Skip to main content

!! चांडाळ चौकडी !!

लेखक अनिल हटेला यांनी मंगळवार, 23/12/2008 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी !! मिपा म्हणजे आमचा पडीक अड्डा झालाये...बॉस किवा कलीग असोत,सारखे विचारत असतात की काय करत असतोस दिवसभर ह्या साइटवर....(हे लोक अमराठी असण्याचा फायदा की मी नेमका काय करतोये ते कुणालाच कळत नाय ..शिवाय सगळ देवनागरी ह्या लोकाना वाचता येतं पण समजत काहीच नाय....) तर मंडळी प्रत्येकाच्या आयुष्यात काही खास मित्र असतात..तसे आम्हाला ही ४ चांगले मित्र लाभले.सारे आमच्या ग्रुपला आवर्जुन चांडाळ चौकडी म्हणत...आणी नावाप्रमाणेच आम्ही होतोही (आहे म्हणनं जास्त सयुक्तीक ठरेन) तर ह्या मित्राशी आज तुमची ओळख करून द्यावी म्हटलं.. १)राजेश पाटीलः हे माननीय महोदय ९वी फेल..पण शिक्षका

नामूमकीन हा चित्रपट कुणी पाहिला आहे काय?

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी रविवार, 21/12/2008 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट :- नामुमकीन (१९८९) दिग्दर्शक :- हृषिकेश मुखर्जी गीतकार :- आनंद बक्षी संगीतकार :- राहूल देव बर्मन गायक :- किशोर कुमार गायिका :- लता मंगेशकर, अनुराधा पौडवाल अभिनेते :- डॉ. श्रीराम लागू, संजीव कुमार, ओम शिवपुरी, राज बब्बर, विनोद मेहरा अभिनेत्री :- झीनत अमान सदर चित्रपट आपल्यपैकी कोणी पाहिला आहे काय? असल्यास तो आपल्याला आवडला का? तसेच हृषिकेश मुखर्जी ह्यांचे इतर अनेक चित्रपट गाजले. (जरी तिकीटबारीवर चालले नसले तरी त्यांच्याबद्दल कुठेना कुठे काहीतरी छापून आले आणि ते चर्चेत तरी राहिले) परंतू या चित्रपटाविषयी फारशी चर्चा होताना कुठे आढळत नाही. याचे कारण काय असावे?

मदत हवी आहे.

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 19/12/2008 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
माझा एक लंगोटीयार सध्या पुण्यातून मनीला (फिलीपाईन्स) इथे स्थलांतरित झालाय. सध्या तो एकटाच तिकडे गेलाय. थोड्याच दिवसात घर शोधून कुटूंब स्थलांतरित करेल. मिसळपावकरांपैकी कोणी मनीला इथे आहेत का? माझ्या मित्राला घर शोधायला मदत करु शकेल अशी माहीती कोणाला असल्यास कृपया व्य. नि. तून संपर्क साधावा. धन्यवाद! चतुरंग

हारापरी हौतात्म्य हे ज्यांच्या गळा साजे

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 19/12/2008 02:43 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक ९ ऑगस्ट १९२५ रोजी ’८ डाऊन’ गाडीवर लखनौ पासोन सुमारे चौदा मैल अंतरावर काकोरी ते आलमनगर दरम्यान सायंकाळी साडेसातच्या सुमारास हिंदुस्थान प्रजासत्ताक संघटनेच्या १० धाडसी शिलेदारांनी दरोडा घालुन सरकारी तिजोरी लुटली आणि साम्राज्य हादरले. हा घाला गाडीतुन वाहुन नेल्या जाणाऱ्या तिजोरीवर नव्हता तर ब्रिटीश साम्राज्यावर होता. या धाडसी क्रांतीकारकांनी जणु सरकारी खजिना लुटुन सरकारला आव्हान दिले होते. हा दरोडा अत्यंत विचार्पूर्वक ठरविलेला व सुनियोजित होता. एकदा हुतात्मा पंडीत रामप्रसाद बिस्मिल शाहजहानपूरहुन लखनौला जात असताना वाटेत त्यांनी या गाडीत सरकारी खजीना चढवताना पाहिला.

