Skip to main content

लेख

खपले जाल !!

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 11/10/2015 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
चवदार तळ्याच्या काठी साधारण चार बदके बसली होती. पाण्यात मगरींचा सुळसुळाट होता. त्यातल्या एका बदकाने डुबुक करत पाण्यात सुर मारला. पोहत पोहत तो दुसऱ्या काठावर पोहोचला. तिकडुन त्याने या मागच्यांना खुण केली. मग दुसऱ्या बदकाने डुबुक करत पाण्यात सुर मारला. पोहत पोहत तो पाण्याच्या मध्यभागी आला. एक बेडूक काठावरुनच या गोष्टींकडे बारीक लक्ष ठेऊन होता. मग त्यानेही डुबुक करत पाण्यात सुर मारला. पोहत पोहत त्याने दुसऱ्या बदकाला पाण्याच्या मधोमध गाठले. आणि त्याला म्हणाला, "हे बदकदादा, या पाण्यात भयंकर मोठ्या अशा मगरी आहेत. एकतर तू पाण्यात ऊतरून चुक केली आहेस.

एनरॉन पुन्हा एकदा !!

लेखक अनिकेत एस जोशी यांनी रविवार, 11/10/2015 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राच्या राजकारणाला निराळी,मोठी कलाटणी देणारा एक कोणता विषय असेल तर तो आहे एनरॉन प्रकल्प. एनरॉन या अमेरिकन कंपनीने जीई व बेक्टेल या अन्य दोन अमेरिकन सुरोपीय कंपन्यांसमवेत दाभोळ वीज कंपनीची स्थापना केली. त्यात एनरॉनचा वाटा 67 टक्के होता. प्रकल्पाचे कागदोपत्री नाव जरी दाभोळ असेल तरी जनतेत मात्र तो एनरॉन प्रकल्पच राहिला. 1991-92 पासून ते 2001 मध्ये अंतिमतः राज्य सरकारने बंद करेपर्यंत या प्रकल्पासून वीज निर्मिती म्हणावी तशी झाली नाही. राजकारणाचे पाझर मात्र मोठ मोठे फुटत राहिले.

पराडकर सर ......२ (अंतिम)

लेखक चुकलामाकला यांनी शनिवार, 10/10/2015 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
पराडकर सर ........१ परदेशी स्थायिक झाल्यानंतर गावाकडच्या फेऱ्या तशा कमी झाल्या. मग ऑर्कुटवर सरांच्या माजी विद्यार्थ्यांचा एक ग्रुप बनला. त्यावर एका मित्राचा मेसेज आला की सरांना प्रोस्टेट कँन्सर डिटेक्ट झालाय म्हणून. सरांचे विद्यार्थी सर्व क्षेत्रात पसरले होते. भराभरा सुत्रं हलली. मुंबईला टाटामध्ये ट्रीटमेंट झाली. सर तीन चार महिन्यानंतर गावी परतले. आठवड्यातून दोनदा जवळच्या मोठ्या शहरात जाऊन इंजेक्शन घेऊ यावे लागे. शिवाय वॉकरही संगतीला घ्यावा लागे. सर कसलीही तक्रार न करता हसतमुखानं सगळं सहन करत होते.

---------------द्वं--द्व---------------

लेखक अर्थहीन यांनी शुक्रवार, 09/10/2015 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी ऑफिसवरुन सिटीत मित्रांकडे बाईक वरुन जात असेन. यूनिवरसिटी चौकातल्या जगातल्या सर्वात मोठ्या सिग्नलला गाडी बंद करून उगाच हिकडं तिकडं बघत असेन. तेवढयात एक काळं-शेंबडं पोरगं कडेवर घेतलेली -त्या पोरापेक्षा थोड़िशीच मोठी पोरगी , स्वत् अन कडेवरच्या त्या पोराला कशीबशी सावरत 'कितीही कललं तरी ते बारकं पडणार नाही' या कॉंफीडन्सनं समोर चालत येईल. क्षणार्धात डोळ्यात अतिशय करूण अन हतबल भाव आणून , मारून-मारून शिकवलंय तितकं बारकं तोंड करून खाडकन 'आशेने' आपला तळहात पुढे करेल.

कोकणातला उन्हाळा.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 08/10/2015 06:26 या दिवशी प्रकाशित केले.
"त्या खोल ओहळात म्हणे, पुन्हाळेकरांच्या तरूण सुनेने आयुष्याला कंटाळून जीव दिला होता." कोकणातला पावसाळा जसा मला आवडतो तसा कोकणातला उन्हाळापण आवडतो.उन्हाळ्यातला तो ताज्या हवेचा थंड वारा,फुलझाडांच्या आणि मोहर आलेल्या आंब्याच्या पानामधून, जेव्हा घाईगर्दीने शिरून बरोबर फुलांचा आणि आंबेमोहराचा सुगंध दरवळत आपल्या नाकावर येऊन आदळतो आणि सोनचाफ्यासारख्या उंचच उंच वाढणार्‍या झाडावरच्या चाफ्याच्या फुलांच्या पाकळ्या हळुवार जमीनीवर पसरवतो किंवा पारिजातकाच्या फुलांचा सडा झाडाच्याच खाली घालतो, तेव्हा अनुभवलेला एखादा बहारदार दिवस आठवून मला त्या वातावरणात परत जावं कसं वाटतं. निरभ्र आकाशातला एखादा पांढरा ढग

