Skip to main content

लेख

मॉर्निंग वॉल्क ! माझगावचा डोंगर !!

लेखक तुमचा अभिषेक यांनी रविवार, 16/02/2014 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी सहा वाजता भारत-न्यूझीलंडचा सामना बघायला उठलो पण घरच्यांच्या ओरडा कम सूचनेनंतर प्लॅन चेंज करत कधी नव्हे ते मॉर्निंग वॉल्कला बाहेर पडलो. मस्त ट्रॅक पॅंट घातली, वर नवे कोरे पांढरे स्पोर्ट्स टीशर्ट. पायातले स्पोर्ट्सशूज मात्र जुनेच. एक फारसे वापरात नसलेले पण बर्‍यापैकी छान स्पोर्ट्सवॉच सुद्धा धुंडाळले. सकाळी साडेसहाला उन्हाचा पत्ता नसल्याने गॉगलचा मोह तेवढा आवरला. गाणी ऐकायला म्हणून हॅण्सफ्री कानात टाकले. एकंदरीत सज धज के घरापासून साडेसात मिनिटांच्या अंतरावर असलेल्या माझगावच्या डोंगराकडे कूच केले.

देव आनंद

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी शनिवार, 15/02/2014 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
अथश्री प्रतिष्ठानतर्फे चालविल्या जाणार्या अथश्री त्रैमासिकाचे संपादक श्री आनंद आगाशे यांच्या परवानगीने २०१२ च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला हा लेख इथे प्रकाशित करत आहे.
-----------------------------------------------------------------------------------

-----------------------------------------------------------------------------------

आधी शरीर कि मन? योगाच्या दृष्टीकोणातुन - अंतिम

लेखक Atul Thakur यांनी शुक्रवार, 14/02/2014 05:39 या दिवशी प्रकाशित केले.
राजयोग म्हणजे मनाच्या सहाय्याने अंतिम ध्येयाप्रत जाण्याचा मार्ग. हे अंतिम ध्येय योगाच्या परिभाषेत समाधी म्हणुन ओळखलं जातं. राजयोग शब्दाबाबत अनेक मतं प्रचलित आहेत. मात्र या मार्गात मन हेच उपकरण प्रामुख्याने वापरलं जातं हे जवळपास सर्वमान्य आहे. राजयोगाच्या अष्टांग मार्गात यम, नियम हा एक महत्वाचा भाग मानला जातो. सर्वसाधारणपणे माणसं जरी आसन, प्राणायामात विशेष रस घेणारी असली तरी राजयोग परंपरेत यम, नियमांचं महत्व अपार आहे.

माझं कोकणातलं गांव :- भाग - १

लेखक प्रमोद देर्देकर यांनी बुधवार, 12/02/2014 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
झुकझुक झुकझुक अगीन गाडी,धुरांच्या रेषा हवेत काढी पळती झाडे पाहुया, मामाला गावाच्या जावूया || हे गाणं लागलं की कि मनाला खरं तर काकाच्या गावापेक्षा मामाचं गावं (म्हणजे आजोळ) सगळ्यांना जास्त प्रिय असतो हे पटायला लागतं. पण मला मात्र दोन्ही गावे तेवढीच आवडतात. काकाचे गाव म्हणजे आमचेच घर सगळ्यात जास्त आवडते. मला एकुण ८ मामा व एक मावशी (रा. दापोली)त्यापैकी चार गावाकडे राहिले, तर चार कळव्याला माझ्या आई बरोबर रहायला आले, जसजसे लग्न जमत गेले तेव्हा स्वःताहाचे बिर्‍हाड करित गेले. मग त्यांची समवयस्क मुले, मामा, मामी, आणि आम्ही सगळे गावाला कधी जायचे ह्याचे बेत ठरवण्यासाठी आमच्याकडे जमत असत. आम्ही लहान थोर मिळुन सगळेजण १९ जण होतो.(सन १९९५ पर्यंत सगळे उत्सव/ सण आम्ही एकत्र जमुन साजरे करित असु पण आता जमाना बदलला आहे. मामे भावु/ बहिणी,(सख्खी बहिण सुद्धा) सगळ्यांची लग्न होवुन आपापल्या संसारात रममाण झाली आहेत. त्यातुन टी.व्ही ने सगळ्यांनाच एकमेकांपासुन तोडलंय.)

आधी शरीर कि मन? योगाच्या दृष्टीकोणातुन - भाग ३

लेखक Atul Thakur यांनी रविवार, 09/02/2014 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
हठप्रदीपिकेत पाच उपदेश आहेत. ज्यात योगातील चार अंगांचा विचार केला आहे. आसन, प्राणायाम, मुद्रा व समाधी याबद्दल तपशीलवार माहिती पहिल्या चार उपदेशात मिळते. पाचव्या औषधीकथन उपदेशात योगाभ्यास करताना काही शारीरिक उपद्रव झाल्यास काय उपाय करावे याचा उहापोह आहे. योगाभ्यासाच्या फलप्राप्तीचे जागोजाग उल्लेख आहेत. यातील तांत्रिक भाग जरी क्षणभर बाजुला ठेवला तरी हठप्रदीपिकेचे ग्रंथकर्ते स्वात्माराम यांनी राजयोग, हठयोगाबद्दल केलेल्या काही मार्मिक विधानांचा विचार येथे करणे भाग आहे.

