Skip to main content

आकाशाची मोतीमाळ – स्वाती व सप्तर्षी नक्षत्रे

लेखक हेमंत ववले यांनी गुरुवार, 11/04/2019 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
भर्तृहरी एक राजा व महाकवि देखील होता. त्याच्या उत्तरकाळात त्याने तीन मुख्य काव्यरचना केल्या. त्यापुढे शतकत्रयी नावाने प्रसिध्दीस पावल्या. यातीलल एक आहे नीतिशतकम. या मध्ये एक रचना येते ती अशी सागरशुक्तिसंपुटगतं सन्मौक्तिकं जायते ! याचा अर्थ असा की स्वाति नक्षत्रामध्ये होणा-या पावसाचे थेंब जर शिंपल्यांमध्ये गेले तर त्याचे मोती होतात. भर्तृहरीचा काळ ठरविण्यात अजुनही अभ्यासकांची एकवाक्यता नाहीये. पण १५०० ते २००० वर्षापुर्वीचा त्याचा काळ असावा असा अंदाज आहे.

उधर कूछ देखोगे तो कहना नही...

लेखक अभिजीत राजवाडे यांनी बुधवार, 03/04/2019 03:48 या दिवशी प्रकाशित केले.
कला आणि अध्यात्म यांचा पूर्वीपासून सबंध आहे. उस्ताद बिस्मिल्लाह खान यांना जसा दैवी साक्षात्कार झाला होऊन देवाचे वरदान लाभले होते. त्याबाबतची प्रचलित कथा अशी आहे कि लहानपणी उस्ताद बिस्मिल्लाह खान त्यांच्या मामांकडून (उस्ताद अलिबक्ष खान) सनईची तालिम घेत असत तेंव्हा ते गंगा नदीच्या काठावरील एका हवेली मध्ये रियाज करीत असत. एके दिवशी मामांची तब्येत ठीक नसल्यामुळे उस्ताद बिस्मिल्लाह खान यांना दुसऱ्या खोलीमध्ये रियाझ करण्यास सांगितले. त्यांच्या रियाजाची खोली त्या हवेलीच्या चौथ्या मजल्यावर होती आणि त्या खोलीच्या एका बाजूला खिडकी जी गंगेकडे उघडत होती आणि त्या खिडकीच्या विरुद्ध दिशेला पायऱ्या होत्या.

एक मोहक दुनिया..एक खेळ..पोकर

लेखक सजन यांनी मंगळवार, 15/01/2019 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
पोकर म्हटले कि लगेच डोळ्यासमोर येतो तो ओशन ११ किंवा जेम्स बॉण्डच्या सिनेमांमधून आपल्या समोर आलेला पोकर, वाळवंटातली मायानगरी लास वेगस (Las Vegas) ज्याच्या जीवावर चालते तो पोकर, कोट्यावधींची ज्या खेळात उलाढाल चालते तो पोकर, ज्याच्या अनुशंघाने नकळत ज्याचे समीकरण गुन्हेगारी वर्तुळाशी लावले जाते तो अपनेही आपमें एक गूढ वलय बाळगणारा पोकर. भारतीयांनाही पोकर तसा नवा नाही. घरोघरी दिवाळी-गणपतीत चालणाऱ्या पत्ते-पार्टीज् असो की, रस्त्याच्या बाजूला कोंडाळे करून, तोंडात काडी धरून खेळलेला तीन पत्ती असो, पोकर म्हणजे जुगारच.

संक्रांतीला कल्पकतेचं वाण

लेखक vcdatrange यांनी शुक्रवार, 04/01/2019 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तरायणची सुरुवात झाली की, हळदी-कुंकू समारंभाची लगबग सुरु होते. हळदी कुंकूवाची परंपरा जुनी असली तर त्याचं महत्व आजही तितकचं टिकून आहे. हळदी कुंकू लावून तिळगूळच्या लाडवासोबत वाण देण्याची प्रथा अजूनही कायम आहे. हळदी-कुंकु कार्यक्रमाचे धार्मिक महत्व किती ते माहित नाही. पण असे कार्यक्रम सर्वांनाच आवडतात. सर्व महिला मस्तपैकी नटुन-सजुन येतात, गोड गोड गप्पा मारतात, नविन ओळखी होतात, एकाच कॉम्प्लेक्समध्ये असुनदेखील कधी न बघितलेल्या महिला एकमेकींना भेटतात. यंदा वाणाला दुसरं काही देण्याच्या ऐवजी फुलांची किंवा भाजीपाल्याची रोपे वाटली तर.!

सिंहगडाची अखेरची लढाई (भाग २)

लेखक मनो यांनी रविवार, 30/12/2018 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
१८१७ सालच्या दसऱ्यानंतर दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांविरुद्ध उघड युद्ध पुकारले. खडकी, येरवड्याच्या लढाईनंतर इंग्रजांनी पुणे घेतले, पण बाजीरावाने आपला खजिना आणि मौल्यवान वस्तू आधीच सिंहगड आणि रायगडावर हलवल्या होत्या. त्यामुळे २० फेब्रुवारी १८१८ या दिवशी साताऱ्याहून ब्रिटिश फौज सिंहगडच्या परिसरात पोचली. या फौजेने कुठे तोफा चढवल्या होत्या त्याचा एक नकाशा लढाईनंतर एका वर्षातच कर्नल व्हॅलेंटाईन ब्लॅकर याने एका पुस्तकात प्रकाशित केला.

