(चावडीवरच्या गप्पा - अभिजात संगीतोत्सव)
(सोत्री यांची क्षमा मागून).
"उस्तादजींनी म्हणे कहर केला मैफिलीत, आणि त्या झिपर्या, स्मार्ट तबलजीशी जोरदार जुगलबंदी झाली त्यांची. पूर्वी मिथुनदांना गरिबांचा अमिताभ म्हणायचे, तसा गरिबांचा झाकिर हुसेनच म्हणायला हवा या तबलजीला.", चिंतोपंत जगप्रसिद्ध 'खिडकी वड्याच्या' स्टॉलजवळची नुकताच नजरेत भरलेला सौंदर्यफुफाटा नीट न्याहाळता येईल अशी जागा पकडत.
"आजकाल काही राम राहिला नाही या मोठमोठ्या उस्तादांच्या आणि पंडितजींच्या मैफिलीत. असल्या वादनाला 'अभिजात' का म्हणायचे ते त्या शारदांबेलाच ठाउक. एक ना धड भाराभर चिंध्या.
मिसळपाव