी प्रकाशित केले.
....... तसे या लेखाचे पूर्ण शीर्षक - "गॅलिलिओचा बाप, चित्रकला, संमोहनशास्त्र, संगीत, गवंडीकाम, होमियोपाथी, ज्योतिषविद्या, न्यूटन, ताजमहाल आणि (ब्रम्हचर्यव्रताचरणमुक्तेच्छुंसाठी उपयुक्त -) एक वजनदार धागा" असे आहे. ... गोंधळलात ?
अहो,या सर्व गोष्टींमध्ये एक समान धागा आहे, तोही एक वजनदार धागा.
हे वाड्मयचौर्य नाही, फारतर कल्पना आणि शब्द उधारीवर आणले आहेत. कुठून? करा थोडं खोदकाम.
सर्वच छोट्या मोठ्या शहरखेड्यांत हजाम अस्तित्वात आहेत. वेळोवेळी नवीन हजाम आपापली दुकानेदेखील उघडतात. (त्यातल्या काहींचा हजामपणाचा धंदा बसला. काहींनी वयोपरत्वे राजीनामा दिला. काहींनी तर पुन्हापुन्हा राजीनामा दिलेला आहे. तर काही दीर्घ मुदतीच्या रजेवर आहेत. काही हजामांच्या मते आपण त्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. शिल्लक असलेल्या) सर्वच हजामांना बिनपाण्याने सफाई करण्याची इच्छा असते.
लेखकविसोबा खेचरयांनी सोमवार, 22/08/2011 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय अण्णा,
सर्वप्रथम तुमच्याबद्दल अत्यंत आदर व्यक्त करतो. तुमचं स्वच्छ चारित्र्य, तुमची साधी राहणी, तुमची सात्त्विकता, तुमच्यातली सादगी, तुमच्यातली निरागसता, तुमचं सेवाव्रत या सर्वांना माझा सलाम. अगदी मनापासून. अण्णा, खूप भावता तुम्ही मला..
आता काही मुद्दे -
१) काही दिसांपूर्वी तुम्ही आणि तुमची टीम असं म्हणत होतात की सरकारनं त्यांच्या लोकपालपदासोबत तुमचंही जनलोकपाल बील संसेदेपुढे किमान सादर तरी करावं; मग संसद त्यावर जो निर्णय घेईल तो तुम्हाला मान्य असेल.
लेखकडॉ.श्रीराम दिवटेयांनी शुक्रवार, 12/08/2011 या दिवशी प्रकाशित केले.
जलेबीबाई...
आम्ही स्वप्नातून दचकून उठलो आणि क्षणात बरळलो— “आम्ही जिलब्या पाडतो, तुम्ही भजी सोडा...”
तसं जिलब्या पाडणं फार काही मोठं काम नाहीये बरं का. अगदी सोप्पंय... बेसन हटायचं, एकजीव करायचं, कढईतलं तूप उकळू लागलं की कॉटनच्या जाडसर फडक्यात पिठाचा गोळा भरून घेऊन मधोमध किंचित छिद्र पाडून मोठ्या नजाकतीने वेटोळे काढले की झालं. त्या जिलेब्यांना डालडा चांगला आतपर्यंत पिऊ द्यायचा. झाऱ्या कडेला ठेऊन त्या लालबुंद होईतोवर तळायच्या. मग व्यवस्थित निथळून घेतल्या की एकतारी पाकात डुबू द्यायच्या. त्यांनी पाक यथोचित शोषला की झाली खाण्यायोग्य जिलेबी तय्यार!
तर अशी ही जिलेब्यांची पाककृती.
लेखकडॉ.श्रीराम दिवटेयांनी मंगळवार, 09/08/2011 या दिवशी प्रकाशित केले.
नटांच्या सिक्स पॅकअॅब्जचे प्रदर्शन असू द्या किंवा नट्यांच्या पुष्ट उरोजांचे अर्धावृत्त दर्शन आजच्या चित्रपटातील हा मसाला भलताच चटकदार बनविला जातोय. याची चटक डोळ्यांना अशी लागते की कुठून कुठून लौल्यस्राव सुरु होतील याचा नेम नाही. सेन्सार मंडळच नेमके आतपर्यंत कोरडे ठणठणीत पडलेय की काय याची शंका येते. अशा उत्तान दृश्याला ते कात्री लावण्याच्या भानगडीत पडत नाहीत की त्यांच्या अनेक भानगडींतून त्यांना वेळ मिळत नाही याचा शोध घ्यावा लागेल. आजच्या चित्रपटसृष्टीला अश्लीलतेचे एवढे मोठे खग्रास ग्रहण लागलेय की ते सुटता सुटण्याची शक्यता मावळलीय.
लेखकगंगाधर मुटेयांनी शुक्रवार, 22/07/2011 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १
"येत्या २४ तासात विदर्भ, मराठवाडा आणि प. महाराष्ट्रासह कुठेकुठे मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून त्यापुढील ३६ तासात हवामानामध्ये फ़ारसा बदल संभवत नाही" अशी उद्घोषणा आकाशवाणी किंवा दूरदर्शनवर झाली तरी पावसाचे दर्शन होईलच याची खात्री देता येत नाही. कधीकधी २४ अथवा ३६ तासच काय ४८ अथवा ७२ तास उलटून जातात पण आकाशात कापसाच्या बोंडाएवढाही तुकडा दुर्बिनीने शोधूनही नजरेस पडत नाही.
लेखकचेतन सुभाष गुगळेयांनी बुधवार, 20/07/2011 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या व्यक्तिचे विचार, त्याचे महात्म्य जगाला कळतच नाही. सॊक्रेटीसला त्याच्याच समाजातील विद्वान ओळखू शकले नाहीत, ज्ञानेश्वर आदी भावंडांचे मोठेपण तर त्यांच्या जन्मगावातील लोकांनाच कळले नाही.