Skip to main content

लेख

सर्व मासेषु च उत्तम - कार्तिकाचे कौतुक

लेखक इनिगोय यांनी मंगळवार, 27/11/2012 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
|| वनस्पतीनाम् तुलसी, मासानाम् कार्तिकः प्रियः || || एकादशी तिथी नाम च क्षेत्रम् द्वारका मम || स्कंद पुराणातल्या या श्लोकात श्रीकृष्णाच्या प्रिय गोष्टींमध्ये ज्याचं नाव येतं तो सर्व महिन्यांत श्रेष्ठ असलेला महिना म्हणजे कार्तिक महिना. या महिन्यात श्रीविष्णू, श्रीराम, श्रीकृष्ण, विठ्ठल, शिवशंभू या देवांच्या विविध प्रकारे उपासना करतात. दिवाळी, तुळशीचं लग्न, दीपोत्सव, वैकुण्ठ चतुर्दशी (शैव-वैष्णवांनी परस्परांच्या दैवतांना प्रणिपात करण्याचा दिवस), त्रिपुरारी पौर्णिमा हे दिवस कार्तिकात साजरे होतात. कार्तिक स्नानाचेही अपार महत्त्व आहे.

थरथरता वृध्द हात...!

लेखक उदय ४२ यांनी सोमवार, 26/11/2012 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
बातमीदाराच्या कारकिर्दीत काही प्रसंग मोठे विचित्र असतात. म्हणजे कितीही अलिप्त राहून बातमी द्यायची म्हटली, तरी तसे करताच येत नाही. बातमी आनंदाची असेल,तर आपल्यालाही आनंद होतो, दु:खाची असेल, तर ती देताना दु:ख होतेच! बाळासाहेबांच्या निधनाची बातमी अशीच! ती लिहीताना खूप वाईट वाटत होते. बातमी तशी अनपेक्षित नव्हती. कधी ना कधी या घटनेचे वृत्तांकन करणे नशिबी येणार आहे, याचा अंदाज साऱ्याच पत्रकारांना आला होता. विशेषत: गेले काही महिने बाळासाहेबांच्या तब्येतीत जे चढ-उतार झाले, त्यामुळे आता काहीही होऊ शकते, याची कल्पना आली होती.

कॉमन मॅन, सायंटिस्ट, इंजिनियर आणि एक कोडे

लेखक आनंद घारे यांनी बुधवार, 21/11/2012 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसापूर्वी मिसळपाव या संस्थळावर एक सोपे वाटणारे कोडे दिले गेले होते. ते असे होते, "वीस लिटरच्या एका टाकीला खाली तोटी आहे. पूर्ण भरलेल्या टाकीतून तोटी उघडल्यावर एका मिनिटात २ लिटर पाणी कमी झाले. सर्व टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल?" सर्वसामान्य माणूस (कॉमन मॅन) असा विचार करेल, "दोन लिटर पाणी निघायला १ मिनिट लागले, या गतीने वीस लिटर पाणी दहा मिनिटात बाहेर पडेल." हे प्राथमिक शाळेतले साधे त्रैराशिक झाले, यात कोडे कसले आले?

मैत्री

लेखक अविनाश लोंढे. यांनी बुधवार, 21/11/2012 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
"भावना" आणी "नाती" बदलतात का ? जसे ॠतू बदलतात ? जसी माणसे बदलतात .! का ति बदलून हि ह्र्द्यात जस्सीच्या तस्सी राहतात ...? Graduation सम्प्ल्यानन्तर सारेजण आपापल्या रस्त्याने गेले.. एक जण bank manager ,एक जण engineer - अमेरिकेत , एक जण "यशदा " मधे UPSC ची तयारी...! एक जण PSI ! आणी एक जण MPSC ची तयारी ! - अन तयारी करत असताना "गाव कामगार तलाठि" ..! काल सर्वच भेटले..कोलेजात असताना चहा किवा नाश्त्याचे पैसे देताना कधीच दुरावा वाट्ला नाहि..पण काल " Teachers " विकत घेताना जो दुरावा जानवला..तो मनात काहुर माजवनारा ....त्या वेळि सग्ळ्याची लायकि सारखीच होती..आत्ता पगारात लायकि वाटली गेली..!

स्कायफॉल-

लेखक चौकटराजा यांनी सोमवार, 05/11/2012 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
विदेशी चित्रपटात सकस कथा, स्पष्ट व्यक्तिचित्रण व अतिप्रगत छायालेखन यांचा संगम अनेक वेळा दिसून आलेला आहे. या सर्व व्यक्तिचित्रणात चार्ली चाप्लीन यांचा ट्रॅम्प, ब्रॅम स्टोकर यांचा काउंट ड्राक्युला , इयान फ्लेमिंग यांचा जेम्स बॉण्ड व स्टीव्हन स्पीलबर्ग यांचा इंडियाना जोन्स हे लोकप्रिय आहेत. ५० वर्षे टिकून जेम्स बॉन्ड याने त्यात आघाडी घेतली आहे यात शंकाच नाही. नुकताच प्रदर्शित झालेला "स्कायफॉल" हा॑ चित्रपट कथेत जरा कमी असला तरी फोटोग्राफी , अभिनय, व्यक्तिचित्रण यात सरस ठरलेला आहे. पूर्वी दुखावलेला एक ब्रिटिश गुप्तहेर आता सायबर टेररिस्ट झालेला आहे.