मोकलाया दाही दिश्या ते भटकाया दाही दिश्या : एक प्रवास

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 06/10/2015 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
(ढेस्क्लेमर: या लेखातून माझा कुणालाही हिणवण्याचा अथवा दुखावण्याचा हेतू नाही. याउलट 'हसण्यासाठी जगणे आणि जगण्यासाठी हसणे' हा माझा हास्य'बाना' सर्वांपर्यंत पोचविण्याचा एक किंचीतसा प्रयत्न आहे! तरीही कुणाला माझ्या लेखातील/काव्यातील काही जागांना आक्षेप असल्यास कळवावे, दुरूस्ती किंवा तो भाग काढून टाकण्यासाठी संमंना सांगून प्रयत्न केला जाईल!) न्मसर्कार म्हणडलि! तर महाराजा, शीर्षक आणि पहिली ओळ वाचून पुढे काय वाचायला मिळणार आहे याचा एक अंदाज मिपाकरांना आलाच असेल! तुम्ही बरोबर विचार करताय, सदर लेख "त्याच" काव्यचमत्काराला वाहिलेली एक शब्दांजली आहे.

---------एका प्रवासाचा क्रॉससेक्शन------------

लेखक अर्थहीन यांनी मंगळवार, 06/10/2015 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
---------एका प्रवासाचा क्रॉससेक्शन------------ गांधीबाबांची जयंती. सुट्टी. लॉन्ग वीकेंड. घरी जायचं म्हटलं की आजही तेवढाच आनंद. पुणे-सोलापूर सकाळी 9.30ची इंटरसिटी गाठायची आहे. जगताप-डेरीच्या नवीन BRTस्टॅंड वर कानात हेडफोन अडकवुन प्रसन्न मनानं बसची वाट पाहतो. गाणं चेंज करेस्तोर 5 मिनटातच -हादरा बसताना फ़क्त चुंयि-चुंयि असा आवाज करणारी वातानुकुलीत BRT येते. स्वयंचलित दरवाजातून प्रवेशतो. संपूर्ण भला मोठा अन व्यवस्थित लेन्स आखलेला गुळगुळीत प्लेन रोड. प्रवास म्हणजे सु:ख! आत बसल्यावर बस हालली तरी फ़क्त हत्तीच्या पाठीवर इकडून-तिकडे मऊ झुलल्यासारखं वाटावं इतका मऊपणा..

पुणे कट्टा वृत्तांत- ४ ऑक्टोबर २०१५

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी सोमवार, 05/10/2015 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे पेर्णास्त्रोतः भव्य आवाहन ~ दिव्य आवाहन ~ दो सोनार की इक लोहार की २४ सप्टेंबर २०१५ (ख्रिस्तपुर्व लिहायचा मोह आवरला) मिपावरचं एक भव्य (?) दिव्य (नमस्कार माझा तया दिव्यश्रीला) वॅक्टीमॅट्व श्री.स्त्री.दी.भव्यश्री ह्यांनी युरोपखंडे जर्मनदेशे नामक भुभागावरुन भारतामधल्या पुण्यभुमीमधे एक समस्तं मिपाकरांचा एक कट्टा व्हावा असा डाव्या पायातला बुट काढला.

पहाट.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 04/10/2015 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
“पाऊल पुढे टाकायला ही पहाट मला इंधन पुरवते.”---संध्या परब सकाळीच बाहेर फेरफटका मारायची माझी जूनीच संवय आहे.मग मी कुठेही फिरतीवर असलो किंवा कुणाकडे बाहेर गावी रहायला गेलो असलो तरी सकाळी उठून जवळ असलेल्या कुठच्याही मोकळ्या जागी फिरून यायचो.मग कोकणात असलो तर,बाजूच्या शेतीवाडीत फिरायचो,समुद्राजवळ असलो तर चौपाटीवर जायचो,छोटासा डोंगर असला तर घाटी जढून जायचो.जवळ नदी असेल तर नदीच्या किनार्‍या किनार्‍याने फिरत जायचो. शहरात असल्यानंतर मात्र अशी निवड करायला मिळत नसायची. एकदा मी दिल्लीत असताना वसंत विहार कॉलनीत रहायला होतो.कॉलनीत अतीशय सुंदर पार्क होता.खूप लोक सकाळी फिरायला यायचे.गॉल्फचं मैदान पण होतं

ब्रायन क्लोज - द मॅन ऑफ स्टील!

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 03/10/2015 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रायन क्लोज गेला! कोण ब्रायन क्लोज? असा प्रश्न साहजिकच अनेकांच्या मनात चमकून गेला असेल. अगदी क्रिकेट जाणकारांच्याही! कारण सध्याच्या ट्वेंटी-ट्वेंटीच्या जमान्यात ८४ व्या वर्षी ख्रिस्तवासी झालेल्या क्लोजबद्दल तपशीलवार माहिती असण्याची शक्यता विरळाच! आजकालच्या हिमेसभाय, यो यो हनीसिंग (काय पण नाव!), आतिफ अस्लम (हे माणसाचं नाव आहे. मला आधी हा मुर्ग मुसल्लम सारखा खाण्याचा प्रकार वाटला होता.