Skip to main content

आज जडी-बूटी दिवस

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 04/08/2018 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
वर्षाऋतुत आकाशातून अमृत धारा बरसतात. धरतीच्या कोखातून जीवनदायनी वनस्पती प्रगट होतात. भारतात १८,००० च्या वर औषधी वनस्पती आहेत. पण दुर्भाग्य या घटकेला फक्त ११०० वनस्पतींचा उपयोग आयुर्वैदिक औषधीत वापर होतो. याचा विपरीत चीन मध्ये तिथल्या १३००० वनस्पतींचा उपयोग चीनी हर्बल मेडीसीन मध्ये होतो. आज आयुर्वैदिक औषधींना जागतिक मान्यता नाही. कारण आधुनिक विज्ञानाच्या कसौटीवर औषधी वनस्पतींना पारखण्याचा प्रयत्न झाला नाही. जास्तीस्जास्त फूड सप्लीमेंट रुपात आयुर्वेदिक औषधी निर्यात होतात. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हि आयुर्वेदावर अनुसंधानचे कार्य फारच कमी झाले.

भारांच्या जगात... २

लेखक अजिंक्य विश्वास यांनी बुधवार, 01/08/2018 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
भटांच्या वाड्यातील भुतावळ- भा. रा. भागवत भटांच्या वाड्यातील भुतावळ भूत म्हणले की, आजपण आपले कान टवकारले जातात. ह्या भुतावळीचे नाव वाचल्यावर माझे देखील तसेच झाले होते.

भारांच्या जगात... १

लेखक अजिंक्य विश्वास यांनी मंगळवार, 31/07/2018 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
सूर्यावर स्वारी? - भा रा भागवत. . माझा प्रिय मित्र सागर ह्याने माझ्या डोक्यात काही वर्षांपूर्वी भागवतांच्या संक्षेपाचे मूळ रूप शोधायचे खूळ डोक्यात घातले, त्याबद्दल त्याचे मानावे तेवढे आभार आणि उपकार कमीच आहेत!

शंभर कौरवांची नावे.

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी बुधवार, 20/06/2018 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
कौरव १०० आणि पांडव ५ हे आपण सर्वजण जाणतो. ह्या सन्दर्भामध्ये युधिष्ठिराच्या तोंडचा हा श्लोक प्रसिद्ध आहे:
आपत्सु विग्रहे प्राप्ते वयं पञ्च च ते शतम् । परैस्तु विग्रहे प्राप्ते वयं पञ्चाधिकं शतम् ॥
(आमच्याआमच्यात संघर्ष असेल तेव्हा आम्ही पाच आणि ते शंभर. पण कोणा परक्याशी संघर्ष असेल तेव्हा आम्ही पाचासह शंभर.) अशा शंभर कौरवांपैकी दुर्योधन आणि दु:शासन सर्वांच्या परिचयाचे असतात.

निर्लेपच्या तव्यावर आपआपली पोळी

लेखक सुधीर मुतालीक यांनी सोमवार, 18/06/2018 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
निर्लेपची बातमी लोकसत्ताने अर्थकारण मध्ये न देता हेडलाईन टाकून कुचकट राजकीय फोडणी देण्याचे काम केले आहे. निर्लेप ब्रँडची भांडी हा विशेषतः मराठी माणसांसाठी अभिमानाचा विषय आहे. अडुसष्ट सालच्या सुमारास सरकारने स्टेनलेस स्टील आयात करण्यावर निर्बंध आणले त्यामुळे आताचे निर्लेपचे मालक श्री राम भोगले यांच्या वडिलांनी प्लास्टिकचे ( टेफ्लॉन ) कोटिंग असणारी भांडी बाजारात आणली. हा प्रयोग आपल्या देशात पहिलाच आणि अद्भुतच होता ! निर्लेप यंदा आपल्या उद्योगाचा सुवर्णमहोत्सव साजरे करतो आहे.

अंक, वेंक, अंग, वेंग, वेंगुर्ले, वेंगसर, बेंगलूर, वेंकटेश

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 05/06/2018 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
लेखाचा मुख्य विषय महाराष्ट्र : वेंगसर, वेंगणी (पालघर-ठाणे) , वेंगगाव, वेंग गाव , वेंगरुल, वेंगुर्ले यात वेंग म्हणजे काय ? बेंगलूर, वेंकटेश या शब्दांच्याही व्युत्पत्ती संबंधीत असू शकतील का ? लेखात नव्याने मांडण्याचा प्रयत्न केलेली थेअरी * मराठीत वेंघणें To climb : also to mount or ascend (विदर्भात येंगणे चढणे अशा अर्थाचा शब्द आहे .

