मेमांडू--एक अनुभव.
येथे मलेशियात 'मेमांडू' म्हणजे ड्रायव्हिंग,मोटारचालकत्व.भारतात असताना आपण गाडी चालवावी,त्याचा निदान परवाना तरी आपल्याकडे असावा असे मला मनापासून कधीच वाटले नव्हते.उलट नवर्याने गाडी चालवावी आणि आपण शेजारच्या सीटवर बसून खुशाल त्याच्या ड्रायव्हिंगवर ताशेरे ओढावेत्,जमल्यास एखादी डुलकी काढावी एवढाच काय तो प्रवासात माझा सहभाग असे.पण इथे मलेशियात आल्यावर मात्र माझी पंचाईतच झाली.पब्लिक ट्रान्सपोर्ट सर्रास नसल्यामुळे सारखेच गाडीसाठी दुसर्यावर अवलंबून राहावे लागे आणि दुसरे म्हणजे माझ्याहून वयाने लहान स्त्रिया मोठ्मोठ्या गाड्या सहजपणे चालवितात हे पाहून मला एक प्रकारचा न्यूनगंड येऊ लागला.आता आपणही कांहीत
मिसळपाव