विखार - कथा - काल्पनीक
विखार - कथा - काल्पनीक
लग्नसमारंभाचा हॉल छान सजवलेला होता . सकाळपासुन पाहुणे मंडळी यायला सुरुवात झाली . थोड्याच वेळात लग्नाचे विधी सुरु झाले . वधुपक्षाची मंडळी लगबगीने इकडुन तिकडे धावत होती . दोन्ही बाजुंकडील लोकांचे आगत- स्वागत , मानपान कौतुकाने करीत होती . वरपक्षाच्या लोकांना काय हवे नको ते बघुन त्यांच्या मागण्या हसत हसत पुरवीत होती.
पण हळुहळु वरपक्षाची मंडळी पिसाटल्यासारखे करु लागली . त्यांच्या मागण्या अचानक वाढतच जाउ लागल्या .
"मुलाला नवीन घड्याळ हवे " , "मुलाच्या अमक्या तमक्या नातेवाईकांचे आहेर , मानपान नीट झाले नाही ते आधी पार पाडा" अशा एकेक फर्माईशी सुटु लागल्या .
मिसळपाव
