इंग्लिश विन्ग्लीश !
मी इंग्रजी सिनेमे पाहण्याचे जवळजवळ थांबवल्यापासून माझ्याकडे तुच्छतेने पाहणाऱ्या नजरा वाढल्या आहेत. खरं म्हणजे माझ्या पाहण्या न पाहण्यामुळे या सिनेमांच्या लोकप्रियतेत किंवा अर्थकारणात काहीही फरक पडत नाही. फरक केंव्हा पडतो तर जेंव्हा चार लोकांत मी अमुक अमुक सिनेमा पहिला नाही असे कबूल करतो तेंव्हा.
"नाही...मी नाही पहिला अवतार"
"काय? तू अवतार नाही पाहिलास?", खुर्चीवरून उसळत माझा कलीग मला विचारतो.
"नाही"
"मूर्ख आहेस का तू ? तुला कळत नाहीये तू काय गमावलं आहेस!!!"
हे प्रातिनिधिक संभाषण नेहमी,"तुझे पता हैं तुने किसका कॅच छोडा हैं?" या आवेशात सुरु होतं. आणि शेवटी "गाढवाला गुळाची चव काय" यावर संपतं.
मिसळपाव