Skip to main content

लेख

अंड्याचे फंडे ३ - छंद

लेखक साळसकर यांनी शुक्रवार, 29/03/2013 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
"क्या दगडूशेट, सुबह सुबह लॉलीपॉप.." ह्यॅं ह्यॅं ह्यॅं अंड्या, तू नाही सुधारणार बघ बोलत दगडूने शेवटचा झुरका मारत दातात खोचलेल्या बिडीचे थोटूक रस्त्याकडेच्या गटारात फेकले आणि अण्णाला कटींगचा आवाज देतच आमच्या दुकानात एंट्री मारली. डोळ्य़ांच्या खाचा अन पोटाचे खळगे, आयुष्यातील खाचखळग्यांचे चेहर्‍यावर उमटलेले प्रतिबिंब, खुरटलेली दाढी अन डोक्यावरची उरलीसुरली चांदी, हसले की गंजलेल्या करवतीसारखी दिसणारी दंतपंक्ती, असा आमचा टिपिकल लोअर मिडलक्लास म्हातारा दगडूशेट.

अंड्याचे फंडे २ - फर्स्ट क्लास

लेखक साळसकर यांनी शुक्रवार, 29/03/2013 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
"अंड्याचे फंडे - २" कडे वळायच्या आधी "अंड्याचे फंडे -१" खाली दिलेल्या लिंकवर जाऊन क्लीअर करू शकता. अंड्याचे फंडे १ - रायटर अंड्या - http://misalpav.com/node/24341 घाईत असाल तर तसे नाही केले तरी चालेल, कारण दोन्ही लेखांचा आपसात काडीचाही संबंध नाही. ती लिंक देण्याचे प्रयोजन वाचकांची सोय नसून स्वताच्या लेखाची जाहिरात हे आहे. .................................................................................................................................................... आपली मुंबई लोकल आणि भरगर्दीची वेळ.

डुक्कर आणि दारुडा (बोध कथा - नवीन वर्षाचा संकल्प)

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 28/03/2013 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
नवीन वर्षाचा पहिला दिवस , माया -बहिणींनी घर-आंगण धुऊन-पुसून साफ-सफाई केली होती. कधी नव्हे ते मुनिसीपालीटीने शहरातला कचरा उचलून, कचरा घरांचीही साफ-सफाई केली होती. एक डुक्कर बिच्रारे सकाळ पासून कुजक-माजक, नासलेल- सडलेल्या अन्नाचा शोधात वणवण फिरत होता. तो भुकेन व्याकूळ झाला होता. रस्त्यात त्याला एक दारुडा भेटला. डुक्कर म्हणाला, दारुडा भाऊ, इथे कुठे कुजक-माजक, नासलेल- सडलेल अन्न मिळेल का? दारुडा म्हणाला, अरे डुक्करा, तुला माहित नाही आज नवीन वर्षाचा पहिला दिवस, आज तुला कुजक-माजक, नासलेल- सडलेल अन्न कुठून मिळणार. आज तर ताजे-ताजे अन्न भेटेल. पुरण-पोळी , श्रीखंड खायला मिळेल.

गुंडा

लेखक मृत्युन्जय यांनी गुरुवार, 28/03/2013 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिकेट = सचिन / सौरव / कपिल / गावसकर गायन = लता / आशा / किशोर / रफी संगीत = रह्मान / पंचमदा / मदनमोहन अभिनय = अमिताभ / आमीर / शाहरुख / मीनाकुमारी सौंदर्य = मधुबाला / ऐश्वर्या / कत्रिना आणि इतर ढीगभर लेखक = पु ल / व पु / सावंत कवी = कुसुमाग्रज / करंदीकर / बापट / पाडगावकर / खरे पर्यटनस्थळ = हिमाचल / लेह - लडाख / काश्मीर / केरळ ऐतिहासिक वास्तु = ताज / कुतुबमिनार / चार मिनार / रायगड / लाल किल्ला / चित्तौडगड gunda थोडक्यात सां

युद्धकथा ६ - न पुसला जाणारा कलंक - ५ भाग शेवटचा...........!!

