मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मला जगायचंय !

प्रमोद देर्देकर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
पुन्हा कधी तरी जाग आली ..... शरीर कशात तरी गुंडाळलेले .....हळू हळू नजर वर केली मला कळून चुकले मी इस्पितळात आ. य. सी. सी. यु. मध्ये आहे फक्त डोळ्यांची हालचाल शक्य ... डोक्यात विचारांचे काहूर माजलेले.... डोक्यात घणांचे घाव पडतायत..... घरुन निघालो तेव्हाच रेनकोट घालायला हवा होता माझी बाईक पुलावर आली आणि पाऊस तांडव करत बरसू लागला. बाईक बाजूला उभी करून डिकीत ठेवलेला रेनकोट काढेपर्यंत मी साफ भिजून गेलो होतो...... तेवढ्यात मागून रो रो करीत येण्यारया ट्रकचा आवाज ......अरे हे काय मी अलगद हवेत तरंगतोय ..... माझी बाईक ची सुद्धा तीच गत..... मग विजेच्या खांबाला मीठी मारली खांदा, छाती बधीर.... तिथून खाली डिव्हायडरवरिल दगडावर डोके आणि मग पाठ आपटली .....संपूर्ण शरीतर विजेचा कल्लोळ, जणू आकाशातील वीज माझ्या शरीरात घर करून राहिलीये.... अणुंकुचीदार सुई टोचल्या प्रमाणे पाऊस शरीरात खोलवर घुसत होता .... कपड्यावरील चिखल आणि रक्त साफ धुवून काढत होत .... जोरात किंकाळी मारावी असे वाटत होत पण नाही शक्य झाले....निपचित पाठीवर पडून किती वेळ झाला कोणास ठाऊक. कोणीतरी हाताला धरतय मनगट दाबतय … "नाडी अजून मंद आहे." " हो सर रात्री दोनदा डोळे हि उघडले होते पण थोडाच वेळ, पुन्हा ग्लानी आली." " ठीक आहे. बहुतेक पुढचे १ ० / १ २ तास वाट पहावी लागेल मग धोका नाही. " हे देवा! ते काय म्हणतायत म्हणजे अजून मृत्यूशी झुंज चालू आहे म्हणायची तर ! अरे हे काय अजून हि मी इस्पितळातच…. पण आता चांगले कळायला लागलय …. ती काय दरवाजाच्या काचेतून माझी पत्नी माझ्याकडेच डोळे लावून बसली आहे. रडून रडून तीचा चेहरा लाल झाला आहे तिचे डोळे सुजलेले दिसत आहेत…किती दिवस ती तिथून हलली नसेल… आमची नजरानजर झाली… ती दीनवाणी हसली आणि तिच्या डोळ्याला पुन्हा झरझर लागली …. मी डोळे मिटून एक आवंढा गिळला तेव्हा माझे दोन्ही कानावरील पट्ट्या ओल्या झाल्या...म्हणजे मीही रडत होतो…. आयुष्याच्या या प्रवासात मी अर्ध्या वाटेवर तिला आणि सोन्याला सोडून जाईन अशी धास्ती तिने नसेल ना घेतली..... मला लग्नाचा दिवस ते आत्तापर्यन्तचा सर्व प्रवास आठवला… " आयुष्याच्या सर्व प्रसंगात एकमेकांना साथ करू" अशा शपथा आंम्ही लग्नाआधीही किती वेळा घेल्या होत्या…. मग आता का मी एवढा कृतघ्न झालो होतो,स्वार्थी झालो होतो.... तिला अर्ध्या वाटेवर सोडून निघून चाललो होतो.... माझ्या शिवाय सोन्याला घेवून ती कशी काय या संसाराचा गाढा हाकणार होती … मुलाला मोठे करून डॉक्टर / इंजिनेर करण्यासाठी एकटीच काबाडकष्ट करणार होति... माझ्या म्हातारया झालेल्या आई बाबांना सांभाळणार होती…. पुन्हा मी डोळे उघडले…. आता काचे पलीकडे तिच्या बरोबर माझा सोनुल्या पण तिच्या कडेवर होता … एक हात हलवून माझ्या कडे बघत राहिला…. जणू मला बाहेर बोलावत होता ज्याच्या अंगा खांद्यावर वर मी उड्या मारल्या तो बाबा असा निपचित कसा पडलाय?… असा प्रश्न त्याला बिचार्याला पडला असणार …. .... काय काय स्वप्न घेवून आम्ही दोघांनी हा संसारात रममाण झालो होतो. या दहा वर्षात प्रत्येक क्षण माझ्या डोळ्या समोरून येवून गेले. प्रेम, भांडणे, रुसवे फुगवे, अबोला, मनधरणी , हुंदडणे, फिरणे …. किती तरी अनुभवले पण अजून मन भरले नव्हते.... अजून भरपूर काही अनुभवायचे आहेत … भरपूर काही सांगायचे आहे… ऐकायचे आहे बोलायचे आहे रानातील वाट तुडवत रानोमाळ भटकत सहली करायच्या आहेत,निरागस कोसळणारया पावसात तुझ्या सोबत मनसोक्त भिजायचे आहे....थंडीत एकाच चादरीत तुझ्या कुशीत गुरफटून झोपायचे आहे.... वाचलेल्या कथा कादम्बर्यावर चर्चा करायची आहे..... गाण्याच्या भेंड्या मध्ये तुला हरवायचे आहे. किती, किती सांगू तरी किती यादीच संपत नाहीये. बघितलेली स्वप्ने पूर्णु करायची आहेत तर मग छे एवढ्यात हार कशी मानून चालेल… नाही नाही मला जगलेच पाहिजे....माझा शरीरातील प्रत्येक कण आणि कण मला तेच सांगतो आहे …. तिला हे सांगितले पहिजे कि घाबरू नकोस मी निशित बरा होणार आहे. बारा हत्तींचे बळ माझ्या अंगात कोठून संचारले कुणास ठाऊक , मी पुन्हा तिच्याकडे पहिले आता माझे आई बाबा पण काचे पलीकडे दिसले मी माझ्या पापण्या दोन वेळा वर खाली हलवल्या…. थोडीशी ओठांची हालचाल … सलाईन लावलेला हात थोडासा हलवून त्यांना आश्वशन दिले कि , मी परत येतोय… आणि तुम्हा सर्वां बरोबर पुन्हा नव्याने आयुष्य सुरु करीन....... त्या सर्वांचे चेहरे आनंदाने उजळलेले मी पहिले.... अन खूप थकवा आल्याने मी पुन्हा झोपी गेलो…

