Skip to main content

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 17/04/2015 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन. (काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच) तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र. आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो. १. नवर्‍याला आवडणार्‍या गोष्टी करा.

मदतकेंद्र: सल्ला , मार्गदर्शन, साहाय्य, समुपदेशन

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 27/02/2015 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लग्नाला १० वर्षे झालीत मला दोन मुले आहेत माझे मि खूप दारू पितात घरात सारखे तणाव राहतात मि ग्राम प कामाला आहे मि शाळे वर कामाला जाते पार्लर टाकले पण चालत नाही ते घरात आम्हाला पैसे देत नाहीत आई वडील काही म्हणत नाहीत माझे सासरे देखील दारू पितात गांजा पितात पता खेड तात तसेच मासाहार करतात पै कमी पडले कि बहिण आई त्या दोघांना देते .कृपया मला मदत करा त्यावर उपाय सागा सेवा काय करू कि वाद होणार नाहीत माझ्या जवळ पैसे येतील . -सौ स. श. रा.

एस. एस. सी., सी. बी. एस. ई, आय. सी. एस. ई.

लेखक वारा यांनी सोमवार, 12/01/2015 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
पिल्लु ला शाळेत अ‍ॅड्मिशन घेतोय. पण सध्या असलेल्या बर्याच ऑप्शन मधे कन्फ्युज झालोय. १) एस. एस. सी - ट्रेडीशनल अभ्यासक्रम, स्वतः शिकल्यामुळे पुर्ण माहीती आहे. फायदे - ट्युशन आहेत , पुस्तके महीतीतील, गाईड मिळतात, प्रश्नसंच मिळतात, मराठी मिडीयम फी कमी. तोटे - स्पर्धा परीक्षा साठी पुरेसा अभ्यासक्रम नाही, महाराष्ट्राबाहेर अभ्यासक्रम नाही, ईंग्लीश मिडीयम फी जास्त. अ‍ॅड्मीशन प्रोसेस लॉटरी पद्धतीने , कमी जागा विद्यार्थी जास्त. २) सी. बी. एस. ई - दिल्ली बोर्ड , माहीतीतील जवळपास कोणी नाही. फायदे - स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम , भारतभर सर्व मोठ्या शहरात शाळा.

मदत...Internship.!

लेखक उगा काहितरीच यांनी सोमवार, 05/01/2015 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, नुकतेच पुणे विद्यापिठातुन MCA(अभियांत्रीकी) या पद्व्युत्तर पदवीचे ५ सत्र पुर्ण केले. विद्यापिठाने सहाव्या सत्रासाठी विषय वगैरे न ठेवता पुर्ण वेळ Internship असा कार्यक्रम आखला आहे. यासाठी आम्हा विद्यार्थ्यांनी कंपनी मध्ये राहुन काम शिकणे वगैरे अपेक्षीत होते. यामध्ये विद्यार्थ्यांसोबत कंपन्यांचापण फायदा होता कारण त्यांना अल्प मानधनावर(stipend)किंवा फुकट काम करायला व्यक्ती मिळते.पण मागील २-३ वर्षापासुन लहानमोठ्या कंपन्या या संधीचा फायदा उठवुन विद्यार्थ्यांकडुन काम करुन घेता घेता training fees च्या नावाखाली ५००० ते ५०,००० रुपये उकळत आहेत.

माहिती हवी आहे - हिरे, माणिक, मोती, पोवळा

लेखक भास्कर केन्डे यांनी गुरुवार, 25/12/2014 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
मौल्यवान खडे, त्यांचे दागिन्यांतील महत्व वा वापर, त्यांची पारख, खरेदी, व इतिहास याच्या ज्ञानाविषयी आपला आनंदी आनंदच आहे. म्हटलं इथे काही मर्गदर्शन मिळाले तर मदत होईल. हिरे सोडले तर बाकीच्या खड्यांबद्दल अंतरजाळावर सुद्धा वाचण्याची काही सोय नाही कारण त्यांचे विंग्रजी नावे माहित नाहीत, आणि जर अंदाजाने काही शोधले तर नेमके तेच शोधत आहोत याचा भरोसा नाही.

