Skip to main content

वेबसाईट

लेखक शुभान्गी यांनी शुक्रवार, 20/02/2009 08:40 या दिवशी प्रकाशित केले.
काल दोन सुन्दर वेबसाईट वाचण्यात आल्या त्या ईथे नमुद करु ईच्छिते.( मिपावरील बहुतेकान्ना माहीत असाव्यात बहुतेक) puladeshpande.com यात पु.ल.नी लिहिलेले काही उतारे आहेत.सुनिताताईनी लिहिलेला लेख, पु.ल.चे जिवन अशी सुन्दर माहीती आहे. www.marathimati.com यात श्लोक,लेख,सुविचार, लहानमुलासाठी सुरेख माहिती आहे

पुस्तक पाहीजे

लेखक chipatakhdumdum यांनी सोमवार, 16/02/2009 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
मला ' प्राचीन पुरूषोत्तम ' हे पुस्तक त्याच्या सर्व भागासहीत कुठे मिळेल. मी सुमारे ४० वर्षापूर्वी ते सर्व भाग वाचले होते.

ठकीचा संसार

लेखक प्राची यांनी शनिवार, 14/02/2009 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना माझा नमस्कार. मिपावरील हा माझा पहिलाच प्रयत्न आहे,त्यामुळे काही चुकले तर,सांभाळून घ्या,चुकले तर सल्ला द्या ही विनंती. मागच्या आठवड्यात 'पवार पब्लिक स्कूल्,भांडुप' येथे श्री. विलास ना.

साम्राज्य बुरख्यामागचे - द व्हेल्ड किंग्डम : मूळ लेखिका -- कारमेन बिन लादेन

लेखक मैत्र यांनी शुक्रवार, 13/02/2009 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
एकदम वेगळं मुखपृष्ठ आणि नाव वाचून कुतूहलाने एक पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि संपल्यावरच खाली ठेवलं. मूळ लेखिका: कारमेन बिन लादेन. अनुवाद - अविनाश दर्प, न्यूझीलंड. मेहता पब्लिशिंग हाऊस. परीक्षण लिहावं असं लिखाणात विशेष नाही. पण परिचय लिहावाच असं पुस्तक फार महत्त्वाचं आहे असं वाटलं. ते वाचायला मिळालं तर उत्तमच पण नाही जमलं तर गोषवारा इथे द्यावा आणि पुस्तकापेक्षा त्या संदर्भात काही चर्चा व्हावी असं वाटलं... क्रमशः चा लागण न करता एक मोठं लिखाण मांडतो आहे.

पॅपिलॉन - काही अनुत्तरीत प्रश्न

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 09/02/2009 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
पॅपिलॉन - हे हेनरी शॅरीयर (Henri Charrière नोव्हें. १६, १९०६ ते जुलै २९, १९७३) याचे टोपण नाव. पॅपिलॉन हे त्याने लिहीलेली आत्मकथा आहे. तो फ्रान्स मध्ये गुन्हेगारांचा 'डॉन' होता. वयाच्या २५ व्या वर्षी त्याला न केलेल्या खुनाबद्द्ल जन्मठेपेची शिक्षेसाठी त्याला फ्रेंन्च न्यू गियाना ला हलवीण्यात आले. त्याला आपल्या प्रेमळ बायको आणि वडीलांना सोडावे लागले. तो भक्कम शरीर असलेला आणि प्रबळ ईचछाशक्ती असणारा होता. न्यू गियाना ला त्याने सुटकेसाठी पळुन जाण्याचा प्रयत्न केले. काही दिवसांनी तो पकडला गेला. या सुटकेसाठी तो अनेक मैल समुद्र प्रवास केला.

नीलकांतकी चल पडी! :)

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 05/02/2009 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरीकेत होणार्‍या साहित्य संमेलनाशी निगडीत मिपावर या आधीच बराच काथ्याकूट झाल्यामुळे खालील मजकूर कदाचित कुणाला मस्करी वाटू शकेल. परंतु तसे नाही. जरी मौजमजा, विरंगुळा सदरात टाकली असली तरी ही सत्यघटना आहे. देवकुळेकाकांचा नंबर आता आमच्या भ्रमणध्वनिवर आहे खरा परंतु घाईगडबडीत त्यांना मिपावर चाललेली चर्चा वाचा आणि जमल्यास खुलासा करा असे सांगायला विसरलो..! पुन्हा फोन करून सांगू की काय?! :) राम राम मिपाकरहो, आत्ताच आम्हाला आमच्या भ्रमणध्वनीवर, अमेरीकेत होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाच्या संदीप देवकुळेंचा दूरध्वनि आला होता.

गाण्यातल्या जागा

लेखक रोहन देशपांडे यांनी गुरुवार, 05/02/2009 04:29 या दिवशी प्रकाशित केले.
अनेकदा प्रसिद्ध गायक वगैरे लोक गाण्यातील अमुक एक जागा प्रसिद्ध आहे असे म्हणतात. ह्या जागा म्हणजे नेमके काय असते? गाण्यातल्या ह्या जागा म्हणजे काही विशी्ष्ठ शब्द असतात की स्वर समुह अस्तो? इकडे संगीतातले अनेक जाणकार आहेत. कृपया गाण्यातल्या जागांविषयी लिहिलेत तर आवडेल. प्रतिसादात उदाहरणे दिलीत तर अजुनच छान. रोहन

आपले दुरावलेले बांधव - रोमा

लेखक भास्कर केन्डे यांनी गुरुवार, 05/02/2009 01:35 या दिवशी प्रकाशित केले.
आजच ही बातमी झळकली अन पुन्हा एकदा रोमांवरील पूर्वी कधितरी केलेल्या वाचनातील आठवणी जाग्या झाल्या. देशोदेशांत लढाया-युद्धे झाली त्या त्या वेळी तिकडून भारतात स्थलांतरीत झालेल्या लोकांना कायमचा आश्रय मिळाला. भारतीयांनी जगातल्या जवळपास प्रत्येक मुख्य भागातल्या लोकांना आश्रीत म्हणून येथे आल्यावर आपल्यात सामावून घेतले. मात्र खूप कमी वेळा भारतातून जीव वाचवून लोकांना बाहेरच्या जगाचा आश्रय घ्यावा लागला. त्या अपवादांमधले विषेश लक्षात घेण्यासारखे हे रोमा.

ऑक्सिटॉसिन अलिंगनौषधी

लेखक मृदुला यांनी शुक्रवार, 30/01/2009 02:27 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीच्या उत्क्रांतीच्या बातम्या चाळताचाळता ऑक्सिटॉसिनविषयी वाचले. शास्त्राज्ञांनी असे शोधले आहे की माणसाला जेव्हा दुसर्‍या माणसाविषयी प्रेम, ममत्व वाटते तेव्हा पियुषिका ग्रंथीद्वारे ऑक्सिटॉसिन शरिरात सोडले जाते. या द्रव्यामुळे भावनिक धागे घट्ट होण्यास मदत होते. प्रयोगातून असेही सिद्ध झाले आहे की काही जातीच्या उंदरांत नर-मादी एकमेकांशी एकनिष्ठ राहतात ते ह्याच द्रव्याच्या प्रभावाने. माणसातील मर्यादित एकनिष्ठाही याच द्रव्यामुळे असावी असा कयास आहे.