Skip to main content

कांसा बेटावरचा पद्मदुर्ग..

लेखक हेम यांनी बुधवार, 22/06/2011 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
२- ३ वर्षांपूर्वी कुठल्यातरी ट्रेकवेळी विनयने खटकी पडल्यागत एक भन्नाट ऑफर दिली. मोजक्या मंडळींना घेऊन सहसा न होणारे सागरी किल्ले करायचे आहेत. खांदेरी-उंदेरी, पद्मदुर्ग उर्फ कांसा आणि सुवर्णदुर्ग. या सर्व किल्ल्यांवर जाण्यासाठी सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट जमवावी लागणार होती ती म्हणजे स्थानिक नावाड्यांशी संपर्क नि परवानगी. हे काम विनयने इतर सोबत्यांच्या मदतीने उत्तमपैकी हाताळलं. इतर किल्ल्यांप्रमाणे हे किल्ले सहजपणे होणारे नव्हेत त्यामुळे कितीही महत्त्वाची कामे असली तरी ती बाजूला सारायला हवी होती.

देरसू उजाला

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 20/06/2011 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
जे जंगलात हिंडतात, ट्रेकींग करतात, त्यांना भावणारा हा सिनेमा. मला तरी हा बघितल्यावर रात्रभर झोप आली नाही. देरसूची शप्पत !

दोन गोष्टी नेहमी माझ्या हाताशी असतात.

  1. पाडस नावाचे पुस्तक आणि
  2. देरसू उझालाची सी. डी.

देरसू उझाला

   

पाकिस्तानच्या राजकारणात पुन:प्रवेशासाठी मुशर्रफ यांचे नवे प्रयत्न?

लेखक सुधीर काळे यांनी सोमवार, 20/06/2011 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
पाकिस्तानच्या राजकारणात पुन:प्रवेशासाठी मुशर्रफ यांचे नवे प्रयत्न? राजकीय वनवासात आणि स्वत:हून पत्करलेल्या (?) हद्दपारीत तीनपेक्षा जास्त वर्षे काढल्यावर मुशर्रफना पुन्हा राजकारणात पडून पाकिस्तानचे अध्यक्ष व्हायची स्वप्ने पडू लागली आहेत असे दिसते. सत्तेची नशाच तशी असते!

Intrepid Sea, Air & Space Museum, New York

लेखक येडा अण्णा यांनी रविवार, 19/06/2011 08:11 या दिवशी प्रकाशित केले.
न्युयॉर्क मध्ये येवुन जवळपास दिड वर्ष झाले होते तरीही Intrepid Museum ला जायचा योग काही येत नव्हता. अखेर या शनिवारी तो योग आला.