Skip to main content

पेशवाईतल्या गमतीजमती

लेखक मनो यांनी शुक्रवार, 16/02/2018 06:03 या दिवशी प्रकाशित केले.
ही माहिती मला उल्लेखनीय वाटली म्हणून काही पुस्तकातून जवळपास जशीच्या तशी घेतली आहे. इतिहास संशोधकांना अर्थात ती आधी माहित असेलच. शक्य तिथे मूळ पुस्तकाचे उल्लेख केले आहेत. नवीन संशोधनाबद्दल वाचायचे असेल तर थोडी वाट पहा - दोन लेख नवीन माहितीसह देणार आहे काही दिवसात, एक साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्याबद्दल आणि दुसरा पुण्याच्या शनिवारवाड्याबद्दल ... :). १) श्री. यशवंत नरसिंह केळकर यांनी 'मराठी रियासत - उत्तरविभाग १ - सवाई माधवरावाच्या पूर्वायुष्यक्रम' या गो स सरदेसाई यांच्या पुस्तकात दोन पानी लेख लिहिला आहे.

माहीत‌ अस‌लेले ज‌गात‌ले प‌हिले 'शून्य‌'.

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी गुरुवार, 15/02/2018 02:43 या दिवशी प्रकाशित केले.
माहीत‌ अस‌लेले ज‌गात‌ले प‌हिले 'शून्य‌'.

प्रचलित गणनापद्धति, १ ते ९ हे अंक, ० हा अंक आणि स्थानाप्रमाणे अंकाने दर्शविलेले मूल्य असणे ह्या सर्व बाबी अज्ञात अशा प्राचीन हिंदु गणितज्ञांची विश्वाला देणगी आहे हे आता सर्वमान्य झाल्यामध्ये जमा आहे. रोमन, ग्रीक किंवा तत्पूर्वीच्या बाबिलोनियन इत्यादि पद्धतींमध्ये नसलेले गणनाकौशल्य ह्या पद्धतीने जगाला दिले आणि भौतिक शास्त्रांची पुढील सर्व प्रगति ह्या गणनापद्धतीच्या पायावर उभी आहे ह्याविषयी दुमत नाही. आकडा कितीहि मोठा असू दे, ह्या पद्धतीमुळे तो सुतासारखा सरळ होते आणि बेरीज-वजाबाकी-गुणाकार-भागाकर असे संस्कार स्वत:वर निमूटपणे करून घेतो.

द्वा सुपर्णा

लेखक शरद यांनी गुरुवार, 01/02/2018 07:25 या दिवशी प्रकाशित केले.
द्वा सुपर्णा ब्रह्म (परमात्मा) व प्रत्येक जीवात असलेला जीवात्मा यांचे एकमेकाशी असलेले संबंध काय ? हा भारतीय तत्वज्ञानातील एक महत्वाचा प्रश्न मानला जातो. ब्रह्म एकमेवाद्वितीय तर प्रत्येक जीवात असलेला जीवात्मा तर विविध रुपात दिसतो. यातील संबंधांचा उकल करण्याचा प्रयत्न ऋग्वेदापासून झालेला दिसतो. पुढे उपनिषदांमध्ये याचा विस्तार झाला. {मनुस्मृतीवरील लेखावरून असे दिसते की काही वाचकांना संस्कृत श्लोक पाहिजे असतात. (देव या सुसंस्कृतांचे भले करो!) मी आज संस्कृत श्लोक देणार आहे. माझ्यापर्यंत पोचलेला अर्थही देत आहे.

सातारा छत्रपतींची २३३ हिऱ्यांची पगडी?

लेखक मनो यांनी सोमवार, 29/01/2018 06:53 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित अनेक मौल्यवान खजिने परदेशांत आहेत. दुर्मिळ चित्रे, मूळ हस्तलिखिते, पोथ्या, मूर्ती एवढेच नव्हे तर हिरे, माणके आणि सोन्याच्या वस्तूही त्यात आहेत. थोड्या दिवसांपूर्वी श्री. संकेत कुलकर्णी यांनी नाशिक-हिरा याच्याबद्दल एक संशोधन प्रसिद्द केले होते. या वेळी लंडनमध्ये नव्हें तर अमेरिकेतील अश्याच एक विशेष मौल्यवान वस्तूची ही कहाणी. आजच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये ही बातमी प्रसिद्ध होत आहे. माझा हा लेख इतिहासप्रेमी आणि संशोधकांसाठी इथे टाकत आहे. हा लेख मूळ स्वरूपात शेवटच्या तीन पॅराग्राफ्सकट सोशल मीडियावर अथवा इतर कुठे शेअर करण्यास माझी काही हरकत नाही.