अकबराचा मोबाईल हरवतो

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 09/02/2014 04:35 या दिवशी प्रकाशित केले.
अकबराचा मोबाईल हरवतो नेहमीप्रमाणे अकबर बादशाह दरबारात बसला होता. इतर सारे दरबारी आपाअपल्या खुर्च्यांवर बसले होते. दरबाराचे कामकाज चालू होते. नविन टॅक्स सिस्टीम कशी राबवायची, रेपो रेट कमी करायचा का नाही, आधार कार्ड स्कीम बंद करून नविन आयडेंटी कार्ड लागू करावे काय, अनुदानातले गॅस सिलेंडर, अभिनेत्री करूना कपुर हिला पद्मश्री पुरस्कार आदी बरेच विषय चर्चेला होते. एका दिवसात हे सारे विषय काही संपणारे नव्हते हे बादशाहाला अन बाकीच्या दरबार्‍यांनाही सवयीने माहीत झाले असल्याने टंगळमंगळ, विनोद करत चर्चा चालू होती. बिरबलाचे बादशाह अकबराकडे बारकाईचे लक्ष होते.

यादवी माजली

लेखक मृत्युन्जय यांनी गुरुवार, 06/02/2014 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
यादवी युद्ध किंवा यादवी माजली हे शब्द आपण वर्तमानपत्रांतुन बर्‍याचदा वाचत असु कदाचित. पण या शब्दाचा उगम कदाचित आपल्याला माहिती नसेल. आजच्या काळाचा विचार करता याचा संबंध बिहारच्या लालुप्रसाद यादवांशी जोडण्याचा प्रयत्न केला जाइल. या सत्शील माणसापाठी या असल्या भयंकर शब्दाचा उगम जोडला जाउ नये या साठी हा लेखन प्रपंच. "यादवी माजली" या शब्दामागे आहे खरे सांगायचे तर एक आद्य अट्टलबिहारी. वाजपेयी नव्हेत. खरोखरचा अट्टल बिहारी. श्रीकृष्ण. (अटलबिहारी म्हणजे माझ्या मते विष्णुचा आठवा अथवा सर्वात महत्वाचा अवतार.) तर यादवीचा संबंध आहे श्रीकृष्णाशी.

दुर्योधन

लेखक मृत्युन्जय यांनी बुधवार, 05/02/2014 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
अतिदानात बलिर्बद्धो , अतिमानात सुयोधन:| विनष्टो रावणो लौल्यात , अति सर्वत्र वर्जयेत || अतिरेकी दानशूरते पायी बळीराजा पाताळात गेला, अतिगर्विष्टपणाने दुर्योधन आणि अति स्त्रीलोभाने रावण नष्ट झाला. कोणत्याच गोष्टीमध्ये अतिरेक करू नये हेच खरे. एक अतिरेकी अहंकार सोडला तर दुर्योधनाने त्याचे आयुष्य अतिशय सूत्रबद्ध रीत्या जगले आणि उपभोगले.

पंडित भगवानलाल इंद्रजी

लेखक राही यांनी मंगळवार, 04/02/2014 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
The Asiatic Society of Bombay च्या Gallery of Excellence या नावाच्या एका प्रकाशनामध्ये पण्डित भगवानलाल इंद्रजी यांच्या विषयी एक चरित्रात्मक लेख आहे. हे लिखाण प्रताधिकाराखाली असल्याने थेट भाषांतर देता येणार नाही, पण कदाचित गोषवारा देता येईल. पंडित भगवानलाल यांचा जन्म ७-११-१८३९ रोजी सौराष्ट्रातील जुनागढ येथे झाला. तिथे त्या काळी इंग्रजी शिक्षणाची सोय नव्हती. पण संस्कृत भाषा आणि आयुर्वेदउपचारपद्धतीचे शिक्षण मात्र त्यांना मिळाले. गिरनारच्या वाटेवरील पाषाणलेखाने लहानपणीच त्यांना या विषयी कुतूहल निर्माण झाले आणि पुढे पुराभिलेख आणि नाणकशास्त्राचा अभ्यास हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय बनले.

फेब्रुवारी महिना, मराठीची लेणी, ज्ञानकोश आणि ज्ञानकोशकर्ते

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 31/01/2014 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
फेब्रुवारी महिना येतो, तोच मुळी मराठी भाषेच्या मुकूटातील काही महत्वपूर्ण क्षणांचे आणि हिर्‍यांचे स्मरण देत. ६ फेब्रुवारी (१९३३) अयोध्येचा राजा या पहिल्या मराठी बोलपट प्रदर्शित झाला. आणि त्याच वर्षी ९ फेब्रुवारीला सानेगुरुजींनी श्यामची आईचे लेखन चालू केले.