वाचने 3568 वाचनखूण प्रतिक्रिया 14

पैसा 04/10/2013 - 18:04
मरणाच्या दारातून परत येण्यासाठी माणसाला असेच कुठूनतरी बळ मिळत असावे.

अग्निकोल्हा 04/10/2013 - 23:18
आवडले... आशावादाला आत्मविश्वासाची मिळणारी जोड या पेंक्षा दुसरी सुंदर भावना या जगात नाही!

संजय क्षीरसागर 04/10/2013 - 23:18
आता हे -
रानातील वाट तुडवत रानोमाळ भटकत सहली करायच्या आहेत,निरागस कोसळणारया पावसात तुझ्या सोबत मनसोक्त भिजायचे आहे....थंडीत एकाच चादरीत तुझ्या कुशीत गुरफटून झोपायचे आहे.... वाचलेल्या कथा कादम्बर्यावर चर्चा करायची आहे..... गाण्याच्या भेंड्या मध्ये तुला हरवायचे आहे.
सुरु झालं का? ते कळवा.

In reply to by संजय क्षीरसागर

खटपट्या 04/10/2013 - 23:46
हो हे महत्वाचे आहे.. मला पण माहीत करुन घ्यायचे आहे की हे सर्व चालू झाले की नाही..

डॉ सुहास म्हात्रे 06/10/2013 - 11:52
आजपर्यंतच्या मिपावरच्या तुमच्या लेखनात माझ्यामते हा लेख सर्वोत्तम आहे... मरणासन्न अवस्थेत बिछान्यावर पडलेल्या माणसाच्या मनात काय घालमेल चालली असावी याचा फार चांगली वेध घेतला आहे !