डिजिटल भारतासाठी युजर एक्सपीरिअन्स डिजाईन

लेखक कल्पक यांनी रविवार, 28/01/2018 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या ५००० वर्षात माणसानी जेवढी वैज्ञानिक-तंत्रज्ञानविषयक प्रगती केली त्यापेक्षा जास्त प्रगती गेल्या ५०० वर्षात केली. जेवढी प्रगती गेल्या ५०० वर्षात केली त्यापेक्षा जास्त प्रगती गेल्या ५० वर्षात केली. माणसाच्या प्रगतीचा हा वेग दिवसेंदिवस वाढतच आहे. आज जगाच्या ७ अब्ज लोकसंख्येपैकी ३ अब्ज लोक इंटरनेट वापरतात, ६ अब्ज लोक मोबाईल फोन वापरतात (त्यात १ अब्ज भारतीय मोबाईल धारक आहेत) आणि ३ अब्ज लोक ईमेल वापरतात. जगात १ अब्ज वेबसाईट्स, २ अब्ज संगणक आणि ४० लाख पेक्षा जास्त मोबाईल ऍप्स आहेत.

आठवणीतला घरचा मेवा -२

लेखक जेडी यांनी शुक्रवार, 19/01/2018 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणीतला घरचा मेवा -१ पावसाळ्यातल्या पदार्थ तसे फारसे नसत पण आषाढ लागला कि आषाढ तळणे हे एक काम असे . त्यात मग मुख्यतः तिखट आणि तळणाचे पदार्थ असत . चकली, खाऱ्या शंकरपाळ्या, तिखटाच्या पुऱ्या असे ते पदार्थ असत . आमच्या कोल्हापुरी भागात कर्नाटकी बेंदूर असतो तर तोही असाच जून जुलै महिन्यात येतो तर त्यासाठी खडूगळी (कडबोळी ) केली जात . बोली भाषेत खडूगळीच म्हणतात . हे म्हणजे तेच बेंदराला मातीच्या बैलांच्या शिंगात गोल जे वळे घातलेले असत तेच . त्यात हरबरा डाळीचे पीठ, कणिक आणि गूळ असे भिजवून त्याची गोल गोल वळी बनवायची आणि नंतर तळायची .

कुणी घरटं देतं का घरटं !

लेखक शब्दानुज यांनी गुरुवार, 18/01/2018 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
(लेखातील माहिती जालावरून संकलित केलेली आहे.) आपले लहानपण 'एक घास चिऊचा , एक घास काऊचा' असे ऐकण्यात गेले. 'चिऊताई चिऊताई दार उघड असे विनवणारा कावळा आणि त्याला न जुमानणारी चिमणीही असायची. माणसाला हा नखरेलपणा बहुधा आवडला नसावा. अक्षरक्षः रस्त्यावर आणले हो त्याने दोघांना. कावळ्यालाही पिंडापुरते ठेवून त्याचाच पराचा कावळ केला. आज ते दोघे 'कुणी घरटं देतं का घरट' असा चिवचिवाट करत असतील असं उगीचच वाटत राहत. पण मला खात्री आहे की पक्ष्यांची ही भाषा माणसाला कधी कळणारच नाही.

एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति

लेखक शरद यांनी गुरुवार, 04/01/2018 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति श्री. माहितगार यानी त्यांच्या "कुराण आणि हदिथ ..." या धाग्यात * एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति - ऋग्वेद 1.64.46 - meaning wise people explain the same truth in different manners. असा एक सुविचार दिला आहे. wise people explain the same truth in different manners. याला सुविचार म्हणावयास काहीच हरकत नाही. परंतु या वाक्याचा ऋग्वेदाशी काही संबंध नाही असे मी प्रतिसादात लिहले. त्यावर त्यांनी प्रतिप्रश्न विचारला की ' सत' ला आपण ऋग्वेदातील वर्णित देवतां अग्नी, सोम, वरुण.. पर्यंत आपण मर्यदीत करू इच्छित आहात का ? आता याचे उत्तर दिले पाहिजे.