सिंहगड

लेखक मनो यांनी शनिवार, 22/12/2018 05:38 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या चार-पाच वर्षात बऱ्याचदा असं वाटलं की सिंहगडाबद्दल लिहायला हवं. जुने कागद हुडकताना भरपूर नवे काही या गडाबद्दल सापडते, त्यातले जे काही अजूनही आठवते ते इकडे एक लेखात मांडतो आहे. लेख आवडला असेल तर प्रतिक्रियेत जरूर कळवा. पुढचा भाग - सिंहगडाची अखेरची लढाई आणि त्यानंतर ब्रिटिश काळातील एक अप्रकाशित जाहिरात टाकेन, जर उत्सुकता असेल तर ... सिंहगड म्हणले म्हणजे प्रथम आठवतात तानाजी मालुसरे आणि त्यांनी गाजवलेला पराक्रम. इथे अनेकदा शशिकांत ओक आणि इतरांनी त्याबद्दल लिहिण्याचा आग्रह केला होता, पण दुर्दैवाने तानाजीच्या पराक्रमाबद्दल फार थोडे अस्सल तपशील आपल्यापर्यंत पोहोचले आहेत.

EVM

लेखक चिगो यांनी गुरुवार, 20/12/2018 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
(डिस्क्लेमर : हा लेख EVM बद्दलची माहिती देणे व त्याबद्दलचे गैरसमज दुर करणे, ह्या हेतूने लिहीण्यात येत आहे. सदर माहिती ही लेखकाच्या निवडणुकांबद्दलच्या अनुभवांवर तसेच भारत निर्वाचन आयोगाद्वारे बनवलेल्या नियम, प्रोटोकॉल्स आणि निर्देशांवर आधारीत आहे. कुणाही वाचकाला जर ह्या विषयावर सखोल माहिती हवी असेल तर ती माहिती भारत निर्वाचन आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वाचकांना नम्र विनंती आहे, कि त्यांनी त्यांना असलेल्या शंकांना कृपया राजकीय वळण न देता विचाराव्यात.

शिवाजी राजांचा मृत्यू कसा झाला?

लेखक shantanu Paranjpe यांनी शुक्रवार, 16/11/2018 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
Shivaji Maharaj रायगडाने अनेक सुखद आणि दुखद क्षण अनुभवले. त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचे आकस्मिक निधन! १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का! ३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला!

मला भेटलेले रुग्ण - १८

लेखक डॉ श्रीहास यांनी मंगळवार, 06/11/2018 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.misalpav.com/node/42929 “डॉक्टर ईस दवा के क्या साईड इफेक्ट्स है”..... टिबीचं निदान झालं , औषधं लिहून दिली आणि एकही दिवस सोडायचं नाही असं अगदी बजावून सांगितलं मग विचारलं काही प्रश्न आहेत का अजून तर त्या पेशंटनी हा प्रश्न विचारला .... ह्यावर नेहेमीचं उत्तर देण्याआधी पेशंटचा नेमका रोख समजून घेऊन बोललो “ ईसके साईड इफेक्ट तो बहोत है लेकीन ईसका सबसे बडा जो ईफेक्ट है ना वो आपकी जान बचायेगा !!” टिबीच्या औषधांचे काही कॉमन साईड इफेक्टस म्हणजे लाल रंगाची लघवी होणे, ॲसिडीटी (उलट्या + मळमळ) वाढणे, गळून गेल्यासारखं वाटणे .

संगणक व आंतरजालाचा वापर करणार्‍या उपकरणांवरच्या डेटाची चोरी : समज-गैरसमज

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 26/10/2018 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
वैयक्तिक, व्यापारी आणि सरकारी स्तरांवर, संगणक आणि आंतरजालाचा वापर करून माहिती संकलन करणे व ती माहिती फायदेशीररीत्या वापरणे, ही गोष्ट आजकाल रोजच्या जेवणाइतकी सामान्य झाली आहे. अर्थातच, साठवलेला डेटा नष्ट होणार नाही हे पाहणे व त्याचे चोरीपासून संरक्षण करणे हे सर्वसामान्य काळजीचे विषय झाल्यास आश्चर्य ते काय? संगणक वापरून बनवलेल्या, विशेषतः चीनी बनावटीच्या उपकरणांवरच्या, (उदा : मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉप, सर्वर, इ) डेटाची चोरी हा सद्या सर्वसामान्य जनतेत काळजीने व भितीने चर्चिला जाणारा विषय आहे. या विषयाबाबत, लोकांच्या मनात अनेक समज, गैरसमज आणि भिती आहे.