आईला नेहमी काळजी वाटायची की पंगत बसल्यावर तिसर्या भातावर काय वाढायचं?ताक,कढी की सार?त्याचं असं झालं की रोज जेवताना भाजी,लिंबाची फोड, थोडं मीठ,भात,वरण आणि त्यावर तूप असायचं. त्यानंतर दुसरया भातावर आमटी आणि तीसर्या भातावर कधी ताक तर कधी ताकाची कढी तर कधी सार (सोलाची कढी)असायची,
"आई ताक वाढ"
असं दाजीने म्हटल्यावर,
"आज मी ताकाची कढी केली आहे,तुला आज ताकच हवं असणार"
असं आई वैतागून म्हणायची.परत दुसर्या दिवशी असाच वाद असायचा आणि ह्या वेळीही हवा अ़सलेल्या मेनू ऐवजी आईने दुसराच मेनू केलेला असायचा.आणि असं हे रोजच चालायचं.
दह्यात पाणी घालून चिनी मातीच्या बरणीत आई रवीने ताक घुसळत असताना,
"आई तूं कसला विचार करतेस?"
असं मी विचारल्यावर म्हणायची,
"अरे, मी आज ताक केल्यावर तुझा दाजी आज सोलाची कढी जेवतान मागणार बघ"
आईचा जीव तो आपण आवडीने केलेले पदार्थ मुलानी आवडीने खाल्यावर कोणत्या आईला आनंद होणार नाही?आणि मग तसंच व्हायचं दाजी नक्की नसेल तेच मागायचा आणि आई त्याला हवं ते केलं नाही म्हणून कष्ठी हौऊन सांगायची.मी तिच्या कडे बघीतल्यावर मिस्कील हंसायची आणी त्याला हवं ते देता येत नाही म्हणून दुःखी होऊन डोळ्यात आलेली दोन टिपं पदराने पुसायची.मी मनांत म्हणायचो,
"बिचारी आई!"
आणि मग पुढे तोच प्रकार चालायचा.
आनंद असो वा दुःख असो,आईचे डोळे सदैव पणावळलेले असतातच.प्रेमाच्या पाण्याने ओथंबलेलं तीचं ह्रुदय- दुःख किंवा आनंदाच्या- हाताने पिरगळल्यावर ते प्रेमाचे पाणी डोळ्या वाटे वाहू लगलं नाही तर नवलच म्हणावं लागेल.
आईच्या अशा प्रेमळ वागण्यावर मी एक कविता पण लिहीली आहे ती तुम्ही कुठेतरी वाचालच.
अण्णा आमचे, वाद जास्त न वाढता कसा मिटवावा यात मोठे वाकबगार.त्यानी उपाय सुचवला.उद्या पासून आपण सर्वानी तीसरया भाताच्या वेळी असं म्हणायचं,
"आई,कढी,सार,ताक असात तां."
त्यापासून आई असेल तेच वाढायची आणि दाजी असेल तेच जेवायचा
नंतर आम्ही गमंतीत म्हणत असूं.
"कढी,सार, ताक असात तां!"
श्रीक्रुष्ण सामंत
वाचने
5095
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदी असंच
आभार
In reply to अगदी असंच by रेवती
मस्त आहे..
आभार
In reply to मस्त आहे.. by प्राजु
इमोशनल झालो
आभार
In reply to इमोशनल झालो by टारझन
सुंदर.
In reply to आभार by श्रीकृष्ण सामंत
स्ट्रेस कमी होतो
In reply to सुंदर. by नारायणी
आई ग!
आभार
In reply to आई ग! by लवंगी
खुप छान
आभार
In reply to खुप छान by ऋचा
पहिला, दुसरा, तिसरा भात म्हणजे ??
समजावून सांगतय हा!
समजले
In reply to समजावून सांगतय हा! by श्रीकृष्ण सामंत
सोपा उपाय
आभार
In reply to सोपा उपाय by ३_१४ विक्षिप्त अदिती
त्यापासून
आभार
In reply to त्यापासून by विसोबा खेचर