लेख
गँग ऑफ बदलापुर -
"एस पी साहेब, एक विधायक को सरेआम थानेमें थप्पड मारनेके लिये कितना दिन जेल में जाना पडता है?"
काल गॅबावर ४५ ओव्हर्समध्ये १ बाद १०७ अशी परिस्थिती असताना ६ फूट ५ इंच उंचीच्या मिचेल स्टार्कला ३ चेंडूंत १४ धावा चोपतानाचा शुभमन गिलचा उर्मटपणा "गँग्स ऑफ वासेपुर" च्या सरदार खानपेक्षा काही कमी नव्हता.
याद्या
19191
शनिपीठ दर्शन
आपल्या महाराष्ट्रात देवींची साडेतीन शक्तीपीठं आहेत. तशीच भारतात शनि देवाची पण साडेसात शक्तीपीठं आहेत.
त्यातील साडेतीन शक्तीपीठं स्वतः प्रभु रामचंद्रांनी स्थापन केलेली आहेत.
एक मध्यप्रदेशातलं उज्जैन सोडलं तर बाकी अडीच नाशिक व बीड जिल्ह्यात. आम्ही तीघी मैत्रिणींनी हि अडीच पीठं तरी जाऊन येऊ असं ठरवलं.
तसंही लाॅकडाऊन पासून म्हणजे मार्च 2020 नंतर भटकंती बंदच होती. आताशा सगळं नाॅर्मल होतय हळुहळू तर आपण योग्य काळजी घेऊन जाऊन येऊ असं म्हणून निघालो.
जानेवारी महिना असूनही जास्त थंडी नव्हती. सकाळी सहाला च मोकळ्या रस्त्यांवर आमच्या चक्रधरांनी गाडी सुसाट सोडली.
याद्या
4487
लेखनप्रकार
लागा चुनरी मे दाग..
लागा चुनरी में दाग..
अनेक वर्षांपूर्वी घरात नविन टेपरेकॉर्डर आल्यावर मोहम्मद रफी, लतादीदी, आशाताई, मेहंदी हसन, गुलाम अली ह्यांच्या कॅसेट्सही लगोलग आल्यात. त्या वयात ह्या प्रभुतींचं गाणं ऐकल्यामुळे 'चांगलं' काय असतं ह्याची उमज येऊ लागली.
कॅसेट्च्या त्याच संचात रुपकुमार राठोड ह्यांच्या गझल प्रोग्रॅमची एक कॅसेट होती. ती कॅसेट बाबा वारंवार लावायचे.
वो रस्मे तोड के घर मेरे आने वाले है...
याद्या
8986
स्वराज्याचा लढा आणि पुरंदरचा तिढा ! ( भाग २)
उंदराचा डोह (कथा)
उंदरांचा डोह..
शाळा सुटल्या सुटल्या मी नदीकडे निघालो. हा माझा नित्य नेम होता. मी सहसा तो चुकवत नसे. सलग सात आठ तास शाळेत शिकवण्यामुळे, जो शीण अंगभर पसरलेला असतो, तो नदीवर जाऊन निवांतपणे व्यक्त करता येतो. नदीच्या वरच्या अंगाला एक ठिकाण होते. सहसा त्या ठिकाणी कोणी फिरकत नसे. का फिरकत नसे? हा विषय गौण आहे. कारण प्रत्येकाच्या धारणा वेगळ्या असतात. आता काही जणांचे म्हणणे होते की, ते ठिकाण चांगले नाही. तेथे अजब घडामोडी घडतात. तिथे कधी काहीही घडू शकते. प्रत्यक्षात तसा कोणाला काही अनुभव आला नव्हता. पण एखादा म्हणाला ती जागा चांगली नाही, की दुसराही तेच म्हणतो. मग तिसराही.