आठवणींचा प्रवास

लेखक जागु यांनी रविवार, 04/11/2012 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
तसं पाहीलं तर चित्रपट सृष्टी आणि मी ह्यात भरपूर अंतर आहे. लग्नापूर्वी वेळ भरपूर असल्याने माझ्या तुलनेने बरेच चित्रपट पाहिले आहेत, त्यातील हिरो- हिरॉईन पाहणे आणि ती कथा जाणणे एवढ्यातच इंटरेस्ट असायचा. बाकी त्या चित्रपटाचे दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार, गायक कोण हे कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच नाही केला. त्यामुळे चित्रपटसृष्टीबद्दल लिहिणे म्हणजे माझ्यासाठी बालवाडीतल्या विद्यार्थ्याने जोडाक्षरे लिहिण्यासारखे आहे. तरी पण चित्रपट सृष्टीच्या माध्यमांच्या संदर्भात जी काही माहिती डोळ्यांनी पाहिली, अनुभवली आहे ती नम्रपणे रेखाटण्याचा प्रयत्न करते. पूर्वी १०० घरांतून एखाद्याकडे टीव्ही असायचा.

शुक्रतारा ....मंदवारा ... नाबाद ५० वर्षे

लेखक चौकटराजा यांनी बुधवार, 31/10/2012 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
शुक्रतारा मंदवारा या गाण्याला जन्मून ५० वर्षे झाली. आज ही हे गीत आजच्या तरूण पिढीत लोकप्रिय आहे. आणि आठवण म्हणून म्हातार्‍या-कोतार्‍यातही. एक समर्थ भावगीत गायक म्हणून या गीताने अरूण दाते ( खरे अरविन्द दाते ) याना ओळख मिळवून दिली.सुधा मलहोत्रा यांचा मधाळ आवाज मराठी गानससिकाना परिचित झाला तो ही याच गाण्याने. त्यावेळी आकाशवाणी मुंब्ई केंद्रावर जे लोक नोकरीस होते त्यांची सांस्कृतिक चंगळच होती. नीलम प्रभू.

रागिणी सुहावनी- किरवाणी

लेखक चौकटराजा यांनी रविवार, 28/10/2012 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
आपले भारतीय संगीत व आयुर्वेद यांचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. असला पाहिजे. भारतीय संगीत म्हणजे शास्त्रीय संगीत . यात उत्तर भारतीय संगीत व कर्नाटक संगीत असे दोन प्रवाह आहेत. दोन्हीत एका सप्तकात मूल व विकृत असे मिळून बारा स्वर आहे असेच मानतात.या बारा स्वरांच्या रचनेला काही बन्धने आहेत. नियम आहेत त्याना राग असे म्हणतात. अनेक वर्षांच्या वैचारिक व आस्वादात्मक प्रयोगप्रक्रियेनंतर याचे एक शास्त्र बनले आहे. काय बहुतांशी कानांना रंजक वाटले व काय अरंजक वाटले याचा चिकित्सक शोध घेऊन आजचे राग संगीत बनले आहे.

वाळूचे अर्थकारण

लेखक अभिषेक९ यांनी मंगळवार, 23/10/2012 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
जगाचा इतिहास चाळून बघितला तर, प्रत्येक संघर्षामागे कुठले ना कुठले संसाधन आहे. 'ब्लड डायमंड' चित्रपटात एक संवाद आहे, "Throughout the history of Africa.. whenever a substance of value is found... the locals die in great numbers and in misery.. This was true of Ivory, rubber, gold and oil. It is now true for diamonds..." वरील वाक्य वाळूला देखील लागू आहे. तोच जागतिक कित्ता पण स्थानिक पातळीवर! वाळूचे साठे आहेत ग्रामीण भागात, नदीच्या काठी. पण त्याची गरज आहे नागरी भागात. मागणी-पुरवठ्याचे हे गणित सामन्यांच्या लक्षात यायच्या आधी व्यापारी, बांधकाम व्यावसायिक आणि राजकारण यांची भट्टी जमली.

कबुतरे............

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 12/10/2012 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
कबुतरांचा उपयोग. असाही..... बर्‍याच लोकांच्या कबुतरावरच्या एका काथ्याकुटावरच्या प्रतिक्रिया वाचून करमणूक झाली पण त्याच वेळी एका वाचलेल्या लेखाची आठवण झाली.