Skip to main content

लेख

जादूगार (रहस्यकथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी रविवार, 18/04/2021 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
  जादूगार (रहस्यकथा) गतकाळात घडलेल्या काही घटनांचे पडसाद, तुमच्या अंतर्मनात असे काही उमटलेले असतात की, त्यांच्यापासून तुमची सुटकाच होऊ शकत नाही. आता हेच बघा ना, इतर लोकांना जादू, जादूचे खेळ, ती जादू करणारा जादूगार किती आवडतात! अगदी मनापासून! अगदी तन मन हरपून ते जादूचे खेळ पाहतात. पण माझे तसे नाही. मला जादूगार अजिबात आवडत नाही. आणि त्यांचा तो जादूचा खेळ तर, मुळीच नाही. उलट या अशा जादूगाराबद्दल, मला अतिशय घृणा वाटते. सरसकट सगळे जादूगार हे धोकेबाज, कावेबाज आणि मतलबी असतात, अशी माझी पक्की धारणा आहे. ते तुम्हाला कधी फसवतील, कधी तुमच्यासोबत धोकेबाजी करतील, याचा नेम नाही.

गोष्ट सांगा गणित शिकवा .... 8

लेखक राजा वळसंगकर यांनी शनिवार, 17/04/2021 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता पर्यंत: अंतराळात भ्रमण करून ज्ञानाच्या सीमा वाढवण्याच्या मोहिमेवर टीम पुणेला आय आर एस आर्यभट्टवर कॅप्टन नेमोंनी सहकारी म्हणून स्वीकारलं होतं. सध्या त्रिकोणी ग्रहावर... एरेटॉसथिनिस काकाबरोबर समद्वीभुज खंडाकडे जायला निघाले... गोष्टीचा आधीचा भाग.... इथे टिचकी मारा ************************** माझ्यासाठी विंडो सीट बुक कराल का प्लिज एरेटॉसथिनिस काका? सायलीने पटकन आपला क्लेम लावला. मला पण ... चिंट्याने सूर मिसळला.

Index Investing भाग १

लेखक अतरंगी यांनी शनिवार, 17/04/2021 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
गुंतवणूक हा तसे पहायला गेले तर फार मोठी व्याप्ती असलेला आणि व्यक्तिसापेक्ष विषय आहे. गुंतवणूक कधी, कुठे, किती करावी याविषयी आंतरजालावर मुबलक प्रमाणात लेखन आहे. आजही अनेक जण स्वतःच्या ज्ञानानुसार याविषयी लिहित असतात. गुंतवणूक करण्यासाठी अनेक पर्याय आहेत, त्यातील एक म्हणजे कंपन्यांचे समभाग म्हणजेच शेअर्स आणि म्युच्युअल फंड्स. आजमितीला भारतात ५०४४ कंपन्यांचे शेअर्स लिस्टेड आहेत आणि हजार एक म्युच्युअल फंड आहेत. यात नक्की कोणत्या शेअर्स/फंड मधे गुंतवणूक करावी आणि किती हे ठरवणे हा फार अभ्यासाचा आणि क्लिष्ट विषय आहे.

हॅपी होली - एक चिंतन

लेखक पुष्कर यांनी शुक्रवार, 16/04/2021 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
आज काल धुलीवंदनाच्या दिवशी मधूनच कोणीतरी अचानक समोर येतो आणि "हॅपी होली" असं काहीतरी म्हणत तोंडावर रंग फासतो. तेव्हा "अरे अरे .... हा तो दिवस नाही" असं म्हणण्याची संधी देखील मिळत नाही. रंग लावल्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, पण आज धुळवड असते. रंग हा रंगपंचमीला लावतात - अशी आपली एक संकल्पना लहानपणापासून मनात फिट्ट बसलीये. हे म्हणजे नागपंचमीला कोणी "हॅपी राखीपौर्णिमा" असं म्हणून हातात राखी बांधली तर त्या भावाला किती विचित्र वाटेल, तसं धुलीवंदनाला कोणी रंग लावला कि वाटतं. आपल्याकडे "होळी" म्हणजे कालचा, म्हणजे धुलीवंदनाच्या आधीचा दिवस.

