काही विचार स्वताःचे आणी काही दुसर्यांचे, आयुष्यातील यशापयशाचा आढावा घेताना डोक्यात उडालेला गोंधळ.
ज्ञात अज्ञात लेखकांचे आभार.
" कात्रजच्या घाटात वरती डोंगरावर काही माकडे खेळत होती, दोन तरुण मुलं मोटर सायकल वर सातारकडे जात होती मोटरसायकल बोगद्यात प्रवेश करत असताना अचानक मोठा दगड वरून गडगडत आला आणी पाठीमागे बसलेल्या तरूणाच्या डोक्यात पडला आणि मृत्यूला कारणीभूत झाला". रेडिओवर ही बातमी कदाचित तुम्ही सुद्धा ऐकली आसेल.
मनात विचार आला आसे का? विचार म्हणजे काय असते? मनातल्या मनात नं कळत चाललेली प्रश्नोत्तरे…… काय चुकलं त्याचं? माकडांचं आणी त्या तरूणाच मागच्या जन्मीचं काही वैर होतं का? हेल्मेट घातलं होतं का? कदाचित वाचला असता जर, गाडीचा थोडा वेग कमी असता तर?, ते कुठेतरी चहा प्यायला थाबंले आसते तर? माकडं तीथे उड्या मारत नसती तर? एक ना अनेक . बातम्या देणारी सुदंरी म्हणाली, प्रारब्ध, नियतीचा खेळ सारा , आणी पुढची बातमी देऊ लागली.
अशी एखादी अप्रत्याशीत घटना घडली की आपण त्याचं कारण शोधायचा प्रयत्न करतो. सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतातच असे नाही मग उत्तर मिळाले नाही की आहेच मग प्रारब्ध, नशीब आणि नियती…
गोविंदाग्रजांची( रामगणेश गडकरी),
‘एखाद्याचे नशीब’ नावाची अर्थपूर्ण कविता.
झाडें जोडुनी पत्रयुग्म फुटले मेघांप्रती याचती,
स्वच्छंदें जलबिंदु तोंच सगळया पानांवरी नाचती;
सारी पालवती, फुलें विहरती, शोभा वरी लोळते,
एखाद्यावर मात्र वीज पडुनी त्या जाळते पोळते !
त्यात ते म्हणतात,’ झाडांवर मेघांची वृष्टि होते. त्यांच्या हिरव्यागार पानांवर जलबिन्दू नाचतात. फुलांनी आणि फळांनी ती झाडे बहरून जातात. पण एखाद्या झाडावर मात्र आकाशातून वीज पडते आणि ते फुलते झाड पूर्णपणे काळवंडून जाते. जळून जाते.’ हे असे का घडते ? या प्रश्नाला त्यांचे उत्तर ‘ एखाद्याचे नशीब’ हेच आहे.
गीतरामायणा तील भरत भेटीचे वर्णन करताना ग दी मा लिहीतात
" माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात
राज्यत्याग काननयात्रा, सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा…"
प्रभू रामचंद्रांचा वनवास हा प्रारब्धाचा भाग म्हणायचं की कैकयीचा दुराग्रह, पुत्र प्रेम का राजा दशरथाची हतबलता.
कैकयीने भारताला राज्य मिळावे म्हणून जिवाचा आटापिटा केला, एवढचं काय आपलं सौभाग्य सुद्धा गमावलं. भरताला राज्य मिळालं का? मग हे विधिलिखित का आणीखिन काही म्हणायचे ?
जन्माने पहिला पांडव असुन, सूतपुत्र म्हणुन हिणविला गेला…. याला त्याची नियती जबाबादर की आईची चुक?
पण जेंव्हा सुतपुत्र अंगराज होतो ते त्याचं कर्तृत्व की नशीब … ?
स्व कर्तृवावर बनलेला,श्रेष्ठ धनुर्धर एकलव्य आपला अंगठा गुरूदक्षिणा देतो हि नियतीच, का गुरू द्रोणांचा दुजाभाव अथवा एकलव्याने एक प्रकारचा जाणून बुजून केलेला आत्मघात ?
