Skip to main content

लेख

आणखी एक टायटॅनिक-३

Published on मंगळवार, 26/03/2013
भाग पहिला भाग दुसरा सत्तर ते ऐंशी अंशात कललेलं जहाज आता किनाऱ्याजवळ एका ठिकाणी येऊन स्थिर झालेलं. काही लोकं अजूनही जहाजावर होते.मेयर मेरीको पेल्लेग्रीनी आणि कोस्टाचा डॉक्टर दोघे मिळून सर्व लोकांना बाहेर पडण्यास मदत करत होते. मेरीकोला मदत करण्यात काही क्रू मेम्बर्स होते. थॉमस मेंडोसा या सफाई विभाग प्रमुखाने बऱ्याच लाईफ बोटी सोडण्यात मदत केली. पाण्यात पडून हायपोथर्मियाने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

भीषण……!

Published on शुक्रवार, 22/03/2013
महाराष्ट्रातल्या कानाकोप-यातल्या मित्रांशी गेल्या आठवड्यात मुद्दाम एक विषय काढुन संवाद साधला - त्या त्या ठिकाणी असणा-या पाण्याच्या उपलब्धतेचा विषय ! पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेचा !!! अंगावर शहरा आणणारी माहिती मिळाली. महाराष्ट्रातला दुष्काळ किती भीषण आहे याची कल्पना फक्त बोलण्यातून मला समजली. रोज अनुभवत असतील त्यांची परिस्थिती किती भयाण असेल याची कल्पना करवत नाही. आमच्या नाशिक मध्ये किंवा पुण्या मुंबईत आज पाणी उपलब्ध आहे. आणखीही काही भागात महारIष्ट्रात असेल. त्यामुळे आम्हाला पाणी नसण्याची परिस्थिती लक्षात येत नाही. माणसाना पाणी प्यायची मारामारी आहे.

नौदलातील आयुष्य -२

Published on शुक्रवार, 22/03/2013
ही विक्रांत वरील सत्य गोष्ट आहे. १९९० सालच्या मे महिन्यातील. आम्ही गोव्याच्या आसपास समुद्रात युद्ध सराव करीत होतो. एकदा दुपारी १२.३० ते १३.३० अशा जेवणाच्या वेळेत मी जेवून आमच्या विक्रांतच्या ब्लू रूम मध्ये बडीशेप चघळत होतो तेंव्हा नौदल पोलिस अधिकारी उमेश चंद्रा माझ्या बाजूला बसला होता. दीड वाजण्याच्या ५-१० मिनिटे अगोदर तो मला म्हणाला एका मूर्ख सैनिकाची शिस्तभंग कारवाई करायची आहे तेंव्हा मी आता निघतो. मी त्याला सहज विचारले काय केस आहे? तो म्हणाला एक बिनतारी विभागाचा सैनिक विचित्रपणे वागतो आणि काम नीट करीत नाही. मी विचारले काय करतो.

माझी कंपुबाजी

Published on सोमवार, 18/03/2013
रिकाम टेकडा ** , भिंतीला तुंबड्या लावी | अशी एक आपल्या मराठीत म्हण आहे , आणि आता तर फेसबुकने सगळ्यांनाच फुकट भिंत उपलब्ध्द करुन दिल्याने सगळेच तिला तुंबड्या लावत बसलेले असतात . ( तुंबड्या लावणे म्हणजे नक्की काय हो ? कारण लहानपणी ही म्हण घरात बोललो होतो तेव्हा धपाटे पडले होते { ते ** ह्या शब्दाच्या वापराने पडले असा आमच्या बालमनाने विचार केला होता } ) ते असो . तर आम्ही ही सध्या रिकामटेकडे असल्याने फेसबुकच्या भिंतीला तुंबड्या लावत असतो. तेव्हा आपल्या सारकेच किती जण हे करत आहे हे पाहण्या साठी आम्ही केलेला हा प्रयोग ...

आणखी एक टायटॅनिक-2

Published on सोमवार, 18/03/2013
भाग पहिला सफर सुरु होऊन तीन तास होण्याच्या आतच अचानक जहाजाला भूकंप झाल्यासारखा जोरदार धक्का बसला.. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास इटलीमधीलच जिलिओ बेट समूहांजवळून जात असताना हार्ड ग्रानाईटच्या एका दगडाने जहाजाचा तळ खरवडून काढला . दगडाने आपले काम चोख केले.जहाजाच्या तळाला एकशे साठ फुट लांबीचे भगदाड पडले .पर्यटकांना आपल्या प्रवासाच्या पहिल्याच दिवशी असला काही अनुभव येईल असे स्वप्नात सुद्धा वाटले नसणार.

