Skip to main content

लेख

प्लँचेटचे प्रयोग

लेखक हेमंत बर्वे यांनी रविवार, 14/03/2010 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
मला आठवतं आहे तेव्हापासूनच्या लहानपणाच्या आठवणी समर्थ नगरशी संबंधीत अशा आहेत. समर्थ नगर म्हणजे चुनाभट्टीचं समर्थ नगर. आमच्या समर्थ नगरातल्या इतर मुलांसारखाच मी पण होतो. फरक एव्हढाच होता की मी इतर मुलांपेक्षा मनस्वी होतो. आई शाळेत जायची , ताया दोन्ही माझ्यापेक्षा मोठ्या ,दादा म्हणजे दादा सगळ्यात मोठा.वडील अकाली गेलेले.त्यामुळे माझ्या मनस्वी वागण्याला मोकळा वाव मिळाला. आधी लहान म्हणून फारसं लक्ष कुणी दिलं नाही पण मग मनस्वी पणाल एक हट्टीपणाची झाक आली. शाळेत हुषार . पहील्या पाचात नंबर .शेजार पाजार सुशिक्षीत ब्रह्मवृंदांचा. पण इतर मुलांपेक्षा मी वेगळा होतो हे नक्की. सवयी स्वच्छ.

वीजेची गायब-जादू!

लेखक अरुंधती यांनी बुधवार, 10/03/2010 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
लहान असताना जादूच्या समस्त प्रयोगांनी मला जबरदस्त मोहिनी घातली होती. माणसाचे कबूतर होते, कबुतराची फुले होतात, फुलांचे रंगीबेरंगी रूमाल होतात.... आणि ह्या सगळ्या भरात मूळ कोणती वस्तू गायब झाली हेच तुम्ही विसरून जाता. जादूगार खूष, तुम्हीही खूष! पैसा वसूल!! पण गायब झालेली वस्तू मिळते का हो परत? अहो, ती जादू असते.... त्यात सर्व काही शक्य असते. जादूच्या ह्या नियमाला शिरोधार्थ मानणारी मी.... त्यामुळे एखादी वस्तू जादूने गायब झाली असे कोणी सांगितले तर त्यावर माझा लगेच विश्वास बसत असे. आजही परिस्थिती फारशी वेगळी नाही.

इमर्जन्सी - २

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 09/03/2010 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
तो लेकाला खांद्यावर सावरत माझ्याकडे हसत हसत बघत.. "चल आत जाऊया" असं म्हणाला. जाऊदे ...त्याला काय कळणार ! आम्ही आतमध्ये गेलो. ------------------------- आतमध्ये गेल्या गेल्या पडद्या-पड्द्यानी बंद केलेल्या एका रूममध्ये मला नेलं. त्या गुलाबी रंगाच्या झगा घातलेल्या नर्सने पट्टेरि पट्टेरी (मुंबईचा जावई सिनेमामध्ये शरद तळवळकर ज्या प्रकारच्या अर्ध्या पँटीत हिंडत असतो तसल्या )कापडाचा गाऊन म्हणून काहीतरी घालायला दिलं. "प्लिज टेक ऑफ योर क्लोथ्स अण्ड वेअर दिस गाऊन" अशी विनंती वजा आज्ञा करून ती चालती झाली. तो सो कॉल्ड गाऊन मी उघडला.

लोकशिक्षण ही गुरुकिल्ली

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी सोमवार, 08/03/2010 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
लोकशिक्षण ही गुरुकिकिल्ली
सांडपाण्याच्या व्यवस्थापनाला पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्व आहे. अमेरिकेसारख्या देशातही ही समस्या आहे. समरव्हील या शहरात त्या दृष्टीने अभ्यास करण्यात आल. भारतातही या प्रश्नी खुप काही करणे शकय आहे फक्त त्यासाठी लोकशिक्षण सर्वात महत्वाचे आहे. ....... पुढे वाचा हा दैनिक सकाळ दि. ८ मार्च २०१० च्या पुणे आवृत्तीत लेख वाचल्यावर लिखाण ओळखीचे वाटायला लागले. पण हे विठ्ठल देशपांडे कोण बाबा?

स्वच्छतेच्या बैलाला...

लेखक नीधप यांनी सोमवार, 08/03/2010 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
२००८ च्या हितगुजच्या दिवाळी अंकासाठी लिहिलेला हा लेख. दिवाळी अंकाचा म्हणून इथे टाकला नव्हता. तो आज कुणीतरी वेगळ्या शीर्षकाने इथे टाकला. प्रकरण मिटले पण लेखातली समस्या मिटलेली नाही. तेव्हा महिलादिनाच्या निमित्ताने परत तोच लेख इथे टाकतेय. ------------------------------------------------------- "इथे लेडीज टॉयलेटची सोय कुठेय?" प्रॉडक्शन मॅनेजर जयंतला मी विचारलं. एका आडगावात शूट होतं. संपूर्ण दिवस आम्ही त्या एकाच जागी शूट करणार होतो. अश्या वेळी पर्याय नसल्यामुळे हे विचारण्याचा निर्लज्जपणा मी अंगी बाणवून घेतला होता.