याद्या
3156
गुलमोहर सोसायटी, हत्ती आणि 'शेर'
"या वर्ष-अखेरीच्या पार्टीसाठी एक नवीन कल्पना सुचली आहे, " परुळेकर मामा बाल्कनीत येत मला म्हणाले,
"नाही तरी 'व्हर्च्युअल गेट-टुगेदर' आहे, तर फक्त गप्पा मारुया. प्रत्येकानं २०२० मध्ये घडलेली एक तरी सकारात्मक किंवा आनंददायी घटना सांगायची."
"विचार करून सांगतो, " मी म्हणालो.
वास्तविक, गप्प बसून राहणे, गप्पा मारत बसणे किंवा अगदी गप्पी मासे पाळणे या 'गप्प' च्या बाराखडीत येणाऱ्या कुठल्याही क्रियेला माझा कधीच विरोध नसतो. मामांनाही हे माहिती आहे. आम्ही आपापल्या बाल्कन्यांमधून अशी चर्चा गेली वीस-बावीस वर्षं करत आलो आहोत.
याद्या
3665
बालकथा - वेदिका शहाणी झाली.
श्रुतिका आणि वेदिका दोघी छान मैत्रिणी होत्या. बागेत रोज भेटायच्या, मजा करायच्या. श्रुतिकाला वेदिका फार आवडायची. तिचे नीटनेटके कपडे, गळ्यातल्या छान छान माळा,गोड गाणी म्हणणं, गोड बोलणं. वेदिका होतीही मोठी हुशार आणि दिसायची पण कित्ती छान!
श्रुतिकाला फार वाटायचं की आपल्याला पण वेदिका सारखं सगळं छान जमलं असतं तर!
सुट्टीत श्रुतिका वेदिकाकडे रहायला गेली. दोघी पहिल्यांदाच एकत्र रहात असल्याने दोघीही जाम खूष होत्या. वेदिका च्या आईन श्रुतिका येणार म्हणून तिची आवडती इडली केली होती. दोघी खायला बसल्या. श्रुतिकाने सगळं छान संपवलं , पण वेदिका मात्र अखंड बडबड करत बसलेली.
याद्या
2434
शिक्षणाचे मानसशास्त्र: परीक्षार्थी शिक्षण - जमेची बाजू
मागच्या लेखात Teaching to the test किंवा परीक्षार्थी शिक्षणाचे दोष बघण्याचा प्रयत्न केला. पण शास्रोक्त (scientific) आणि न्याय (logical) विचार करून निर्णयाकडे यायला हवे आणि त्या निर्णयाला सारासार (practical and pragmatic) विवेक बुद्धीची जोड हवी. शिक्षणाचा हाच तर अंतस्थ हेतू आहे ना? (Critical thinking).
परीक्षा पद्धतीवर जास्त लिहिले आहे, पण परीक्षार्थी शिक्षणावर माझे विचार कुठून येतात हे सांगण्याचा प्रयत्न आहे.
सार्वजनिक परीक्षा पद्धतीची सुरुवात
परीक्षार्थी शिक्षण पद्धत ही सार्वजनिक निवड/पात्रता परीक्षेच्या अनन्यसाधारण महत्वामुळे अस्तित्वात आली हे सांगायला नको, पण सुरुवात इथून होते.
याद्या
1994
नालायक .
नालायक .
प्रसिद्ध छायाचित्रकार रमेश जाधव यांना स्वतःबद्दल खूप अभिमान होता.
आज सकाळी सुद्धा ते सकाळी आपला नेहमीचा पाळायचा व्यायाम करून घरात आले तेव्हा त्यांच्या चालीतून तो जाणवत होता. ते आत आले तेव्हा त्यांच्या घरचा फोन वाजत होता.
ते आपल्या नेहमीच्या रुबाबदार चालीने दिवाणखान्यातील फोन जवळ गेले. “किती वेळ वाजतोय हा कुणास ठाऊक ? घरी काय माणसे नाहीत की काय ?” असे म्हणत त्यांनी फोन उचलला.
“ मी रमेश जाधव बोलतोय ..” फोन कानाला लावत ते आपल्या नावाच्या उच्चारात रमेश यावर जास्त जोर देत म्हणाले.
याद्या
10605
मिसळपाव
