Skip to main content

गंमतच आहे

लेखक शरद
गुरुवार, 02/06/2011 या दिवशी प्रकाशित केले.
झाडातून झाड ? आपणा सर्वांना बांडगुळे माहीत आहेत. एका झाडाच्या फांदीतून उगवलेले दुसरे झाड. बांडगुळ मूळ झाडाच्या फांदीतून अन्नरस शोषून घेते व स्वत : वाढते. पण तुम्ही अशी झाडे पाहिली आहेत कां की जात दोनही झाडांची मूळे जमीनीत आहेत पण एका झाडाचा बुन्धा दुसर्‍या झाडाच्या बुन्ध्यातून वाढला आहे व दोनही झाडे चांगली वाढलेली आहेत ( व अजूनही वाढत आहेत) ? अशी दोन झाडे पुणे विद्यापीठाच्या आवारात आहेत. मुख्य इमारतीच्या शेजारच्या हिरवळीच्या कडेला एक चांगले ३०-४० फूट उंचीचे गुलमोहराचे झाड आहे. व त्याच्या बुन्ध्यातून दुसरे पिंपळाचे झाड उगवले आहे. पहिल्या चित्रात दोनही झाडे लांबून दिसतात. दुसर्‍या चित्रात जवळून दिसतात व तिसर्‍या चित्रात गुलमोहराच्या बुन्ध्यामध्ये पिंपळाचा बुन्धा दिसतो. आणखी उदाहरणे कुणाला माहीत आहेत ? Copy (2) of Trees 007 Trees 007 copy Copy of Trees 015 शरद
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4557
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

आश्चर्य आहे. सहसा, एका झाडाखाली/जवळ दुसरं झाड जगू शकत नाही म्हणतात. इथे तर त्यावरही कडी केलीए की. :) अवांतरः तात्या मोड > अंमळ वेडXवाच दिसतोय हा पिंपळ. पाहून मौज वाटली. \ तात्या मोड> :D

In reply to by धमाल मुलगा

HTML शिक रे भौ. उलटा \ मारला आहे. तो टॅग कसा बंद होणार. आता मी पाचर मारली. आता बसा बोंबलत तात्या मोड मधेच ;)

In reply to by लंबूटांग

च्यायला लंब्या... औघडै तेरा. :D मुद्दामच उलटा \ मारलाय. सुलटा मारला तर ते एचटिएमएल येडं खरंच कुठलातरी टॅग असेल म्हणून काड्या करतंय. :D तुला काय वाटलं? W3Org ने काय तात्या मोड असा html टॅग डिफाईन केलाय काय? =)) =)) =))

दगडी इमारत खरच मस्त दीसते आहे. तसही ब्रीटीशांनी बांधलेल्या इमारती खरच मस्त टीकावू व थंडावा देणार्‍या असतात. झाडाबाबत काय बोलायचं ? बोलून चालून सजीव वस्तूच ती... वाटलं असेल त्यांना थोडी बाँन्डींग टाइट करावी.... वा एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ म्हणत असावेत ;)

अरे हा तर येगळाच प्रकार हाय की वो ! ;) बांडगुळ तर अनेक तर्हेचे पाहिले होते...पण हा आयटम च्यामारी नविनच आहे. ;)

बेळगावला के एल इ च्या परिसरात कॉलेज रोड वर अशी एकत्र गुंफलेली पाच झाडं होती. रस्ता रुंदीकरणात ती आता तोडली वीस वर्षापुर्वी. वड, पिंपळ, फणस, उंबर अन पाचवं कोणतं ते आठवत नाही आहे. पण ही पाच झाडे एकत्र होती. आता वड, पिंपळ अन उंबर पक्ष्यांच्या विष्ठेने उगवतात हे माहित आहे,पण त्यात फणस अन ते पाचवं झाड कोठुन आलं हे काही कळल नाही.