गडीमाणस
लेखनप्रकार
आमच घर कोकणात असल्याने घरचा मुख्य व्यवसाय हा शेती होता . भातशेती आणि आंबा हेच उत्पन्नाचे मुख्य साधन . त्यामुळे साहजिक घरात गडी माणसांची ये जा असायची . हि मानस घरचाच एक अविभाज्य घटक बनलेली होती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही . आमच्यकडे "गुण्यादादा"नावाचा एक गडी होता. खर तर वयाने तो माझ्या बाबांपेक्षा सुद्धा १० १२ वर्ष मोठा असेल पण सगळेच त्याला गुण्यादादा म्हणायचे . मी ऐकलय त्याप्रमाणे त्याच्या वयाच्या ८ व्या वर्षपासून तो आमच्याकडे कामाला होता . अत्यंत विश्वासू आणि तेवढाच घरचा हक्काचा असा गुण्यादादा . शेतावर काम करून रंग अगदी काळपट झालेला. मध्यम पण काटक अंगकाठी . डोक्याला मुंडास अंगात बनियन आणि खाली पंचा असा त्याचा पोशाख असायचा . शेतीची आणि कलमाची सगळी काम बघणे तसाच गुरांकडे बघणे हे त्याचे मुख्य काम . खर तो आजच्या भाषेत सांगायचे तर manager होता . त्याच्या हाताखाली कमीतकमी २ ३ जन कामाला असायचे आणि त्यांच्याकडून सगळ काम व्यवस्थित आणि पद्धतशीरपणे करून घेण हि त्याची जबाबदारी आसायाची . अजिबात न शिकलेल्या या माणसाच डोक मात्र अजब चाले . शेती संदर्भात कोणतेही निर्णय घेण्याची त्याला मुभा असे . उलट कधी बाबा काका काही वेगळ म्हणाले तरी तो त्याचं ऐकत नसे . नांगरणी कधी कारायची , कोणती मानस सांगायची , कोणत खत आणायचं इथपासून कोणाला किती मजुरी द्यायची हे सगळ तोच ठरवी . या बदल्यात त्याची पगाराव्यतिरिक्त कोणतीही अपेक्षा नव्हती . रोज सकाळ संध्याकाळ आमच्याकडे जेवायला असायचा . त्याची बायको सुद्धा सकाळी घरी कामाला येई . आंब्याच्या बाबतीत तो फारच काटेकोर असे . माझे बाबा आणि गुण्यादादानि मिळून आमची आमराई लावली , फुलवली होती . त्याच्या दृष्टीने ती आमराई हेच त्याच घर असे . एक मात्र होत त्याचा काकांपेक्षा माझ्या बाबांवर जीव जास्त होता . अर्थातच त्याला कारणही तसाच होत . बाबा सुद्धा त्याला मोठ्या भावाप्रमाणे वागवायचे . गणपती दिवाळी आणि शिमगा त्या सणांना त्याला महिण्याचा पगार जास्त द्यायचे . आपल्याप्रमाणे त्यांच्याही घरी आनंदाने सन साजरा होऊ दे असे त्यांचे म्हणणे असायचे . आजी आईसुद्धा सणासुदीला गोड धोड केले कि आमच्याप्रमाणे दुपारी त्यांच्याही ताटात वाढत . शिवाय मुलांसाठी न्यायला वेगळी पुडी बांधून देत . आई नेहमी म्हणायची आपण खाल्यानंतर आपली भांडी घासताना त्यांना आपण काय खाल्ले याचा अंदाज येणार आणि आपल्याला मिळाले नाही याच दुखः होणार . त्यापेक्षा देवाच्या कृपेने आपल्याला काही कमी नाही मग त्यानाही दिल तर उलट दिल्याच समाधान मिळेल . पगार हा आपण देतोच पण अशाप्रकारच देन घेण त्यांच्या जास्त लक्षात राहत .त्यांच्या कधी अडी अडचणीला लागले तर बाबा लगेच पैसे काढून देत . घरात चार चाकी गाडी असल्याने कधी लागली तरी त्यांच्यासाठी गाडी काढायला पण बाबाची ना नसे . आंब्यांच्या बाबतीतही हीच कथा . आंब्याची शेवटची काढणी झाली कि मग सगळ्यांना आमराईत एकदा जेवण . गरम मसाल्याची आमटी भात आणि भरपूर आमरस . अगदी सगळ्या गड्यांच्या मुलांसकट सगळ्यांना जेवण . शिवाय गुण्यादादाला दरवर्षी 50हापूस ani 50 इतर प्रकारचे आंबे बाबा देत असत . गुण्यादादा शेताला कुंपण घालीत असे ती बघण्यासारखी असे . माडाच्या झावळ्या आणि बाकी झाडाचा पाला मिळून तो सगळीकडून गच्च कुंपण उभारत असे . एकदा दादा आंब्यावर चढला असताना फांदी मोडून तो खाली पडला तर गुण्यादादाने त्याची चौकशी काराय ची सोडून आधी झाडाची फांदी मोडली म्हणून ओरडून घेतालन . इतका तो झाडांना जपायचा . कधी घरातल्याच लग्नकार्यासाठी सर्वाना घराबाहेर पडण आवश्यक असे तेव्हा गुण्यादादाला घरी राहायला बोलवत असत . घर त्याच्या ताब्यात देऊन सगळे निश्चिंत मने बाहेर पडत . (अर्थातच जाण्याआधी गुण्यादादासाठी जेवणखाण्याची व्यवस्था करूनच )
आज गुण्यादादाचा मुलगा आमची सगळी शेती बघतो . कृष्णा नाव त्याच . तो अगदी गुण्यादादाच्या पावलावर पाऊल ठेवून आमची आणि शेतीची कलजी घेतो . गुण्यादादा मला "बयो" म्हणून हाक मारायचा कृष्णासुद्धा मला "बयो" च म्हणतो . गेल्यावर हातात पैसे ठेवयला बघितले तर हात आखडून घेतो . मला म्हणतो आम्ही लेकीकडून नाही घेत . तुझा बाबा देतो तेव्हढ पुरत मला . मग काहीतरी निमित्त काढून मी तेच पैसे त्याच्या मुलांच्या हातावर ठेवते . त्याला अवघादाल्यासारख होत . पण यानेच त्याच्या लहानपणासून आमच्या बागेकडे शेतीकडे लक्ष दिले मग थोड तरी उतराई व्हायला हव ना ?
वाचने
4591
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
स्वागत. पु.ले.शु.
मिपा वर स्वागत.
मालविका, आपन रेखाटलेले
आवडले.
क्लाsssस!!!
लेख आणि लेखातलं व्यक्तिचित्र आवडलं
आवडलं
In reply to आवडलं by पैसा
+१
लेख आवडला. थोडा सविस्तर अजून
धन्यवाद
छान
व्यक्तीचित्रण आवडलं.
आई नेहमी म्हणायची आपण
In reply to आई नेहमी म्हणायची आपण by सुबोध खरे
मलादेखील हा मुद्दा फार आवडला.
मस्त लिहिलंय ... आवडलं .
मी पयला...
छान जमलय. थोडेंस छोटे जमलय
लेखन आवडले.