Skip to main content

.(नेत्रपटलावरील चित्रांवेगळे)

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 16/11/2011 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द म्हणजे चिह्न - जगाचं ज्ञान करून घेण्यासाठी वापरलं जाणारं. ते कधी पांढऱ्यावर काळ्या रेषा म्हणून येतं, तर हवेत उमटणाऱ्या ध्वनिलहरींतून जाणवतं. पण जग जाणण्यासाठी आपण केवळ शब्दच वापरत नाही. चित्रंही वापरतो. कोणीतरी म्हटलं आहे की एक चित्र हजारो शब्दांइतकं महत्त्वाचं असतं. आपण प्रत्येकच अशी चित्रं वापरतो. ती वारंवार आपल्या नेत्रपटलावर उमटत असतात. म्हणून मी यशवंत कुलकर्णी यांच्या लेखात 'शब्द' या शब्दाच्या जागी 'नेत्रपटलावरील चित्र' वापरून हा लेख लिहिलेला आहे. खरं तर त्यांचाच सल्ला वापरून मी त्यांचा लेख अधिक व्यापक केला आहे असं म्हणता येईल.

यु. जी. कृष्णमूर्ती : एक नाकारण्यायोग्य 'तत्त्वज्ञ'

लेखक प्रास यांनी बुधवार, 16/11/2011 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखनाची प्रेरणा यु. जी. कृष्णमूर्तींच्या (युजी) विचारांवर आधारीत उपरोल्लेखित लेखासंदर्भात एकूणच यशवंतराव कुलकर्णींच्या माझ्याबरोबर आणि इतरत्र प्रतिसादप्रपंचादरम्यान झालेल्या वक्तव्यांचा विचार करता त्यांनी लेखात मांडलेल्या मुद्द्यांच्या संदर्भात काही लेखन आवश्यक वाटलं.

शब्दावेगळे

लेखक यकु यांनी सोमवार, 14/11/2011 04:21 या दिवशी प्रकाशित केले.
यु. जी. कृष्‍णूर्तींचे साहित्य वाचताना त्यांच्या रूपांतरणोत्तर आयुष्‍यात घडलेल्या एका अगदीच सूक्ष्‍म पण अत्यंत महत्त्वाच्या फरकाचा उल्लेख येत रहातो. हा अगदीच छोटासा फरक 'युजी' हा माणूस आणि बाकीचे जग यांतला कळीचा मुद्दा आहे. कदाचित आध्‍यात्माच्या वाटेवर चालून ती वाट संपवलेल्या सर्वांच्यामधला व बाकी माणसांच्या मधला तो फरक असावा; इतरांचं मला जास्त माहित नाही, पण युजींनी मात्र सतत या फरकावर जोर दिला आहे. हा फरक म्हणजे शब्द आणि त्यातून निर्माण होणारी प्रतिमा! युजींच्या अंतर्पटलावर शब्दांतून कसलीही प्रतिमा निर्माण होऊ शकत नाही.

सुखी संसाराची सोपि वाटचाल

लेखक किचेन यांनी रविवार, 06/11/2011 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
समोर २५ वर्षांची मुलगी बघितल्यावर बरेचदा चेहेर्यावर अविश्वासच दिसायचा! हिच्याकडून जमणार आहे का आपली मुलाच /मुळीच लग्न? मुळात हि आपल्या मुलापेक्षा वयाने लहान, हिला कितीस कळणार आहे? हाच अविश्वास माझा आत्मविश्वास बनला.समोर आलेल्या अनेकांनी माझ्याकडे नोदणी करायचं टळल, पण एकदा का त्यांच्या मुलाला अनुरूप मुली मिळवून दिल्या कि मग आपोआप नोंदणी करायचे आणि दुसर्या पालाकानाही घेऊन यायचे.मला कधी कधी गम्मत वाट्याची.पहिल्या भेटीत आणि आत्ताच्या भेटीत किती फरक झालाय या माणसात!जशी जशी लग्न ठरत गेली तसा तसा आत्मविश्वास आणखीन वाढला.माझ्यातही बराच बदल होता !

फ्रॅक्चरवरचे धनगराचे आयुर्वेदिक औषध :

लेखक JAGOMOHANPYARE यांनी शनिवार, 05/11/2011 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
फ्रॅक्चरवरचे धनगराचे आयुर्वेदिक औषध : यावर्षीच्या २०११ मधील एप्रिलमधील गुढी पाडव्याला आमचा 'पाडवा' झाला. म्हणजे मला अ‍ॅक्सिडेंट झाला आणि पाय मोडला. :) डाव्या पायातील पटेला ( गुढग्याची वाटी) , टिबिया, फिब्युला, ( लेग बोन्स) आणि तळपायामधील एक लहान हाड एवढे सगळे मोडले. त्यानंतर ऑपरेशन झाले. प्लेट, मोळे, तारा.. काय काय बसवले. मग हळूहळू वॉकर, काठी घेऊन आणि आता तसेच चालायला लागलो. गेल्या आठवड्यात सहज नरसोबावाडीला गेलो. तिथे अन्नछत्रात प्रसादाला जात होतो. स्टँडवरुन उतरून अन्नछत्राकडे जात होतो. मी थोडा लंगडत जात होतो. अचानक एक माणूस माझ्याजवळ आला आणि म्हणाला, लंगडताय का? पाय फ्रॅक्चर झाला आहे का?

