पैशाचे झाड- भाग ४
लेखनविषय:
- Read more about पैशाचे झाड- भाग ४
- 8 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
भाग १. https://www.misalpav.com/node/51032
भाग २ https://www.misalpav.com/node/51038
भाग ३ https://www.misalpav.com/node/51041
विनितची तब्येत हळूहळू सुधरायला लागली होती. तोडकं मोडकं का होईना समोरच्याला कळेल असे तो बोलायला लागला होता, शरीराची पण थोडीफार हालचाल करायला लागला होता. विनितला आलेल्या अॅटॅक नंतर नेहमीच्या मैफिलींमधे जरा खंड पडलाच होता. बर्याच महिन्यांनी अचानक एके दिवशी नित्याने प्लॅन बनवला. त्याच्याच घरी पार्टी ठेवली होती. बरेच दिवस झाल्याने सगळेच एकमेकांना भेटायला आतुर होते. वेळात वेळ काढून सगळेच जमले.