कोंडा, कोंडाणा; कोंड, कोंडके, कोंडदेव

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 05/06/2018 08:04 या दिवशी प्रकाशित केले.
आंध्र तेलंगांणातली कोंडा शब्द असलेली स्थल नावे चटकन आठवता, गोळकोंडा, नागार्जुन कोंडा अजून बरीच आहेत. पण महाराष्ट्रातपण बरीच आहेत हे माहित नव्हते. महाराष्ट्राचा डाटाबेस धुंडाळल्या नंतर अनेक मिळाले आणि नंतर कोंडाणा आठवले. ईंग्लिश आल्फाबेट सर्च असला की कोंढवा सारखाही शब्द सूटत नाही. मग कोंडके आणि कोंडदेव हे पण मिळतात . अर्थात 'कोंडदेव' साठी जरासे लांब आणि जरासे अधिक जुन्या ईतिहासापर्यंत पोहोचावे लागेल. समुद्र किनारी आंध्रप्रदेशाचा गोदावरी मुख ते कृष्णा नदी मुखा दरम्याच्या पट्ट्यातील प्रदेशास वेंगीनाडू म्हणत.

औषधशास्त्र, औषधे, वैद्यक ४

लेखक सुधीर कांदळकर यांनी सोमवार, 04/06/2018 07:56 या दिवशी प्रकाशित केले.
औषधशास्त्र, औषधे, वैद्यक ४: अबू बकर मुहम्मद इब्न झकारिय्या अल राझी औषधशास्त्र, औषधे, वैद्यक: १ https://www.misalpav.com/node/42703 औषधशास्त्र, औषधे, वैद्यक २ https://www.misalpav.com/node/42705 औषधशास्त्र, औषधे, वैद्यक ३ https://www.misalpav.com/node/42744 जसे क्लॉडीअस गॅलेनला टाळता येत नाही तसेच अल राझीला देखील टाळता येत नाही एवढे त्याचे कार्य महान आहे.

औषधशास्त्र, औषधे, वैद्यक: ३

लेखक सुधीर कांदळकर यांनी सोमवार, 04/06/2018 07:17 या दिवशी प्रकाशित केले.
औषधशास्त्र, औषधे, वैद्यक: १ औषधशास्त्र, औषधे, वैद्यक ३ गेल्या लेखांकात क्लॉड गॅलेन हे नाव अनेक वेळा येऊन गेले. गॅलेनच्या कार्याचा परिचय करून घेतल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. क्लॉड गॅलेन वा लॅटीनीकृत क्लॉडिअस गॅलेनस. मी लॅटीनमध्ये लिहीत असतो तर सुधीरस कांदळकरस असे नाव लिहिले असते वा संस्कृतमधून लिहीत असतो तर सुधीरम कांदळकरम असे (सु)संस्कृत नाव धारण केले असते.

आंतरजालावरचा वावर अधिक सुलभ, आनंददायी व उत्पादक बनवणार्‍या उप-प्रणाल्या (एक्सटेन्शन्स व अ‍ॅप्स)

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शनिवार, 02/06/2018 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या जीवनावश्यक गोष्टींची यादी केली तर त्यात आंतरजालाची निवड नक्कीच होईल, असे म्हणतात. यातला विनोदाचा भाग सोडला तरी आंतरजालाने आपल्या जीवनात फार महत्वाचे स्थान बनवले आहे आणि त्याच्याशिवाय जगण्याची कल्पना आपल्याला सहन होणार नाही, यात संशय नाही. खानपानच्या वेळांमध्ये तीन-चार तासांचा अवधी आपण सहजपणे पेलतो पण "तेवढा सलग वेळ डेस्कटॉप-लॅपटॉप-टॅब-मोबाईल इत्यादीमध्ये तोंड न खुपसता घालवल्याला किती दिवस झाले? " या प्रश्नाचे उत्तर सहजा-सहजी देता येणार नाही, नाही का?!