Skip to main content

तत्काळ चित्रकार ( Instant Artist) बना.

लेखक शरद यांनी शनिवार, 07/05/2011 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
झटपट चित्रकार फोटोशॉपचा असाही उपयोग मध्ये आपण त्यात चित्रे कशी काढता येतात ते पाहिले. पण त्यात मी एक अट घातली होती .."इच्छा व वेळ पाहिजे ". आता इच्छा बर्‍याच जणांना असली तरी हल्लीच्या धकाधकीच्या काळात "वेळ" कसा पैदा करणार ? तर आज पाहूं वेळ नसणार्‍या लोकांनाही "Instant Atist " कसे बनता येते. फोटोशॉपने त्यांचीही सोय केली आहे.पुढे दिलेली चित्रे मुद्दाम काळजीपूर्वक निवडलेली नाहीत. प्रत्येक चित्राला साधारणत: ३ ते ४ मिनिटे लागतात.

कँडिडेट्स मॅचेस - २०११

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 04/05/2011 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वीच्या सोविएत संघराज्याचा एक भाग असलेल्या परंतु आता स्वतंत्र अशा तातारस्तानची राजधानी कझान इथे दि.५ मे २०११ पासून, म्हणजे उद्यापासून, बुद्धीबळ जगताचे लक्ष लागून राहिलेल्या कँडिडेट्स मॅचेस सुरु होत आहेत. २०१२ सालच्या जगज्जेतेपदाच्या स्पर्धेसाठी सध्याचा जगज्जेता विश्वनाथन आनंदचा प्रतिस्पर्धी ठरवण्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट ह्या मॅचेसमधून साध्य होणार आहे. आठ खेळाडूंमधून एकाची निवड होईल. कोण असेल हा खेळाडू?

जंक फूड चं घातक जाळं

लेखक खादाड अमिता यांनी शनिवार, 30/04/2011 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारी मी माझ्या मैत्रिणी बरोबर जवळच्या मॉल मधे खरीदी करायला गेले होते. सोबत तिचा ३ वर्षाचा मुलगा- रोहन पण होता. मॉल च्या दारातच एक मोठा विदुषक होता जो सर्व मुलांना फुगे देत त्यांच्या 'फास्ट फूड' रेस्टॉरन्ट मधे यायचा आग्रह करत होता. ते बघताच रोहन 'मम्मा फ्राईज' 'मम्मा बर्गर' 'मम्मा आईस्क्रीम' अश्या बऱ्याच विनवण्या व मग हट्ट करू लागला. तिथून त्याला कसं बसं समजावून पुढे निघालो तर तो 'कुकीझ' म्हणून ओरडला. आई तशीच पुढे निघून जातीये हे लक्षात येताच, त्याने तिथेच फतकल मारून चांगलाच गोंधळ घातला. शेवटी वैतागून माझी मैत्रीण त्याला फूड कोर्ट मधे घेऊन गेली आणि त्याचे हट्ट पुरव्ल्यावरच तो शांत झाला.

फोटोशॉपचा हा ही एक उपयोग

लेखक शरद यांनी शुक्रवार, 29/04/2011 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी शाळेपासून माझी चित्रकला बेकार होती. शिक्षक माझ्या प्रत्येक चित्राला दहापैकी ३/४ मार्क द्यावयाचे. माझ्या एका जिवलग मित्राची चित्रकला चांगली असावी कारण त्याला नेहमीच ८-९ मार्क मिळावयाचे. एकदा मी त्याला माझ्या वहीत चित्र काढावयाला सांगितले; पण त्या चित्रालाही ४ च गुण मिळाले ! आता शिक्षकांना कळत नव्हते म्हणावयाचे कीं माझा मित्र डॅंबिस होता हे अजूनही कळले नाही (शेवटी तोही भावेस्कूलचाच!). असो. सांगावयाची गोष्ट ही की माझी चित्रकला बेकारच. नववीपासून ती बला टळली. पुढील पन्नास वर्षात चित्रकलेतील भरपूर पुस्तके गोळा केली. जगातील १५ म्युझिअमचे खंड माझ्याकडे आहेत.

फोटोशॉपचा हाही एक उपयोग

लेखक शरद यांनी शुक्रवार, 29/04/2011 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी शाळेपासून माझी चित्रकला बेकार होती. शिक्षक माझ्या प्रत्येक चित्राला दहापैकी ३/४ मार्क द्यावयाचे. माझ्या एका जिवलग मित्राची चित्रकला चांगली असावी कारण त्याला नेहमीच ८-९ मार्क मिळावयाचे. एकदा मी त्याला माझ्या वहीत चित्र काढावयाला सांगितले; पण त्या चित्रालाही ४ च गुण मिळाले ! आता शिक्षकांना कळत नव्हते म्हणावयाचे कीं माझा मित्र डॅंबिस होता हे अजूनही कळले नाही (शेवटी तोही भावेस्कूलचाच!). असो. सांगावयाची गोष्ट ही की माझी चित्रकला बेकारच. नववीपासून ती बला टळली. पुढील पन्नास वर्षात चित्रकलेतील भरपूर पुस्तके गोळा केली. जगातील १५ म्युझिअमचे खंड माझ्याकडे आहेत.

फोटोशॉपचा हाही एक उपयोग

लेखक शरद यांनी शुक्रवार, 29/04/2011 12:35 या दिवशी प्रकाशित केले.