Skip to main content

लेख

घालीन लोटांगण

लेखक शिरीष फडके यांनी बुधवार, 12/11/2014 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
कलमनामा – ३१/०८/२०१४ – लेख १ - घालीन लोटांगण घालीन लोटांगण वंदीनं चरण, डोळ्यांनी पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंदे पूजन, भावे ओवाळीन म्हणे नामा ही आरती गणपतीच्या दिवसात नेहमीच ऐकली जाते, म्हटली जाते किंवा गायली जाते. ही आरती बर्याच जणांची आवडती आरती आहे. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. इतर आरत्यांपेक्षा ही आरती जरा वेगळी आहे म्हणून काहींना आवडते तर काहींना या आरतीची चाल गतिमान आहे म्हणूनदेखील ही आरती आवडते. (तसंच या आरतीला वाजवल्या जाणार्या टाळ्यांमध्येदेखील एक विशिष्ट गती आहे).

रहिमन धागा प्रेम का... ( प्रेमाचा धागा...)

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 10/11/2014 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
रहिमन धागा प्रेम का, मत तोड़ो चटकाय । टूटे से फिर ना जुड़े, जुड़े गाँठ परि जाय l अत्यंत नाजुक अश्या प्रेमाचा धाग्याला सदैव जपून ठेवावे लागते. एकदा हा धागा तुटला, तर कधी-कधी पुन्हा गाठ मारणे ही शक्य होत नाही. आपली मीरा पतंग उडवीत होती, अचानक पतंगाची दोर तुटली. पतंग हवेत उंच उडाला. थेट स्वर्गात पोहचला. तिथे सोमरसा सोबत अप्सरांचे नृत्य पाहत स्वर्ग सुख भोगू लागला. इथे मीरा जमिनी वर पतंगाच्या विरहात अंतर्बाह्य बुडलेली होती. तिच्या मनात एकाच विचार, पुन्हा पतंग कधी भेटणार. पण धरती आणि आकाशाचे मिलन जवळपास अशक्यच असते.

चिनू ची गोष्ट !!

लेखक फिझा यांनी शुक्रवार, 07/11/2014 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
चिनू ची गोष्ट !! मे महिन्याचे दिवस होते.यंदाची मे ची सुट्टी काकांच्या गावाला साताऱ्याला घालवायची असे समस्त बच्चे कंपनी चे ठरले होते. मला ते साताऱ्याचे घर फार काही आवडायचे नाही. तसा वाडा मोठा होता, पण जुनाट वाटायचा. रात्रीच्या वेळी तर भयंकर शांततेचा आणि भकास वाटायचा. कधी मुक्काम केलाच तर कधी एकदा उजाड़ते आणि सगळे उठतात ....अस होऊन जायचं मला. आईला मी म्हणायचेही नेहमी... की मला नाही आवडत इथे.... पण काय ...आई काहीतरी सांगुन विषय टाळायची.....उगीच काका काकूंना काय वाटेल असे त्यांनी ऐकले तर...... काकांची आर्थिक परिस्थिति तशी बेताचीच.

आणि यांनी घडविली अमेरिका! .. ३) अँड्र्यू कार्नेगी

लेखक अमित खोजे यांनी बुधवार, 05/11/2014 03:03 या दिवशी प्रकाशित केले.
जॉन डी रॉकफेलर आता अमेरिकेतील सर्वात श्रीमंत माणूस झाला होता. त्याची एकूण संपत्ती १५० मिलिअन डॉलर्स (२२५ बिलिअन डॉलर्स आज) होती. स्टँडर्ड ऑईल ९८% रॉकेल ची एकटी मालक होती. परंतु जगातील सर्व मोठ्या भांडवलदारांना स्पर्धक हे असतातच. आणि भविष्यातील सर्वात मोठ्या स्पर्धकाला रॉकफेलरने स्वतःच जन्माला घातले होते. अँड्र्यू कार्नेगी! ज्याचा हात धरून अँड्र्यूने धंद्यातील धडे गिरवले त्या टॉम स्कॉटची वाताहत केल्याबद्दल अँड्र्यू जॉनला बिलकुल क्षमा करणार नव्हता. पुढे चालू ..

एक लक्ष वाचक - एक प्रवास

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 03/11/2014 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
आज ३ नोव्हेंबर, सायंकाळी ८ वाजता कॉम्पुटर चालू केला, सहज लक्ष गेल ब्लॉगला वाचक संख्या एक लक्षाच्या वर गेलेली होती. जेंव्हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती, आपला ब्लॉग कुणी वाचेल याची कल्पना ही केली नव्हती. चिरंजीवाना शिक्षणात मदत होईल या हेतूने कॉम्पुटर (लेपटाॅप) घरात आला. अर्थातच मला ही तो वापरायला मिळालाच. उत्सुकता म्हणून कुठे मराठी वाचायला मिळेल या उद्देश्याने अंतर्जालावर शोध घेऊ लागलो. सर्व प्रथम मराठी सृष्टी ही वेबसाईट दिसली. वेबसाईट वर मराठीत लिहा, आपल्यातील लेखकाला जागवा. असे आव्हान होते.

