Skip to main content

चंद्रयान - १

लेखक आनंद घारे यांनी मंगळवार, 21/10/2008 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
हे चंद्राकडे जाणारे भारताचे पहिले यान उद्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून अवकाशात झेपावण्याच्या तयारीत आहे. ते सुमारे पांच दिवसांनी चंद्रावर पोचेल आणि त्याच्याभोंवती १०० किलोमीटर अंतरावरून त्याला प्रदक्षिणा घालत राहील. या घिरट्या घालत असतांनाच त्यावर बसवलेल्या अत्याधुनिक उपकरणांद्वारे चंद्राविषयी अत्यंत उपयुक्त अशी माहिती ते यान गोळा करणार आहे.

वाचा आणि थंड बसा

लेखक भोचक यांनी मंगळवार, 21/10/2008 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या 'नई दुनिया' या इंदूरमधील सर्वाधिक खपाच्या वर्तमानपत्रात आलेल्या अग्रलेखाचा मराठी तर्जुमा. वाचा आणि थंड बसा. केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव यांनी मुंबईत रेल्वेच्या परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय विद्यार्थ्यांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी राज ठाकरे यांना मनोरूग्ण असे संबोधले आहे. लालू यांनी संतापाच्या भरात हे वक्तव्य केले असले तरी राज यांना 'मनोरूग्ण' म्हटल्याने त्यांनी केलेले गुन्हेही कायद्याच्या कक्षेत माफ ठरतात हे लालू विसरलेले दिसतात. कारण कायदाही तेच सांगतो. राज यांनी केलेला गुन्हा हा काही कोणत्याही व्याधीतून आलेला नसून ती एक अतिशय नियोजनबद्ध कृती आहे.

देहबोली...

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी शनिवार, 18/10/2008 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, मी जेव्हापासून मराठी आंतरजालावर फिरू लागलो तेव्हापासून बरीचशी संकेतस्थळं आणि ब्लॉग्ज नजरेस पडले. या सगळ्याठिकाणी निरनिराळ्या व्यक्तिंनी हाताळलेले विषय खरोखर खूपच वैविध्यपूर्ण आहेत. काही म्हणता काही बाकी ठेवलं नाहिये पब्लिकने. पण एक विषय मात्र असा आहे की जो खुपदा हाताळला जातो. आणि त्या विषयावरच्या चर्चा खरोखर प्राणपणाने लढवल्या जातात (एक मुंबई-पुणे वादच या वादाला मागे टाकू शकेल :) ) तो विषय म्हणजे.... बरोबर ओळखलंत, भाषा आणि भाषेशी संबंधित शुद्धलेखन वगैरे उपविषय. या सगळ्या चर्चा अतिशय रंगतातच. सध्या मिपावर चालू असलेली 'संस्कृत' बद्दलची चर्चा घ्या किंवा शुध्दलेखनावरच्या विविध चर्चा घ्या.

माझ्या हिंदीचा बोलु कवतिके

लेखक भोचक यांनी बुधवार, 15/10/2008 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला हिंदी चांगलं कळतं असं मराठी माणसाला उगाचच वाटत असतं. म्हणजे त्यात थोडं तथ्य नक्कीच आहे. अहिंदी भाषिकांमध्ये मराठी लोकांनाच हिंदी जास्त चांगली कळते आणि बोलताही येते. पण म्हणून आपण आपली संपूर्ण अभिव्यक्ती त्या भाषेत करू शकतो असं नाही. आता हा अनुभव महाराष्ट्रात तितका येणार नाही. पण उत्तरेकडे गेल्यानंतर अनेकदा हिंदी चांगली समजत असूनही अनेकदा आपला 'मोरू' होतो. इंदूरमध्ये सुरवातीला आल्यानंतर हिंदीत संवाद साधणं काही कठीण नाही, अशीच भावना होती. पण काही दिवसात आपोआपच विकेट पडायला सुरवात झाली. बायकोने एकदा तूप आणायला लावलं. इथे दुध-दुभतं भरपूर. त्यामुळे त्याची दुकानही बरीच.

विनोद - प्राचीन कथा

लेखक वारकरि रशियात यांनी बुधवार, 15/10/2008 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या काथ्याकूटात एक शब्द वाचला - 'बादरायण'. मनात सहज विचार आला की हा 'बादरायण' (संबंध) शब्द आपण वापरतो, त्याचा संदर्भ (किंवा कथा) कदाचित सर्वांना माहित नसेल. शक्य असल्यास श्लोक आणि पार्श्वभूमी लिहावी असा विचार केला. आपल्यालाही असे अनेक कथा संदर्भ (किंवा कथा) श्लोक माहित असतील. माहित असल्यास श्लोक आणि पार्श्वभूमी सह लिहा - अपेक्षा आहे चांगल्या विनोदाची !!! तर सुरु करतोय 'बादरायण' (संबंध) कथा (श्लोकासह) (पूर्वी ) एकदा एका गृहस्थाकडे बैलगाडीतून काही पाहुणे आले. बायकोला वाटले की नवर्‍याकडील पाहुणे असतील, तर नवर्‍याला वाटले की बायकोकडील मंडळी असतील !