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 27/03/2013 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
युद्धकथा -६ न पुसला जाणारा कलंक! (१) युद्धकथा ६ - न पुसला जाणारा कलंक - २ युद्धकथा ६ - न पुसला जाणारा कलंक - ३ युद्धकथा ६ - न पुसला जाणारा कलंक - ४ हिमलरने ऑशविट्झला १७ जुलै १९४२ च्या संध्याकाळी भेट दिली. या भेटीदरम्यान त्याने तेथे असलेल्या अधिकार्‍यांना ज्यूवंशसंहार हे आता राईशचे अधिकृत धोरण आहे हे उघडपणे सांगितले.

एकावर एक ....

लेखक आनंद घारे यांनी मंगळवार, 26/03/2013 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
एका मोठ्या कंपनीच्या डायरेक्टरच्या सेक्रेटरीची जागा अचानक रिकामी झाली. त्या महत्वाच्या जागेवर आपली वर्णी लागावी यासाठी कंपनीमधल्या व्यक्तींमध्ये चुरस, चढाओढ, खटपटी लटपटी, दबावतंत्र वगैरे सुरू व्हायच्या आधीच बाहेरून एक हुषार, चुणचुणीत आणि कार्यक्षम नवी सेक्रेटरी निवडून तिला आणायचे त्या डायरेक्टरने ठरवले आणि प्लेसमेंट सर्व्हिस चालवणार्‍या आपल्या मित्राला फोन करून चोवीस तासात ही निवड करून द्यायला सांगितले. हे आव्हान स्वीकारून ती एजन्सी लगेच कामाला लागली. अनेक उमेदवारांची सविस्तर माहिती त्यांच्याकडे होतीच.

आणखी एक टायटॅनिक-३

लेखक लॉरी टांगटूंगकर यांनी मंगळवार, 26/03/2013 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
भाग पहिला भाग दुसरा सत्तर ते ऐंशी अंशात कललेलं जहाज आता किनाऱ्याजवळ एका ठिकाणी येऊन स्थिर झालेलं. काही लोकं अजूनही जहाजावर होते.मेयर मेरीको पेल्लेग्रीनी आणि कोस्टाचा डॉक्टर दोघे मिळून सर्व लोकांना बाहेर पडण्यास मदत करत होते. मेरीकोला मदत करण्यात काही क्रू मेम्बर्स होते. थॉमस मेंडोसा या सफाई विभाग प्रमुखाने बऱ्याच लाईफ बोटी सोडण्यात मदत केली. पाण्यात पडून हायपोथर्मियाने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

भीषण……!

लेखक सुधीर मुतालीक यांनी शुक्रवार, 22/03/2013 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातल्या कानाकोप-यातल्या मित्रांशी गेल्या आठवड्यात मुद्दाम एक विषय काढुन संवाद साधला - त्या त्या ठिकाणी असणा-या पाण्याच्या उपलब्धतेचा विषय ! पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेचा !!! अंगावर शहरा आणणारी माहिती मिळाली. महाराष्ट्रातला दुष्काळ किती भीषण आहे याची कल्पना फक्त बोलण्यातून मला समजली. रोज अनुभवत असतील त्यांची परिस्थिती किती भयाण असेल याची कल्पना करवत नाही. आमच्या नाशिक मध्ये किंवा पुण्या मुंबईत आज पाणी उपलब्ध आहे. आणखीही काही भागात महारIष्ट्रात असेल. त्यामुळे आम्हाला पाणी नसण्याची परिस्थिती लक्षात येत नाही. माणसाना पाणी प्यायची मारामारी आहे.

नौदलातील आयुष्य -२

लेखक सुबोध खरे यांनी शुक्रवार, 22/03/2013 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
ही विक्रांत वरील सत्य गोष्ट आहे. १९९० सालच्या मे महिन्यातील. आम्ही गोव्याच्या आसपास समुद्रात युद्ध सराव करीत होतो. एकदा दुपारी १२.३० ते १३.३० अशा जेवणाच्या वेळेत मी जेवून आमच्या विक्रांतच्या ब्लू रूम मध्ये बडीशेप चघळत होतो तेंव्हा नौदल पोलिस अधिकारी उमेश चंद्रा माझ्या बाजूला बसला होता. दीड वाजण्याच्या ५-१० मिनिटे अगोदर तो मला म्हणाला एका मूर्ख सैनिकाची शिस्तभंग कारवाई करायची आहे तेंव्हा मी आता निघतो. मी त्याला सहज विचारले काय केस आहे? तो म्हणाला एक बिनतारी विभागाचा सैनिक विचित्रपणे वागतो आणि काम नीट करीत नाही. मी विचारले काय करतो.