मराठी अस्मिता, आपण आणि राजकारण

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 28/10/2014 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
"नाही यार नाही. हा नाही. अरे तो ठीक आहे पंतप्रधान म्हणून. महाराष्ट्रात हा नाही पाहिजे. अरे तो मराठी माणसाचा, आपला, असा पक्ष नाहीये मित्रा.... तो महाराष्ट्रात मराठी माणसाला पोरकं करेल, अरे मारून टाकेल तो आपल्या अस्मितेला...." अगदी कळकळीने काल रस्त्यावर एक माणूस दुस-या माणसाला सांगत होता. या सगळ्या विचारांत काहीसं तथ्य असलं जरी, तरी बरचसं नाही आहे. मुंबईतला एक मुख्य पक्ष हा पहिल्यापासून मराठी माणसाचा पक्ष राहिलेला आहे. मराठी माणसाला मुंबईत कधीच पोरकं केलं गेलं असतं. पण त्याला बळ दिलं, त्याचा दरारा प्रस्थापित केला तो या पक्षाने. दंगलींच्या वेळी मराठी माणसाला मुंबईत आधार होता तो याच पक्षाचा.

पिंपळ (रहस्य कथा) - भाग १

लेखक खोंड यांनी शनिवार, 25/10/2014 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
करकर आवाज करीत आणि कच्च्या रसत्यावरील पांढरा धुरळा उडवीत एस टी थांबली. रसत्याच्या कडला बसलेले दोघं तिघं उठून एस टी च्या मागच्या बाजू जवळ आली. "आली बाबा शेवटली बस " ९.३० झाले म्हणलं आता काय येत नाय वाटतं " एक म्हातारा बाबा खाट करून खटक्याचा आवाज झाला आणि एखाद्या पुराणी हवेलीचा दरवाजा उघडावा तसा आवाज करीत वाहकान दरवाजा ढकलला. २ बाया उतरल्या त्यांच्या पाठोपाठ एक इसम उतरला. हातातली हिरव्या रंगाची लोखंडी ट्रंक सांभाळत तो उतरला. काखेत एक कवी लोक वागवतात तशी पिशवी. गाडीन यु टर्न घेतला. ३-४ जन एस टी मध्ये चढले आणि गाडी परत धुराळा उडवीत करकर आवाज करीत निघाली. तो इसम तसाच रसत्या च्या बाजूला थबकला.

दिवाळीचे फटाके !

लेखक मनो यांनी बुधवार, 22/10/2014 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
(वाघाच्या गुहेतला एक सीन) धाकटे राजे (बात्तीसाव्यांदा): "बाबा, मग लावू का त्या माथुरला फोन?" थोरले राजे: "थोडी वाट पहा अजून" धाकटे राजे (स्वतःशीच पुटपुटत): "पंधरा वर्षे झाली, लहान असल्यापासून लाल दिव्याची वाटच पाहतो आहे … " थोरले राजे: "काय म्हणालास?" धाकटे राजे: "काही नाही. दुपारी आमदारांना काय सांगायचं मग?" थोरले राजे: "त्यांना काय कळतंय, सगळे निर्णय मीच घेणार" धाकटे राजे: "मग सुभाषला का पाठवायचं?" थोरले राजे: "तुला काहीच कळत नाही. अरे त्याच्याकडे दोन अग्रलेख तयार आहेत.

लिफ्ट

लेखक स्पार्टाकस यांनी रविवार, 19/10/2014 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
"साब, दो पंक्चर है. निकालनेमें टाईम लगेगा!" "दो पंक्चर?" "हा साब! देखो!" गॅरेजवाल्याने मला पाण्याच्या पिंपात बुडवलेली टायरची ट्यूब आणि दोन ठिकाणाहून येणारे बुडबुडे दाखवले. "कितना टाईम लगेगा?" "एक घंटा तो लगेगा साब कमसे कम!" मी दुसरं काय करु शकणार होतो? कारच्या डिकीत नेमका एक्स्ट्रा टायर नव्हता. त्यामुळे पंक्चर काढून होईपर्यंत थांबण्यापलीकडे गत्यंतर नव्हतं! आधीच माझा मूड खराब होता. एकतर ऑफीसमधून लवकर निघण्याच्या माझ्या बेताला नेहमीप्रमाणे माझ्या मॅनेजरने सुरुंग लावला होता.