वसंतराव देशपांडे

लेखक व्यंकु यांनी मंगळवार, 14/10/2008 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या प्रिय बंधू आणि 'मैत्रिणींनो' मी तसा मिपावर नवीन आहे त पहिल्यांदाच लिहीतोय तेव्हा सांभाळुन घ्या. तर सांगायचा मुद्दा असा कि माझ्याकडे वसंतरावांची एक अप्रतिम चित्रफित आहे पण भानगड अशी कि ती मला कोणत्याही संकेतस्थळावर टाकता येत नाहीए तेव्हा जर कोण मला आपला पत्ता देण्यास तयार असेल तर मी ध्वनिचित्रतबकडी पाठवू शकेनं. [एक विनंती- उत्तरे देताना शक्यतो मला अहो जाहो करू नका.] पुरवणी सुचना-ध्वनिचित्रतबकडी मोफत दिली जाईल. अगदी टपालखर्चही माफ.

सुवर्णनगरी...चित्र सफर!!!

लेखक दिनेश यांनी सोमवार, 13/10/2008 03:10 या दिवशी प्रकाशित केले.
राजा चार्ल्स -४..ओल्ड टाउन स्क्वेअर मधील भव्य पुतळा: कम्युनिझम असतानाही ह्या पुतळ्याचे पावित्र्य राखले गेले हे विशेषच म्हणायला हवे. घड्याळ असलेल्या चर्चचे मागील प्रवेशद्वार.

सज्जनगड

लेखक डोमकावळा यांनी रविवार, 12/10/2008 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, गेल्या महिन्याच्या १३ तारखेला सज्जनगड येथे गेलो होतो. तेथील काही माहिती व प्रकाशचित्रे इथे टाकत आहे. सातार्‍यापासून साधारण १८-२० किमी अंतरावर सज्जनगड आहे. सज्जनगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरकरांकडून जिंकला. श्रीसमर्थ रामदास स्वामी यांनी या गडावर वास्तव्याला आल्यानंतर 'सज्जनगड' हे नाव दिले. समर्थांनी समाधी घेतल्यानंतर छत्रपती संभाजीराजेंनी त्या ठिकाणी समाधी मंदीर व त्यावर श्रीराम मंदीर बांधले. श्रीराम मंदीरातील श्रीराम, लक्ष्मण, सीता व मारुतींच्या मूर्ती या पंचधातूच्या असून त्या तंजावर (तमिळनाडू) येथुन आणल्या आहेत.

आंतरजालावरील करामती...

लेखक टुकुल यांनी बुधवार, 08/10/2008 06:59 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल मिपावर अनुभवाचे वारे सुरु असल्यामुळे आमचाही अनुभव. ------------------------------------------------------------------------------------ अभियंत्रीकीच शिक्षण संपुनही नोकरी लागत नसल्याने घरीच पडुन होतो, त्यामुळे इकडच तिकडच वाचन चालु होत आणी बरच नवीन शिकायला हि मिळत होत. अथक प्रयतनाने शेवटी लागली नोकरी आणी आंतरजालाचा संबध वाढला. हे चालु असताना, मित्रांना येणार्‍या मेल्स बद्द्ल कुतुहुल वाटु लागले, खास करुन मुली संगणकावर बसुन गोड गोड हसत काहीतरी खरडत, तेव्हा कुतुहल जरा जास्तच.

यासुकुनी श्राईन

लेखक सहज यांनी शुक्रवार, 03/10/2008 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
गेली काही वर्ष यासुकुनी श्राईन[समाधी/स्मारक??] हे नाव बातम्यात अधुनमधुन कानावर यायचे, की चीन सरकारने [द. कोरीया, उ. कोरीया देखील] जपानी पंतप्रधान यांनी यासुकुनी श्राईनला भेट दिली म्हणुन कडकडीत निषेध नोंदवला. तेव्हापासुन मला हा यासुकुनी स्मारक नक्की काय प्रकार आहे हे जाणुन घ्यायचे होते. काही मित्रांकडून तसेच आंतरजालावर माहीती मिळाली. त्यात हा दुवा विशेष उल्लेखनीय.