माहिती
नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि.ग.कानिटकर
(नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि.ग.कानिटकर लिखित पुस्तकाचे परिक्षण बरेच दिवसांपूर्वी लिहिले होते. तेच येथे देत आहे.)
मित्रांनो,
मी बरीच पुस्तके वाचली आहेत."नाझी भस्मासुराचा उदयास्त" हे वि.ग.कानिटकर यांचे त्यापैकीच एक अतिशय उत्कृष्ट ऎतिहासिक पुस्तक आहे.अलिकडेच मी या पुस्तकाचे वाचन पूर्ण केले.अनेक पारायणे करुनही हे पुस्तक सारखे सारखे वाचावेसे वाटते.हे पुस्तक वाचताना पदोपदी मला आपल्या देशात माजलेल्या अराजकतेची आठवण झाल्याशिवाय होत नाही.मित्रांनो, तुम्हीदेखील हे सुंदर पुस्तक वाचले असेलच.
बालचित्रवाणी, संस्कार, गोट्या आणि असेच काही
मुलामुलांचीऽऽऽ
मजेमजेचीऽऽऽ
बालचित्रवाणी
फुले पाखरे आनंदाने , आनंदाऽऽनेऽऽ
फुले पाखरे आनंदाने गाती गंमत गाऽणीऽ
बालचित्रवाणीऽऽ , बालचित्रवाणी
तात्यांचा लेख वाचून मी ही जुन्या काळात रमलो आणि आठवण आली ती बालचित्रवाणीची. त्यातल्या गाण्यांची, छोट्या छोट्या कार्यक्रमांची. अगदी पाण्याचे उपयोग, फळे-भाज्या यांतील जीवनस्त्त्वे यांची उजळणी करणारे छोटे छोटे प्रसंग ते दात स्वच्छ ठेवण्याबाबत दाखवली जाणारी "शीऽऽऽ, दात किती किडलेत हिचे' ही ओळ आठवून देणारी छोट्या मुलीची आणि सोबत तिच्या बाहुलीची प्रतिमा; अशी असंख्य क्षणचित्रं डोळ्यासमोर तरळली. त्याचसोबत 'किलबिल किलबिल पक्षी बोलती....
देवगिरी किल्ला : दौलतींचे शहर (दौलतबाद)
मिसळपाववर लेणी स्थापत्याबद्दल काही लेखन टाकावे या उद्देशाने एक दिवस वेरूळ लेण्यावर जावे आणि ती माहिती मिसळपाववर, उपक्रमवर किंवा माझे शब्द वर टाकावी म्हणून आम्ही एका मंगळवारी वेरुळला पोहचलो. पण, तिथे हा फलक पाहिला. जरासा नाराज झालो.
पत्ता शोधणे - एक कला
६४ कला कोणत्या आहेत हो? त्यात पत्ता शोधणे ही कला ही समाविष्ट आहे का? नसल्यास करता येईल का?
का? सांगतो.
सिनेमा चालबाज:
शक्ति कपूर पहिल्यांदा शहरात येतो. तो कादर खानला एक पत्ता (अनुपम खेरचा) विचारतो. कादर खान चाकू काढून त्याच्याकडील सामान लुटून घेतो. शक्ति कपूर विचारतो, " अरे, पत्ता तर सांग". कादर खान म्हणतो," ऐसा करो, यहाँ से आगे जाओ. चौक पे बायें मुड जाना. अगले चौक से बायें मुड जाना. तो फिर आगे एक और चौक आयेगा. वहा से फिर बायें मुडना. अंत में और एक बार बाये मुडना. तुम यहॉं आओगे. तुम मुझे मिलोगे. मैं फिर तुम्हे लूट लुंगा."
हा झाला सिनेमातला गंमतीचा भाग.
प्रासंगिक
!! तुळशीचे लग्न !!
गुरूपालट दिनांक २१ नोव्हेंबर २००७
लोकहो,
कार्तिक शुध्द एकादशी रोजी म्हणजेच बुधवार दिनांक २१ नोव्हेंबर २००७ रोजी, उत्तररात्री २९ वाजून ०३ मिनीटांनी म्हणजेच गुरूवारी पहाटे ०५ वाजून ०३ मिनीटांनी गुरू वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करतो आहे.
ह्या गुरूभ्रमणाचा पुण्यकाल गुरूवारी पहाटे ०३-१२ पासून ते सकाळी ०६-५४ पर्यंत आहे.
ज्या लोकांची धनु रास आहे, त्यांच्या राशीत गुरू येत आहे. म्हणजेच त्यांच्या जन्मस्थ चंद्रावरून गोचर गुरूचे भ्रमण होणार आहे. शुभ आणि बलवान चंद्र असलेल्या धनुराशीच्या लोकांना जीवनात येत्या वर्षभरात अत्यंत शुभ अनुभव येतील.
कन्या, वृषभ आणि मकर राशीला गुरू अनुक्रमे ४-८-१२ वा येत आहे.
अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक)
ही कथा खरे तर नेहमीच्या स्टँडर्डप्रमाणे लघुकथा आहे. मात्र काही आधुनिक कथांशी तुलना करता तिला कादंबरी किंवा अतिदीर्घ कथा म्हणणे योग्य ठरेल.
शिवाय नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे (म्हणजे उरलेले एक) काल्पनिक.
नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.) मंडळी करांविषयी नंतर कधीतरी. मिसळपाववरच!
पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा.
एजीओजी
दीपावलीचे निमित्त साधून मिसळपावच्या सर्व सदस्यांना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपापल्या बोलीभाषेत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्याकरता ( चॅटींग - चॅटरूम्स) , जालावर अनुदिनी लिहिण्याकरता (ब्लॉग्स) त्याचप्रमाणे भारतातील विविध माहितीस्रोतांचा भारतीय भाषांत संचय करण्याकरता, बहुभाषिक सोई असलेले नवे संकेतस्थळ एजीओजी सुरू झाले आहे.
सध्या या संकेतस्थळाची जडणघडण चालू आहे. येत्या पंधरवड्यात विकीपिडीया नुसार सार्वजनिक व्यासपीठावर नव्या सोई उपलब्ध करून देण्याचा विचार आहे.
मिसळपाव