गांधीवाद आणि मराठी साहित्य !

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी गुरुवार, 18/12/2008 07:23 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाववर सध्या वेगवेगळे 'वाद' गाजत आहेत. दहशतवाद, गांधीवाद, अवांतरवाद इत्यादी इत्यादी. सध्या या विचारांनी मिसळपाववरील जनजीवन ढवळून निघाले आहे आणि त्याचा परिणाम मिपावर वावरणार्‍या मंडळींवर होतो, या सर्व विचारांचा परिणाम येथे वावरणार्‍यावर झाला नाही तर नवल वाटावे. आम्हालाही साहित्यातील गांधीविचारांनी शीळ घातली. गांधीविचारांच्या चर्चेवरुन असे दिसते की भारतीय समाजमनावर म. गांधीच्या विचारांचा परिणाम झालेला आहे आणि ती एक मोठी घटना मानलीच पाहिजे. भारतीय स्वातंत्र्याला नवचैतन्य देण्याचे श्रेय म. गांधीजींनीचा द्यावे लागेल. म. गांधींनी आपली नीतिमुल्य निश्चित केली होती.

बुश साहेबांना जोड्यांचा आहेर

लेखक भास्कर केन्डे यांनी गुरुवार, 18/12/2008 03:55 या दिवशी प्रकाशित केले.
बुश साहेबांना इराकमध्ये जोड्याचा आहेर मिळाल्याची बातमी दोन दिवसांपासून जगभर गाजते आहे. कुठे या प्रकाराला इराकमधील जनतेचा असंतोष म्हटले जात आहे तर कुठे त्या पत्रकाराचा प्रसिद्धी स्टंट. या विषयावर मिपाकरांना काय वाटते हे जाणून घ्यायला उत्सुक. जाता जाता - कोणत्या घटनेचा उपयोग कोण कसा करुन घेईल हे सांगणे मात्र मुष्किल. आता हेच पहा ना. या घटनेवर लगेचच एका ब्रिटिश तरुणाने एक खेळ विकसीत करुन आंतरजाळावर टाकला आणि पंचवीस लाखांवर हिट्स मिळवल्या! जगभरातल्या वर्तमानपत्रांप्रमाणे याची माहिती आपल्या मराठी वॄत्तपत्रांत सुद्धा आलेली आहे.

विश्वास नांगरे पाटिल - (आय.पी.एस.)

लेखक नाम्या झंगाट यांनी बुधवार, 17/12/2008 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
सनदी अधिकारी विश्वास नांगरे पाटिल पोलिस खात्यात काम करत असतात तसेच ग्रामीण भागातील विकासासाठी तेथिल युवकांचे संघटन, विदयार्थी मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या एका हायस्कूल मधील भाषणाचा दुवा येथे आहे. जरुर वेळ द्या....... CLICK HERE FOR VIDEO - http://video.google.com/videoplay?docid=6023553283275749875 त्यांचीच आवड्ती कविता - To dream ... the impossible dream ... To fight ... the unbeatable foe ... To bear ... with unbearable sorrow ... To run ...

सुयोधन आणी कर्ण

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 16/12/2008 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काहि दिवसात मैत्रीशी संबधीत काहि धागे मि.पा. वर वाचावयास मिळाले आणी बरेच दिवस तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवावी असे वाटत असलेली एक गोष्ट लिहायची प्रबळ इच्छा झाली. गोष्ट तशी जुनी म्हणजे महाभारतातील आहे, आपल्या पैकी बर्‍याच लोकांना माहितीही असेल. म्रुत्युंजय कर्ण एकदा सुयोधनाला (ह्याला आपण दुर्योधन या नावाने ओळखतो) भेटण्यासाठी त्याच्या महालात गेला होता, काही महत्वाच्या कामानिमित्त तेंव्हा सुयोधन बाहेर गेला होता व त्याला येण्यास थोडा अवधी लागणार होता. मित्राची वाट बघत बसलेल्या कर्णास सुयोधन पत्नी भानुमती हिने बुद्धिबळ खेळण्याचा आग्रह केला.