आजकाल बर्याच गोष्टी विशेषतः अपघात, आत्महत्या, कुठलही अपयश, किंवा अपेक्षाभंग ह्या सर्वांना माणसं प्रारब्ध, नियती, नशीब यांच्या बरोबर जोडताना दिसतात . या मधे माणसं आपली चुक, अकर्म्यण्यता , दृढनिश्चय आणि आत्मविश्वास यांचा अभाव शोधतांना कधीच दिसत नाही. भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा भविष्यातील चांगल्या वाईट घडणार्या गोष्टींचा संबध जोडताना त्यास प्रारब्ध म्हणावे की त्या व्यक्तीच्या परिश्रमाची फलश्रुती म्हणावे!
सुख अथवा यश “कर्तृत्वा” मुळे आणि दुःख किंवा अपयश “नियती” मुळे असं म्हणुन कसे चालेल ?
माझा प्रश्न असा आहे की नशीब ,प्रारब्ध, नियती म्हणजे नेमके काय? प्रारब्ध म्हणजे सेव्हिंग्ज बँकेतील साठवण आहे का? जर आसेल तर, आपल्याला पाहिजे तेव्हा का नाही वापरता येत. सगळ काही पुर्वसंचीता प्रमाणे आसेल तर कर्म आवश्यक आहे का? जर आपण काही मिळवायचे असेल तर नशीबाचा,प्रारब्धाचा भाग कीती?
प्रारब्ध, विधिलिखित, नियती हे सगळे समान अर्थी शब्द… "पाचविला", म्हणे सटवी बाळाचे भाग्य, नशीब कपाळावर लिहीते. " राधां वाढा उष्टी काढा मेलं आमच्या पाचवीलाच पुजलय", बरेचवेळा बायकांना म्हणातानां ऐकलय. पाचविची पुजा हा श्रद्धेचा भाग.
पण ही श्रद्धा थोडा वेळ बाजुला ठेऊन डोळस पणाने विचार केला तर त्या गूढ शब्दांचे कोडे थोडे सोपे होईल का?
आपल्या आयुष्याला समांतर चालणारी गोष्ट म्हणजे जर का नियती असेल तर मग जसा आपल्या जवळचा माणुस एखाद्या महत्वाच्या क्षणी कसे वागु शकेल हे सांगु शकत नाही तसेच नियती बद्दल पण असेल ना?
एखादी गोष्ट चुकविण्या करता आपण जिवा चा आटापिटा करतो पण नेमकी तीच गोष्ट घडते… काय असेल कारण? अशा वेळेस नियती ला सॉफ्ट टार्गेट ठरवलं जातं का?
“A person often meets his destiny on the road he took to avoid it”
असे असेल तर मर्फीज law नियती ला पण लागु होतो का? “If anything can go wrong, it will go wrong”
मग हाच law “If anything can go right it will go right” असा पण असायला हवा ना?
व. पु. म्हणतात तसे…" माणसाला जन्माला घालण्या मागे त्याला छळावे एव्हढीच फक्त नियती ची इच्छा नसते, ती प्रत्येकाला काही ना काही देऊन पाठवते…. बाकी आपण मिळवायचे असते ! " , आसे आसेल तर
नियती, प्रारब्ध हे शब्द निरर्थक नाही का? या शब्दानां माणसाच्या अपयशाला जबाबदार धरणे विसंगती नाही का? यशाआपयशात माणसांची क्रियाशीलता किंबहुना निष्क्रियतेचा सबंध जोडायचा सोडुन नियती, प्रारब्धाचा कितपत सहभाग ? प्रश्नच प्रश्न.
इंग्लिश मध्ये म्हण आहे ना “Victory has a hundred fathers and defeat is an orphan”
जर नशीब, नियती,कींवा प्रारब्ध आहे आसे मानले तर यश मिळाले म्हणून चांगले नशीब व अपयशाला वाईट प्रारब्ध आसे असायला हवे. नीट विचार केला तर मनुष्य प्राणी बुद्धीमान आहे. त्याला चांगल्या गोष्टींचे श्रेय स्वतःकडे हवे असते तर अपयशाचे खापर तो कुणा दुसर्या वर फोडायला कारण शोधत असतो… म्हणुनच कदाचित फक्त अशुभ नियती दिसत असेल….