इमर्जन्सी! -१

लेखक प्राजु यांनी रविवार, 07/03/2010 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
इमर्जन्सी.. दि. मार्च १, २०१०. सकाळपासून चहाशिवाय चालत नाही या सबबी खाली टमरेल भरून चहा, आणि सोबत बरंच सटरफ़टर खाऊन झालं होतं. वेळ जात नव्हता म्हणून की काय अधे मध्ये (खाण्यातून ) वेळ मिळेल तेव्हा, इमेल चेक करणे, त्यांना उत्तरे देणे, आणि घरातलं काम हे ही करत होते. आदल्या दिवशी होळीरे होळी पुरणाची पोळी असा शंख करत पुरणाच्या पोळ्या हादडल्या होत्याच. पुरणाची पोळी दुसरे दिवशी सुंदर लागते, त्यामुळे ती खायला हवीच, अशी मनाची समजूत घालून भरपेट नाष्टा केल्यावर , दुपारचं जेवणंही तितकंच व्यवस्थित केलं होतं.

तात्यांचे आणि मिसळपावचे अभिनंदन ( लोकसत्ता ०७/०३/२०१०)

लेखक JAGOMOHANPYARE यांनी रविवार, 07/03/2010 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या लोकसत्तामध्ये मिसळपाव आणि तात्या यांची एक बातमी आहे. अभिनंदन. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=52…

सूर्याची सावली...

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 07/03/2010 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक समर्पित प्रचारक, धुरंधर राजकारणी आणि ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी चित्रकूट येथे निधन झाले. अखेरच्या श्वासापर्यंत समाजासाठी आयुष्य वेचणार्‍या या महान आणि दुर्मिळ जीवनव्रतीचा कौटुंबिक जिव्हाळ्यातून उतरलेला एक सुंदर लेख 'लोकमत' मध्ये प्रसिद्ध झालाय. तो हा लेख : सूर्याची सावली गाढ झोपेत असतानाच अचानक फोन वाजला, आणि झोप चाळवली. इतक्या पहाटे किंवा रात्रीबेरात्री वाजणारे फोन घेणं अलीकडे मी टाळतो. पण त्या दिवशी फोन वाजताच मला जाग आली, आणि मी फोन कानाला लावला. पलीकडे मुंबईहून माझा भाऊ होता... 'रमेश, नानाजी गेले'...

माझे संत्रापुराण

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 04/03/2010 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
परवा घरी आलेल्या पाहुण्यांनी चांगली केशरी जर्द, रसरशीत दिसणारी स्टीकर लावलेली संत्री 'खाऊ' म्हणून आग्रहाने हातात कोंबली. ऐन उन्हाळ्यात, पारा ३६ डिग्रीज सेल्सियस च्या आसपास असताना अशी 'खाऊभेट' म्हणजे मनपसंतच! अस्मादिक एकदम खूषच! संत्र्यांचा रंग, रूप पाहूनच खूप छान वाटत होते. काल दुपारी उन्हाने जीव हैराण झाला असताना अचानक त्या संत्र्यांची आठवण झाली. मोठ्या अधीरतेने त्यातली दोन संत्री सोलायला घेतली. पण काय हो! हे प्रकरण जरा अजब दिसत होते!

राजमाची

लेखक प्रचेतस यांनी बुधवार, 03/03/2010 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारी २७ ला रात्री राजमाचीला जायचे ठरले व आम्ही चौघे रात्री १०.३० च्या लोकल ट्रेनने ११.४५ ला लोनावळ्यात उतरलो. तिथून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर आलो. पुण्याच्या दिशेने काही अंतर पुढेच एक पेट्रोल पंप लागतो. तिथून डावीकडे वळून गुरुकुल मागे टाकून आम्ही तुंगार्ली गावात आलो. तिथून पुढे दृतगती महामार्गाच्या खालून जात आम्ही डोंगराच्या पायथ्याला पोहोचलो. साधारण ४० मिनिटात रेल्वे स्टेशनपासून इथवर येता येते. डोंगर चढून आम्ही तुंगार्ली धरणाची भिंत उजवीकडे ठेवत पांगोळली गावात पोहोचलो. गाव संपताच एक घळ सुरु व्हायची. तो उतार संपला की थेट राजमाचीच मुख्य रस्ता लागायचा.