कोकणस्थ (चित्तपावन/चित्पावन)
कोकणस्थ (चित्तपावन/चित्पावन)
इतिहास :
कोकणस्थांचा १४ व्या शतकाच्या आधी कोकणात उल्लेख मिळत नाही. मग हे कोठून आले ? या बद्दल तीन मते आहेत.
(१) हे बर्बर देशातून जलमार्गे कोकणांत आले. ह्या प्रदेशाचा उल्लेख जुन्या ग्रंथांत मिळतो. त्यातच यांचा व परशुरामाचा संबंधही सांगितला आहे. परशुरामाला समुद्र किनारी १४ शवे मिळाली. त्याने जिवंत करून त्यांची कोकणात स्थापना केली. शवे सोडा, आसन्नमरण माणसे मिळाली; त्यांची सुश्रुषा करून त्यांना वाचवले. मग त्यांना ब्राह्मणत्व दिले.म्हणून चित्तपावन परशुरामाचे भक्त. या मताप्रमाणे यांचा गोरा रंग,सरळ नाक वगैरेची व्यवस्था लावता येते.
मिसळपाव