आपलेच प्रश्न आणि आपलीच उत्तरे असतात, नीट शांत पणे बघितलं की ही प्रोसेस सहज लक्षात येऊ शकते…
अतिप्राचीन काली गुहेत नागडाउघडा राहणारा हा जंगली माणूस आज आपल्या वातानुकूलित बंगल्यात तर्हेतर्हेची वस्त्रप्रावरणे परिधान करून सुखेनैव राहिला आहे. नाना प्रकारची शास्त्रे त्याने जोपासली. ज्ञान आणि संस्कृती यांची प्रचंड वाढ केली. या सार्या गोष्टीला तुम्ही केवळ प्रारब्ध , केवळ नियती असली ठरीव ठशाची उत्तरे देणार आहात काय?
जर नियती, प्रारब्ध आहे तर आणी दिडशे वर्षानंतर स्वातंत्र्य मिळणार असेल तर वाट बघायचे सोडुन उगाच संघर्ष केला असे आहे का, मुळीच नाही. संघर्ष, बलिदान, असहयोग आंदोलने करून ब्रिटिश सरकारला सळो की पळो केल्यानंतरच स्वातंत्र्य मिळाले नाहितर आजही आपण गुलामच आसतो.
विचार करा, एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली अपयश आले तर तो Dead end न मानता जर T junction समजले आणी उजव्या डाव्या रस्त्याचा पुढच्या वाटचालीसाठी उपयोग केला तर प्रगतीच्या वाटा, ध्येय दृष्टिक्षेपात येईल का नाही ?
आपल्या दृढनिश्चय बुद्धी चातुर्य आणि आत्मविश्वास याच्या जोरावर विधिलिखित बदलणारी,सावित्री, कठोर तपस्ये नंतर मोक्षदायीनी गंगेला भूतलावर आणणारा राजा भगीरथ हे खरं का अंगारे,धुपारे,गंडेदोरे, बाबा, नवस आणी प्रारब्ध, नशिब याच्याशी सांगड घालण्याचा प्रयत्न करणारा ,आणी आयुष्याची फरफट करण्यात धन्यता मानणारा माणुस खरा.
माझं नशीब खडतर, आपल्या नशीबाचा भाग काय करणार ,कपाळकरंटा असे नशिबाच्या नावाने खडे फोडत बसण्याची पेक्षा आत्मनिरीक्षण केल्यास थांबलेली गाडी पुढे सरकण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक संस्कृत सुभाषित शाळेत शिकलोय.
" अलसस्य कुतो विद्या अविद्यस्य कुतो धनम् ।
अधनस्य कुतो मित्रम् अमित्रस्य कुतः सुखम् ॥
यात सगळ्या सुखःदुखा च मुळ माणसाच्या निष्क्रियतेचा , आळशीपणात आहे.
तर हे पण शिकलोय की " आसेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी "
कबीरदास जी कहते है, उसे गौरसे सुनो।
" ज्यों तिल माहि तेल है, ज्यों चकमक में आग ।
तेरा साईं तुझ ही में है, जाग सके तो जाग । "
तेरा मालिक तु ही है तो करम भी तेरे और फलभी तेरा। आगे कबीरदास जिंदगी जिनेका मंत्र दे रहे है उसे ध्यान मे रख।
" जिन खोजा तिन पाइया, गहरे पानी पैठ,
मैं बपुरा बूडन डरा, रहा किनारे बैठ।"
सो पहले कुछभी नही तय हुआ। तुही तेरे किस्मतका धनी है।
पण एक लक्षात घ्या " वीर भोग्या वसुंधरा " आता सर्वस्वी निर्णय तुमचा आहे.
नशीब, नियती, पुर्वसंचीत किंवा प्रारब्ध आसो कींवा नसो, सगळ्यात जास्त आळशी प्राणी अजगराला सुद्धा भोजन मिळवण्यासाठी वळवळ करावी लागते, आपणतर सर्व प्राण्यांच्या मधे बुद्धीमान मनुष्य प्राणी आहोत.
वाचने
17377
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
शुद्धलेखन
शुद्धलेखन
प्रतिक्रिया कळाली नाही.
लेखन आवडले.
Is he lucky?
वाह!
हे वाक्य बर्याच लोकांना मिथ्या वाटत... मज्जा आहे..
In reply to वाह! by Bhakti
कदाचित
In reply to हे वाक्य बर्याच लोकांना मिथ्या वाटत... मज्जा आहे.. by उपयोजक
काय समजलो नाही.. मिथ्या वाटते
In reply to वाह! by Bhakti
विशेष काही नाही.
