प्रिय.. ,
नेहमीप्रमाणे आजही, लग्नाच्या चाळीस वर्षांनंतरही मायन्याशी अडखळतेय मी. अशी कित्येक पत्र पाठवलीत. दरवेळी तुमच्याकडून तत्परतेनी उत्तर आलं. यावेळी ती अपेक्षा नाही.
आज सकाळपासून आपल्या एकत्र आयुष्याचा सारिपाट डोळ्यांपुढे उलगडलाय. चुकलेल्या चाली, सावरून घेतलेले डाव सारं काही. नवं नवरीपण जाऊन, पुरती गृहिणी होऊन फुललेल्या संसारात तुमच्याबरोबर कधी रमले ते कळलं नाही. माझ्या भित्र्या, संकोची स्वभावाला तुमच्या निर्भिड, रोकठोकपणाचं balance out , हो हा देखील तुम्हीच शिकवलेला शब्द, करणारं व्यक्तिमत्व सावरून घेत गेलं.