'दारु पिण्या'तला भ्रष्टाचार

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 02/11/2011 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
'सामना'च्या 2011 दिवाळी अंकात प्रकाशित झालेला लेख. अंकात जागेच्या उपलब्धतेनुसार काही मजकूर गाळला गेला आहे. येथे दिलेला लेख पूर्ण आहे. -------------------------------------------------------------------------------------------------------------------- नुकताच एका मित्राच्या आग्रहामुळे आपल्या सर्वांच्या लाडक्या, अण्णांच्या, भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात भाग घ्यायला जे. एम. रोड वर गेलो होतो. नुसतंच घोषणाबाजी करायला बरं का, हे उपोषण वगैरे माझ्या कुपोषित तब्येतीला मानवत नाही. तर तिथे एक घोषणा ऐकली ‘एक दोन तीन चार, बंद करा हा भ्रष्टाचार’. ही घोषणा ऐकली आणि हसून हसून मुरकुंडी वळली.

सुगरण..

लेखक गवि यांनी सोमवार, 31/10/2011 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
दोनतीन हॉटेलं वाईट निघाल्यामुळे आता पुढचं किमान बरं निघावं अशी इच्छा होती. लाऊंज, बिस्त्रो, फाईन डाईन, कॅफे अशा टाईपच्या हॉटेलिंगमधून ब्रेक घेऊन एखाद्या झणझणीत आणि खानावळवजा ठिकाणावर धाड टाकायची ठरवली. कुठेतरी ऐकलेल्याच्या आठवणीवरून पुण्यात पेरुगेट पोलीस चौकीजवळ असलेलं सुगरण गाठायचं ठरवलं आणि गल्ल्या शोधत तिथे पोहोचलोसुद्धा.. एका गाळ्याएवढा एंट्रन्स दिसत होता. माझ्यासारख्या प्रशस्त माणसाला बसायलातरी पुरेशी रुंदी असलेली जागा आत असेल का असं वाटत वाटत आत शिरलो. वरती बोर्ड लावला होता त्यावर "सुगरन्स कोल्हापुरी नॉनव्हेज" असं लिहिलं होतं.

प्रसारमाध्यमांचा बेजबाबदारपणा..

लेखक श्रीरंग यांनी रविवार, 23/10/2011 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
काल पुणे मिरर पान क्र.२ वरील बातमी वाचली आणी तळपायाची आग मस्तकात गेली. काही महिन्यांपूर्वी हिंजवडी येथे एका महिलेवर सामूहिक बलात्कार करणार्या तीघांना जन्मठेप झाल्याच्या बातमीबरोबरील फोटो पाहून कोणत्याही सामान्य माणसाला चीड आल्याशिवाय राहणार नाही. शिक्षा झालेला गुन्हेगार एखाद्या ऑलिंपिक विजेत्याच्या थाटात हात उंचावून, जमलेल्यांना निगरगट्टपणे अभिवादन करत होता. मुळात, बलात्कारासारखा नीच गुन्हा करून एका स्त्रीच्या व तिच्या संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्याची राखरांगोळी करणार्या हरामखोरांना अतिशय निर्घ्रुण शिक्षेची तरतूद असायला हवी.

शिवसेना दसरा मेळावा २०११, ६ ऑक्टोबर

लेखक कौन्तेय यांनी मंगळवार, 11/10/2011 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
६ ऑक्टोबर २०११ला आयुक्ष्यात पहिलयांदा सेनेच्या दसरा मेळाव्याला शिवाजीपार्कावर हजेरी लावली. तीही बायकोसोबत. बाळासाहेबांची जादू नेमकी काय ते याचि देही याचि डोळां बघणं आवश्यक होतं. माध्यमांवर यांबाबतीत अवलंबून रहाता येतच नाही. पाहिलं तर खरंच, दुसऱ्या दिवशी ‘अण्णा हजाऱ्यांबद्दल ठाकरे असं असं म्हणाले' अशी एक खोडसाळ बातमी पेपरवाल्यांनी सर्व-संगनमताने दिलेलीच होती. मग एका दिवसासाठी व्यवस्थित ठाकरे-हजारे कुस्ती रंगली. वास्तविक अण्णांना अवमानकारक असं काहीही बाळासाहेब बोललेलेच नव्हते. मैदानावरचा प्रत्यक्षदर्शी म्हणून हे मी खात्रीपूर्वक सांगतो. आणखी हेही की बाळासाहेब ठाकरे ही एक जादू आहे.