रंगुनी रंगात सार्‍या

लेखक पुष्कर यांनी शुक्रवार, 16/04/2021 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
२००८ ची गोष्ट आहे. कामानिमित्त मुंबईला राहत होतो, तेव्हा एक मित्र मला म्हणाला 'परवा होळी आहे. येणार का रंगपंचमी खेळायला?' पुण्यात सदाशिव पेठेत बालपण घालवलेला मी ह्या प्रश्नावर साडेतीन ताड उडालो. माझ्यातला व्याकरण-नाझी जागा झाला. होळीला रंगपंचमी कशी काय? मुळात 'पंचमी' ही तिथी होळीपौर्णिमेनंतर ५ दिवसांनी येते त्यामुळे 'पौर्णिमेला पंचमी खेळणे' म्हणजे ख्रिसमसच्या रात्री फटाके उडवून हॅप्पी न्यु यिअर करणे किंवा संक्रांतीला ध्वजवंदन करून गणतंत्रदिन (चिरायू होवो वगैरे) साजरा करणे अशी क्षणचित्रं माझ्या डोळ्यासमोर तरळून गेली.

आवाज बंद सोसायटी - भाग ४

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 16/04/2021 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
यामागील भाग: http://www.misalpav.com/node/48651 :: आवाज बंद सोसायटी - भाग १ http://www.misalpav.com/node/48652 :: आवाज बंद सोसायटी - भाग २ http://www.misalpav.com/node/48658 :: आवाज बंद सोसायटी - भाग ३ परिणाम ध्वनी, आवाज, गोंगाट तसेच ध्वनी प्रदूषण आदींबद्दल वर आपण चर्चा केली.

करोनाचा इशारा

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 15/04/2021 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे आजपर्यंत जगात अनेक साथी येऊन गेल्या असल्या तरी आज संपूर्ण जग करोना साथीपुढे हतबल झालं आहे. जगाने असा दीर्घकालीन लॉकडाऊन याआधी अनुभवला नव्हता. करोनाने माणसाच्या अस्तित्वालाच सुरुंग लावला. अर्थव्यवस्थेला प्रचंड हादरा दिला. मात्र अजूनही अनेक लोक करोनाला गांभीर्याने घेत नाहीत. ज्यांच्या कुटुंबात, नातेवाईकांत, मित्रमंडळीत करोनाने जीव घेऊन वा जबर आर्थिक कींमत मोजून जोरदार धक्का दिला तेवढेच लोक जागरुक असल्याचं दिसून येतं.

फिरुनी नवी जन्मेन मी..........

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी मंगळवार, 13/04/2021 08:45 या दिवशी प्रकाशित केले.
फिरूनी नवी जन्मेन मी….! समोरचं फाटक उघडलं, आणि आमची गाडी बापटांच्या बंगल्यात शिरली. प्रशस्त दिमाखदार वास्तू , जणू हसून स्वागत करत होती. खूप मोठी जागा, अन् तेवढाच मोठा बगीचा...! एप्रिल महिना असल्यानं, मोगऱ्याचा वास सर्वत्र दरवळला होता. रंगीबेरंगी फुलांची छोट्या झुडपांवरची नैसर्गिक सजावट लक्ष वेधून घेत होती. मन अगदी प्रसन्न झालं. पोर्चमध्ये गाडी थांबली, आणि आम्ही तिघं उतरलो. श्रीराम बापट, हे एक प्रतिष्ठित बांधकाम व्यवसायिक, आणि माझे पती नचिकेत साने हे यशस्वी उद्योजक..! काही महिन्यांपूर्वी पाटणकर डॉक्टरांच्या मुलाच्या लग्नात या दोघांची ओळख झाली होती.

तो कोण होता? (कथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी सोमवार, 12/04/2021 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या दोघांची भेट घडणे हा निव्वळ योगायोग असेल, असे मी अजिबात म्हणणार नाही. तो योगायोग असूच शकत नाही. योगायोगाने जुळून येणाऱ्या गोष्टी, एवढ्या समर्पक असूच शकत नाहीत. बहुतेक एखाद्या अदृश्य शक्तीनेच आम्हाला एकमेकांशी भेटवले असणार. पण एक गोष्ट कबुल करेन मी, या आमच्या भेटीचे सर्व श्रेय त्यालाच जाते. तोच माझ्याकडे आला होता. अगदी अनाहूतपणे. तो मला भेटला! बोलला! तेव्हा मला जाणवले की, त्याचे मला भेटणे किती जरुरीचे होते. त्याची भेट मी आयुष्यभरात कधी विसरेन, कधी तो विस्मरणात जाईल असे होणारच नाही. त्या एका भेटीत मला तो किती अचंबित करून गेला? हे केवळ माझ्या अंतर्मनाला माहीत.

आवाज बंद सोसायटी - भाग ३

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 12/04/2021 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचे दोन भाग: http://www.misalpav.com/node/48651 :: आवाज बंद सोसायटी - भाग १ http://www.misalpav.com/node/48652 :: आवाज बंद सोसायटी - भाग २ व्याख्या व विकास एखाद्या वस्तूमधून निघणार्‍या सामान्य ध्वनीला आवाज म्हणतात.