In reply to काय समजलो नाही.. मिथ्या वाटते by आनन्दा
:)
रच्याकने
घटना प्रारब्धानुसार घडत
शाम भागवत
In reply to घटना प्रारब्धानुसार घडत by शाम भागवत
डॉ.लागूंचा मुलगा तन्वीर हा
परमेश्वर दयाळू वगैरे नसतो.
In reply to डॉ.लागूंचा मुलगा तन्वीर हा by प्रकाश घाटपांडे
देव ही मानवी संकल्पना आहे ....
In reply to परमेश्वर दयाळू वगैरे नसतो. by शाम भागवत
परमेश्वर वेगळा, इश्वर वेगळा व
In reply to देव ही मानवी संकल्पना आहे .... by मुक्त विहारि
सहमत.
In reply to परमेश्वर वेगळा, इश्वर वेगळा व by शाम भागवत
परमेश्वर वेगळा, इश्वर वेगळा व
In reply to परमेश्वर वेगळा, इश्वर वेगळा व by शाम भागवत
परमेश्वर वेगळा, इश्वर वेगळा व
In reply to परमेश्वर वेगळा, इश्वर वेगळा व by शाम भागवत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Vaseegara | Geethiyaa Varman | Music Coverज्याने संपूर्ण विश्व
In reply to परमेश्वर वेगळा, इश्वर वेगळा व by मदनबाण
प्रार्थनास्थळे ही मनुष्य
In reply to देव ही मानवी संकल्पना आहे .... by मुक्त विहारि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Vaseegara | Geethiyaa Varman | Music Cover+ १
In reply to परमेश्वर दयाळू वगैरे नसतो. by शाम भागवत
परमेश्वर दयाळू वगैरे नसतो.
In reply to परमेश्वर दयाळू वगैरे नसतो. by शाम भागवत
तुमचे संवेदनशील तत्वज्ञान
In reply to परमेश्वर दयाळू वगैरे नसतो. by गवि
उपहास? बरं...!!
In reply to तुमचे संवेदनशील तत्वज्ञान by शाम भागवत
मगाशी शेवटचे वाक्य नव्हते
In reply to उपहास? बरं...!! by गवि
असं तत्वज्ञान मांडणाऱ्याला
In reply to उपहास? बरं...!! by गवि
फक्त टास्कमास्टर किंवा tally.
In reply to परमेश्वर दयाळू वगैरे नसतो. by शाम भागवत
कृपाळू म्हणजे काय
In reply to डॉ.लागूंचा मुलगा तन्वीर हा by प्रकाश घाटपांडे
तो दयाळूही नाही. क्रूरही नाही
In reply to कृपाळू म्हणजे काय by Rajesh188
अगदी ..
In reply to तो दयाळूही नाही. क्रूरही नाही by शाम भागवत
डॉ. लागूंसारखे देव न मानणारे लोक
In reply to डॉ.लागूंचा मुलगा तन्वीर हा by प्रकाश घाटपांडे
हे सश्रद्धांना उद्देशून लागू म्हणाले
In reply to डॉ. लागूंसारखे देव न मानणारे लोक by उपयोजक
बघा तुम्ही देव मानीत नाही ना?
In reply to हे सश्रद्धांना उद्देशून लागू म्हणाले by प्रकाश घाटपांडे
हो
In reply to बघा तुम्ही देव मानीत नाही ना? by मराठी_माणूस
Karma - is everything pre-destined.
In reply to डॉ.लागूंचा मुलगा तन्वीर हा by प्रकाश घाटपांडे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Vaseegara | Geethiyaa Varman | Music Coverबालगंधर्व रंगमदिरासमोरील पर्ल
In reply to डॉ.लागूंचा मुलगा तन्वीर हा by प्रकाश घाटपांडे
तो नाही ...
In reply to बालगंधर्व रंगमदिरासमोरील पर्ल by श्रीगुरुजी
बरोबर. त्याचे नाव आनंद होते.
In reply to तो नाही ... by चौकटराजा
हे वाचले होते
हे मात्र खरे आहे
धन्यवाद
बाकी या Eq,sq,aq,iq टेस्ट
फारच मोठी टेस्ट आहे.
In reply to बाकी या Eq,sq,aq,iq टेस्ट by सिरुसेरि