Skip to main content

लेख

भाषा: लोकसंस्कृतीचे वाहन (Culture expresses itself through Language)

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 01/04/2021 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे भाषा हे लोकसंस्कृतीचे वाहन आहे. भाषेचा जन्म लोकसंस्कृतीतून होत असतो. लोकसंस्कृतीतील वस्तूंचा जसजसा लोप होऊ लागतो तसतसा त्या संदर्भातील भाषेचाही र्‍हास होऊ लागतो व भाषा नवे रूप घेते. येथे मराठी व अहिराणी भाषांतील काही शब्दांचे उदाहरण घेऊन मुद्दा स्पष्ट केला आहे. उदाहरणार्थ आड : गावागावातील आड जसे नामशेष होत आहेत, तसे आड संदर्भातील शब्द- संज्ञा- वाक्‍प्रचार भाषेतून लुप्त होत आहेत.

शोध आणि धागेदोरे: Research and References

लेखक लेखनवाला यांनी बुधवार, 31/03/2021 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
********** माझी नवी कथा "शोध आणि धागेदोरे (Research and Refrence)" आता अमेझॉन किंडल (Amazon Kindle) वर ईबुक स्वरूपात उपलब्ध. किंडल अनलिमिटेड सेवेत मोफत (Free with Kindle Unlimited membership). https://www.amazon.in/dp/B091FD93LS त्यांची सुरवातीची काही पान मिपाकरांच्या सल्ल्यानुसार इथे वाचायला देत आहे.

गोष्ट सांगा आणि गणित शिकवा... 6

लेखक राजा वळसंगकर यांनी शनिवार, 27/03/2021 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
To every problem, there is a most simple solution. हे चिंट्या जितके सहज म्हणाला, तितके सहज उत्तर मिळेल याची कुणालाच खात्री नव्हती. पण शोधले तर पाहिजेच! त्याशिवाय गत्यंतर नव्हते... ************************** गोष्टीचा आधीचा भाग.... इथे टिचकी मारा ************************** तिकीटघरात टेबलावर बसून सगळे आयडिया लढवू लागले. बोटीला स्टीयरिंग आहे तर मग काय प्रॉब्लेम आहे? प्रवाहामुळे बोट ओढली गेली तर स्टीयरिंगने ने जागेवर आणता येणार नाही का?

पिफ्फ, पायरसी आणि शिफ्ट ७२

लेखक चौथा कोनाडा यांनी गुरुवार, 25/03/2021 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
लॉकडाऊन २०२० नंतर "न्यू नॉर्मल" होण्यासाठी सर्वांचे निकराचे प्रयत्न सुरु झाले. तळागाळातील बहुतेक लोकांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला होता. करमणूक क्षेत्र देखील याला अपवाद नव्हते. काही मोठ्या कलाकारांनी बॅकस्टेज कलावंतासाठी मदत उभा करून त्यांना दिलासा द्यायाचा प्रयत्न केला. सिनेमागृहे निर्बंधासह उघडली तरी प्रेक्षकांनी पाठच फिरवली. अन याच पार्श्ववभूमी वर चित्रपट महोत्सव होणार की नाहीत अश्या चर्चा रंगायला लागल्या.

दिसला गं बाई दिसला

लेखक VRINDA MOGHE यांनी गुरुवार, 25/03/2021 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
*दिसला गं बाई दिसला* गेल्या जूनमधेच कान्हा टूर करून रिकाम्या हाताने (म्हणजे- रिकाम्या डोळ्यांनी) आणि जड पावलांनी परतलो होतो. तेव्हा वेळेअभावी बांधवगड ठरवलं नव्हतं. पण या वर्षी परत तोच सळसळत्या उत्साहाचा झरा घेऊन कटनीला पोहचलो..ट्रेन दोन तास लेट झाली होती..तरी उत्साह कायम होता. रात्री आठला कटनी स्टेशनहूनच ताला(बांधवगड) च्या "सन रिसाॅर्ट" च्या मॅनेजरने पिकअप साठी अरेंज केलेल्या इनोव्हाने सहा जणांचं उत्साही पथक निघालं. रस्ता फारच छान होता. खड्ड्यांचं नामोनिशाण नव्हतं. रस्त्यांवरच लावलेल्या रेडीयम सारख्या चमकदार पट्ट्यांमुळे वाटेवर दिवे अंथरलेत की काय असं वाटत होतं.

