Skip to main content

लेख

मुतपीठसाठी लेख : कृपया मदत करा

लेखक खटासि खट यांनी शनिवार, 02/02/2013 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
लिखाणाचे निमित्त : खुमखुमी उद्देश : मनोरंजन, विरंगुळा फायदे : मिसळपाववर (कु)प्रसिद्ध होणे टार्गेट ऑडियन्स : मुक्तपीठचे नियमित वाचक प्रस्तावना : नमस्कार सदस्यहो. मला पुण्यनगरी देशी प्रसिद्ध व्हावेसे वाटत असल्याने एक लेख लिहून वर्तमानपत्रास पाठवावयाचे ठरवले. मी तसा चांदोबा. चंपक, ठकठक आणि सकाळ नियमित वाचतो. सकाळ मधे इमारतीच्या शेजारच्या मुतारीचा वास हे पत्र लिहीले होते. ते छापूनही आले होते. पण प्रसिद्धी मिळाली नाही. लोक म्हणतात लेख लिही. मी आवडीने मुक्तपीठ वाचतो. त्यासाठी लेख लिहावा असे मनी आले. एक कच्चा मसुदा आपल्याला दाखवत आहे.

मेसोअमेरिका (६.२) - आस्तेक

लेखक किलमाऊस्की यांनी गुरुवार, 31/01/2013 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखमालिकेतील हा शेवटचा भाग. त्यानिमित्ताने थॊडंसं मनातलं.... माझ्या पहिल्याच लिखाणाला भरपूर प्रोत्साहन दिल्याबद्दल सर्व प्रतिसादक आणि वाचक यांना मनापसून धन्यवाद. मलाही लेखमालिका लिहितांना खूप समाधान मिळालं. तुमच्या प्रश्नांची उत्तर देतांना माझ्याही ज्ञानात बरीच भर पडली. पुन्हा एकदा मनःपुर्वक धन्यवाद. :-) *********************************************************************************************** मागील भाग : मेसोअमेरिका (६.१) - आस्तेक इसवी सनातलं १५ वं शतक जागतिक इतिहासात मैलाचा दगड मानलं जातं.

हे' शास्त्रीय संगीत ' हाय तरी काय राव ? भाग २

लेखक चौकटराजा यांनी गुरुवार, 31/01/2013 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
इथे भाग १ वाचावा आपण पहिल्या लेखांकात पाहिले आहे की राग एक मसाला असेल तर पदार्थ म्हणजे काय बुवा ? ते आता जरा पाहू. राग हा गोडवा निर्माण करण्याचा राजमार्ग आहे. असाच पदार्थ चविष्ट करण्याचा " राजमार्ग" मसाला उत्पादकानी शोधून काढला आहे. असो. तर मी काय म्हणत होतो तर पदार्थ म्हणजे काय? तर पदार्थ म्हणजे " ख्याल" आणि उपशास्त्रीय प्रकार. त्याअगोदर जरा स्वर या संकल्पनेची माहिती घेउ. मानव वंश विकसित होत असताना मानवाने २० ते २०००० हर्टझ या आवाक्यातील निरनिराळ्या ध्वनिलहरी ऐकून घेतल्या.

क्या बात है इस जादूगरकी ? अर्थात ओ पी नय्यर -एक शापित गंधर्व -२

लेखक चौकटराजा यांनी शनिवार, 26/01/2013 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखाचा पूर्वार्ध इथे ओपी नय्यर व निरनिराळी वाधे यांचे अफेअर - ओपीनी कोणकोणती वाद्य प्रामुख्याने वापरली याचा उल्लेख वर आलाच आहे. तंतू वाद्यांचा उपयोग तालवाद्ये म्हणून करणे ही ओपींची खास विशेषता. ओपी व हार्मोनियम- ओपीनी हारमोनियम हे वाद्य ज्या पातळी वर वापरले त्याला तोड नाही. बाबु सिंग हे बिनीचे वादक हारमोनियम हा संयोग हे नय्यर साहेबांच्या ऑर्केस्ट्रातील महत्वाचे बलस्थान आहे.

मनाचिये गुंती..

लेखक यशोधरा यांनी मंगळवार, 22/01/2013 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनाचा अनादि, अनंत प्रवाह, त्यातून तुमच्या आमच्या ओंजळीत येणारे काही क्षण. कधी रेशीमलडींसारख्या उलगडणार्‍या तर कधी धारदार पात्यासारख्या लखलखणार्‍या जाणिवा. अवतीभवतीच्या जगातले आपणच लोक आपापल्या परीनं एकमेकांची सुखदु:खं वाटून घेत असतो, साथसंगत करत असतो, नातीगोती जपायचा मनापासून प्रयत्न करत असतो.

मेसोअमेरिका (६.१) - आस्तेक

लेखक किलमाऊस्की यांनी शुक्रवार, 18/01/2013 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग : "मेसोअमेरिका(६) - आस्तेक " २५ फेब्रुवारी १९७८ ची मध्यरात्र. मेक्सिको सिटी नगरपालिकेच्या वीज कामगारांचं नेहमीप्रमणे खोदकाम चालू होतं. 'झोकालो'(१) च्या आसपास खोदकाम करता करता अचानक २ मीटर खोल अंतरावर सुमारे ८ टन वजनाचा अतिशय सुंदर कोरीवकाम केलेला दगड कामगारांना सापडला. त्यानंतर लगोलग मेक्सिको सिटी आणि आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात उत्खनन चालू झालं आणि यातूनच आस्तेकांबद्द्लची बरीच माहिती उजेडात आली. हा शोध फक्त मेसोअमेरिकाचं नव्हे तर जागतिक पुरातत्त्वक्षेत्रात अतिशय महत्त्वाचा मानला जातो.

रक्तामधील घटकांचे आणि रक्ताभिसरणाचे नियंत्रण

लेखक आनंद घारे यांनी मंगळवार, 15/01/2013 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
शरीरामधल्या रक्ताची विविध प्रकाराने तपासणी करून आणि रक्तदाब, नाडीचे ठोके वगैरे अनेक गोष्टींचा अभ्यास करून त्याचा उपयोग रोग्याच्या शरीराची अवस्था समजून घेण्यासाठी आणि त्याच्या व्याधीचे निदान करण्यासाठी केला जातो. हे करतांना त्याच्या रक्तामध्ये काही दोष किंवा तृटी आढळल्या तर त्यावर औषधोपचार करतात. काही बाबतीत रक्ताच्या तपासणीमध्ये सगळे काही व्यवस्थित निघाले तरी व्याधीच्या निवारणीसाठी त्याच्या गुणधर्मांमध्ये थोडा बदल करणारी औषधयोजना केली जाते.