“पडणे” एक कला

लेखक दशानन यांनी सोमवार, 15/12/2014 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
दुसरा कोणी पडला तर त्याच्याकडे पाहून फिदीफिदी हसण्याची आपल्याकडे वाईट सवय आहे. पण त्यांना पाडणाऱ्या व्यक्तीने घेतलेले कष्ट दिसत नसतात असे माझे स्पष्ट मत आहे म्हणून मी “पडणे” एक कला हा लेख लिहितो आहे. सतत पडण्याची माझी दीर्घकालीन वाटचाल आहे, मी रस्तावर पडलो आहे, पाण्यात पडलो आहे, डोंगरावर पडलो, स्कूटर, बाईक, कार मधून देखील पडलो आहे, तसेच अनेक वेळा खड्यात देखील पडलो आहे, तसेच एकदा हवेतून देखील पडलो आहे.

बोगदा

लेखक संजय क्षीरसागर यांनी मंगळवार, 14/10/2014 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
समोर आणि मागे ...वर आणि खाली ..या बाजूला अन त्या बाजूला एक लांबलचक अंधारा बोगदा.. (रस्त्याच्या खालून तर चालत नाहीये ना मी?) बोगद्यात प्रवेश करताना वाटत होतं, हां हां म्हणता संपेल तो. पण जसजसं आत जाऊ तसं अंधार दाटतच चाललाय ...अंतराचा ठाव लागेना झालाय... (`कशाला मारली झक' असं आता वाटतंय... पण काय उपयोग?) मी जात आहे..की येत आहे ? (आयचा घो! रिवर्समधे चालतोयं की काय?) ..आता संपेल , मग संपेल असे वाटणारा हा बोगदा संपत तर नाहीच..पण आणखी आणखी अरुंद होत चाललाय. डोळे उघडले काय अन मिटले काय, सारखेच..! (माझे डोळे उघडे आहेत का बंद?

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 06/10/2014 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत. डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे. ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल. डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे... १. ठिकाण ===> नंदी पॅलेस २. दिनांक ===> १८-१०-२०१४ ३. वेळ ====> संध्याकाळी ७:३० ४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे. डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.

माझ्या मुलाला आकुर्डी, पुणे, इथे पेइंग गेस्ट किंवा भाड्याने घर हवे आहे...

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 24/08/2014 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की, माझ्या मुलाला इंजिनियरिंग साठी आकुर्डी इथल्या इंजिनियरिंग कॉलेजला प्रवेश मिळाला. सध्या तो जागेच्या शोधात आहे. आपल्या मिपाकरांपैकी कुणाकडे आकुर्डीला भाड्याने जागा उपलब्ध असेल तर फार उत्तम. बादवे, जमल्यास आकुर्डीतल्या घरगूती खानावळीची माहिती दिलीत तर फार उत्तम. आणि इंजिनीरिंगच्या क्लासेसची माहिती मिळाली तर फार उत्तम. कळावे लोभ आहेच, तो वाढावा... मुवि (सध्या मुक्काम पोस्ट यानबू उर्फ यानबिवली.)

फेर्‍यात अडकलेला...

लेखक ऋतुराज चित्रे यांनी गुरुवार, 31/07/2014 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
माझा एक मित्र कामावरुन परतताना माझ्या घरी आला. नेहमीच्या स्कुटरऐवजी नवीन स्प्लेंडरवरुन तो उतरला. मी विचारले स्कुटर कुठे? स्कुटर विकली व ही नवीन स्प्लेंडर घेतली. मित्राचे अभिनंदन केले व आम्ही घरात आलो. पेट्रोल महागल्यामुळे कदाचीत जास्त अ‍ॅवरेज देणारी स्प्लेंडर बाइक मित्राने घेतली असेल असे मला वाटले. मित्राला तसे विचारले तसा तो म्हणाला, नाही नाही तसे अजिबात नाही, त्याने जे काही कारण सांगितले ते ऐकून मी चक्रावूनच गेलो. मित्राची कंपनी त्याच्या घरापासून अंदाजे तीसएक कि.मी.वर आहे. हायवेने ३०-४० मिनिटात कंपनीत पोहोचतो. नव्या स्प्लेंडरमुळे चक्क २० मि.