गोष्ट सांगा आणि गणित शिकवा... ५

लेखक राजा वळसंगकर यांनी शनिवार, 20/03/2021 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट सांगा आणि गणित शिकवा... 5 नेहा, चिंट्या सायली तिघे ही चक्रावले... सॅमीने त्याचा खुर्चीच्या मागे, त्याला न दिसणाऱ्या दिव्याचा रंग कसा ओळखला असेल? कॅप्टन नेमोंच्या उत्तरात काय क्लु होता? काय दिसले असेल त्यांना? ************************** गोष्टीचा आधीचा भाग .... इथे टिचकी मारा ************************** "4 दिवे" – कानात "विचार" कुजबुजली. मग 5वा, त्यांचा खुर्चीच्या मागे लागलेला दिवा कुठला?

४. रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल : द्रविड चळवळ, तमिळींची प्रादेशिक आणि राजकीय अस्मिता

लेखक चौथा कोनाडा यांनी बुधवार, 17/03/2021 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग: ३. रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल : तमिळ भाषाभ्यास व द्रविडी भाषांचे तुलनात्मक व्याकरण तमिळ भाषा शिकल्यानंतर त्यांनी त्यातील साहित्यावर मनापासून प्रेम केले आणि त्याच्या वैशिष्ट्यावर संशोधन करण्यास सुरवात केली. " द्रविडी भाषा समुह " हा शब्दप्रयोग करणारे ते पहिले भाषा अभ्यासक होते. तमिळ बरोबरच त्यांनी तेलगू, कन्नड आणि मल्याळममधील समानतांबद्दल प्रचंड संशोधन केले.

बोली मन्ही अहिराणी, जशी दहिमान लोणी

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 15/03/2021 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे (काही वर्षांपूर्वी ‘लोकसत्ता’च्या ‘लोकरंग’ पुरवणीत प्रकाशित झालेला हा माझा लेख. अलीकडे सोशल मीडियावर माझं नाव वगळून फिरत आहे. म्हणून हा लेख आजच्या ब्लॉगवर मुद्दाम देत आहे. या लेखाचं आता पुनर्लेखनासह संपादन करायचं होतं, पण लेखकाच्या नावाशिवाय फिरणार्‍या लेखाशी तो तंतोतंत जुळावा म्हणून जसाच्यातसा...): अहिराणी भाषा विस्तीर्ण भूप्रदेशात बोलली जाते. विस्तीर्ण प्रदेशात पसरलेल्या एकाच भाषेची कालांतराने वेगवेगळ्या भाषांत वेगवेगळी रूपे होत जातात. हे भाग एकमेकांपासून जितक्या लांब अंतरावर असतील तितका त्यांच्यातला भेद अधिक तीव्र असतो.

३. रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल : तमिळ भाषाभ्यास व द्रविडी भाषांचे तुलनात्मक व्याकरण

लेखक चौथा कोनाडा यांनी सोमवार, 15/03/2021 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग: २. रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल : इडयनगुडीत पोहोचल्यानंतर शनारांची ही परिस्थिती जगासमोर मांडावी या चांगल्या हेतूने त्यांनी "तिरुनेलवेलीचे शनार्स" ही पुस्तिका प्रसिद्ध केली. यामुळे शनारांची दखल घेतली जाऊन त्याच्या मित्रांनी आणि इंग्लंडच्या लोकांनी मदत केली. पण हे करताना शनार समुदायाचाच काहीतरी गैरसमज झाला आणि ते दुखावले गेले. जड अंतःकरणाने पुस्तिका मागे घ्यावी लागली. त्यांच्या मते सवर्णांच्या काटकारस्थानामुळे शनारांच्या प्रगतीत बाधा आली.

सापशिडी

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 13/03/2021 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
सापशिडीचा खेळ लहानपणी आपण सर्वांनीच खेळला. कधी भावा बहिणीं तर कधी मित्रांन आणी अगदीच कोणी नसेल तर आजी आजोबान बरोबर. भांडणे झाली, सापाच्या तोंडातून वाचण्यासाठी अगदी खोटारडेपणा केला. आजकाल नातवंडा बरोबर, कुणी कुणी लग्नानंतर नवीन बायको बरोबर सुद्धा खेळले असतील. सोगंटी ९८ वर पोहचल्यावर सगळ्यांच्या छातीत धडधड झाली असेल आणि, देवा दोनच च दान दे, आशी प्रार्थना केली असणार तर बाकीच्या खेळाडूंनी देव याला एकाच च दान देणार म्हणून चिडवले असणार. कारण ९९ वरचा साप पाचवर खाली घेऊन येतो. थोडक्यात काय तर हा सर्वकालिक,सर्वाधिक आवडणारा खेळ आहे. पण कधी प्रश्न पडलाय का :- खेळाचा जनक कोण?