Skip to main content

(फळं) खा, पिऊ नका!

लेखक खादाड अमिता यांनी शनिवार, 21/05/2011 04:02 या दिवशी प्रकाशित केले.
'माझा रोजचा फिक्स ब्रेकफास्ट असतो- एका अंड्याचे ऑम्लेट, दोन टोस्ट आणि एक ग्लास ऑरेंज ज्यूस.' 'दुपारी आम्ही ऑफिसची सर्व मंडळी चालायला जातो, टी टाईमला , तेव्हा सगळे चहा पितात पण मी मात्र ज्यूस सेंटर चे फ्रेश ज्यूस पिते. ' ' रोज संध्याकाळी मी माझ्या रिटायर्ड मित्रांसोबत जॉगर्स पार्क ला जातो, तिथून परत येताना मी फ्रूट आणि भाज्यांचे मिक्स हर्बल ज्यूस पितो, वरून साखर न घालता बरं का!' आहेत न ह्या सगळ्यांच्या एकदम हेल्दी हॅबिट्स? मला विचाराल तर, नाही. ह्या पैकी कुणाचीच सवय खरंच आरोग्यदायक नाहीये. हं, हेल्दी मानसिकता नक्की आहे.

लढाऊ विमाने - मिग-२१

लेखक निनाद यांनी गुरुवार, 19/05/2011 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
लढाऊ विमाने यावर मराठीमध्ये फारशी माहिती दिसत नाही. ही माहितीची भर विकीवर घालत आहे. पण ती येथेही यावी म्हणून काही लेख देत आहे. आशा आहे ते आवडतील. या विमानाची चित्रे पाहण्यासाठी विकीवर जरूर भेट द्या! मिग-२१ मिकोयान मिग-२१ हे एक सुपरसॉनिक प्रकारातील एका इंजिनाचे, रशियन बनावटीचे लढाऊ विमान आहे. या विमानाला बालालैका या टोपण नावानेही ओळखतात कारण हे त्या सदृष दिसणार्‍या रशियन वाद्या सारखे दिसते. या विमानाच्या आकारामुळे त्याला पेन्सिल म्हणूनही ओळखले जाते.

एडसचा जीवघेणा पाश

लेखक पिंगू यांनी मंगळवार, 17/05/2011 05:15 या दिवशी प्रकाशित केले.
ही एक सत्य घटना आहे. मी स्वत: अनुभवलेली. ही कथा आहे दहा वर्षापूर्वीची. जेव्हा मला मूळव्याधीच्या उपचारासाठी एका इस्पितळात भरती करण्यात आले होते. त्या इस्पितळात एक मोठे दालन होते जिथे बहुतेक सर्व रुग्ण दाखल केले जात आणि मी पण तिथेच होतो. मी तिथे डेरेदाखल झाल्यानंतर रोज एक वेगळा रुग्ण म्हणून मला जी वागणूक मिळाली ती खूपच चांगली होती. कारण काय तर मी एक वेगळा रुग्ण आणि विद्यार्थ्यासाठी एक अभ्यासाचा भाग होतो.

ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर बिघडू लागलेले अमेरिका-पाकिस्तान संबंध

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 12/05/2011 08:49 या दिवशी प्रकाशित केले.
ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर बिघडू लागलेले अमेरिका-पाकिस्तान संबंध १ मे २०११ रोजी (आपल्या २ मे रोजी) अखेरीस ओसामा बिन लादेनला ठार करण्यात अमेरिकेला यश मिळाले. पण या घटनेमुळे पाकिस्तानच्या अमेरिकेबरोबरच्या दगाबाज वागणुकीवरील, अविश्वासार्हतेवरील (खोट्या-खोट्या) रहस्यावरचा ’बुरखा’ शेवटी उचलला गेला ही एक चांगली घटना घडली! मागे एका लेखात लिहिल्याप्रमाणे अमेरिका-पाकिस्तान यांच्यातील संबंध कधीच परस्पर-विश्वासाच्या किंवा परस्परांबद्दलच्या आदरभावनेच्या पायावर कधीच आधारलेले नव्हते. तर तो फक्त 'सोयीसाठी लावलेला म्होतूर'च होता!

तिची नशा...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 08/05/2011 06:24 या दिवशी प्रकाशित केले.
थंड झुळका अंगावर येत असाव्यात, शहराच्या गजबटापासून दूर एखाद्या शांत तळ्याकाठी तो दिलनशी बार असावा, अगदी आतल्या अंधाऱ्‍या परमिट रुम ऐवजी बाहेरच हिरवळीवर अड्डा जमवण्याची मुक्त मुभा असावी, संध्याकाळची वेळ, पुनवेचा चंद्रप्रकाश, डीश भरुन ओसंडणारा आवडता चटपटीत चकणा अन् निमुळत्या ग्लाससोबत आवडीच्या ब्रँडची 'ती' उभी असावी! मित्रांनो आलं ना ध्यानात? अशा आल्हादक वातावरणात चंद्रकोरीसारखी शनैःशनैः काळजावर चढणारी तिची मऊ मुलायम नशा शब्दांत पकडता कशी येईल?