एकत्र कुटुंब ....जबाबदारी कोणाची?

Published on शनीवार, 09/03/2013
आजकाल मुलांचा आपल्या पत्नीकडे बघण्याचा द्रुष्टिकोन खूपच चांगला झाला आहे. आणि बरेचसे तरुण आपल्या बायकोला समानतेने आणि सन्मानाने वागवताना दिसतात. पण सासरच्या बाकिच्या लोकांच्या वागण्यात एवढा फरक अजून पडलेला नाही दिसत. फक्त मुलाच्या घरच्यांनीच मुलाला वाढवताना कष्ट घेतले असतात का? आजकाल खूप जणांची पसंती लग्न झाल्यावर स्वतंत्र राहण्यासाठी असते, पण ह्यासाठी फक्त मुलींनाच दोषी ठरवले जाते हे बघून खूप दुख होते.मुलींचा असा विचार होत असेल तर त्याला काय गोष्टी जबाबदार आहेत हे पण पाहिले पाहिजे. अनेक सासवा माझी सून म्हणजे माझी मुलगीच असा चार लोकांसमोर दिखावा करण्यासाठी बोलतात.

लेफ्ट राइट की डावे उजवे

Published on बुधवार, 06/03/2013
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी आपल्या राजधानीमध्ये दरवर्षीसारखा जंगी कार्यक्रम झाला. सैनिक आणि पोलिसदलांच्या अनेक तुकड्या मोठ्या ऐटीत "लेफ्ट राइट", "लेफ्ट राइट" करत परेड करतांना पहायला मिळाल्या. सर्वांचे उजवे आणि डावे पाय एका लयीत पडत असतांना आणि हात एकासारखे एक वर खाली होत असतांना त्यातून अद्भुत दृष्य निर्माण होत होते. त्यात 'उजवा' आणि 'डावा' या दोन्हींचा समान वाटा होता, किंवा त्यांच्या लयबध्द हालचालींमध्ये अणुमात्र फरक वाटत नव्हता. आपल्या जीवनात मात्र आपण नेहमी 'डावे, उजवे' असे करत असतो. 'डावे' म्हणजे कमी दर्जाचे आणि 'उजवे' तेवढे चांगल्या प्रतीचे समजले जाते.

लाल पेरू

Published on बुधवार, 06/03/2013
लाल पेरू "अरे, मस्त ग्वावा ज्यूस मिळते येथे. चल पिऊन येऊ." असे म्हणत मित्राने मला जवळ जवळ ओढतच दुकानात नेले. मी बाहेरचे काही खात नाही हे माहीत असूनही त्याने मला तिथे नेले. कारणच तसे होते, तो पुढील वर्षभरासाठी ऑनसाईट चालला होता. त्यामुळेच त्याला आनंद तर झालाच होता, पण आता वर्षभर इथले ज्यूस पिता येणार नाही म्हणून दुःख हि झाले होते.त्याच्या या आनंदासाठी मी हि मग माझा हेका सोडला आणि जाऊन बसलो लाल पिवळ्या खुर्चीवर. "दोन ग्वावा ज्यूस" अशी ऑर्डर गेली. तसा त्या वाक्याने मात्र मी १६ वर्षे मागे गेलो. पेरू, अहाहा.. या दोन शब्दातच किती सुख सामावले आहे.

उस सिक्सर की गूंज!

लेखक फारएन्ड
Published on बुधवार, 06/03/2013
पाक विरूद्ध सचिनने सेन्च्युरियन वर मारलेल्या त्या प्रसिद्ध सिक्सला व त्या विजयाला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली. त्याबद्दल काही आठवणी... गेली अनेक वर्षे भारत-पाक मॅचेस म्हणजे जोरदार टीआरपी असलेले इव्हेण्ट्स झाले आहेत. पण सध्याच्या तुलनेत पूर्वीच्या मॅचेस म्हणजे अमर अकबर अँथनी च्या तुलनेत एखादा युरोपियन आर्ट मूव्ही!