Skip to main content

लेख

आमचे सार्वजनिक व्यावसायिक अनुभव !

लेखक चिनार यांनी मंगळवार, 17/05/2016 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ : राहते घर वेळ: शनिवार, सकाळचे दहा वाजलेले प्रसंग : घरातल्या बाथरूममधले गीझर २ दिवसांपासून खराब झालेले आहे. त्यामुळे घरातले वातावरण जरा 'तापलेले' आहे. दोन दिवस काय केले हा प्रश्न इथे गैरलागू ठरतो कारण फाईव्ह डे वीकच्या संस्कृतीत घरगुती कामांचे स्टेटस हे फक्त शनिवारी अपडेट होते. तेसुद्धा सकाळी ९ ते १ किंवा संध्याकाळी ६ ते ९ ह्याच वेळात ! (दुपारी १ ते ५, मी चितळ्यांची परंपरा पाळून ढाराढूर झोपतो. ह्यावेळी जगाने मला त्रास देऊ नये ,मी जगाला देणार नाही एवढी माफक अपेक्षा!). शनिवारच्या या वेळापत्रकात जर एखादे काम झाले नाही तर ते पुढच्या शनिवारी ढकलले जाते.

राजाराम सीताराम एक ----------------भाग १७ - मुंबईचा मित्र

लेखक रणजित चितळे यांनी मंगळवार, 17/05/2016 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या आधीचे.......... राजाराम सीताराम एक राजाराम सीताराम दो।...... भाग १ प्रवेश. राजाराम सीताराम....... भाग २... पुढचे चार दिवस. राजाराम सीताराम....... भाग ३... सुरवातीचे दिवस – भाग १. राजाराम सीताराम....... भाग ४... सुरवातीचे दिवस – भाग २. राजाराम सीताराम....... भाग ५... आयएमएतले दिवस. राजाराम सीताराम....... भाग ६... मसुरी नाइट. राजाराम सीताराम....... भाग ७… ड्रिलस्क्वेअर. राजाराम सीताराम....... भाग ८....शिक्षा. राजाराम सीताराम....... भाग ९....एक गोली एक दुश्मन।.... भाग १. राजाराम सीताराम....... भाग १०. एक गोली एक दुश्मन।.... भाग २. राजाराम सीताराम....... भाग ११.

भारतीय संस्कृतीमधील प्राचीन जलसाक्षरता

लेखक रमेश भिडे यांनी सोमवार, 16/05/2016 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
. पाचव्या शतकात वराहमिहीर नावाचा प्रकांड ज्योतिषी व पर्यावरणशास्त्रज्ञ होऊन गेला. भूगर्भातील पाण्याचा शोध घेण्याविषयी त्यांनी संशोधन केलेच, शिवाय अन्य ऋषींचे संशोधनही आपल्या बृहत्‌संहिता या ग्रंथात लिहून ठेवले. आजच्या काळाला त्याची सुसंगत जोड देत सध्याच्या संशोधनाला त्यातील काही सिद्धांतांचा, नियमांचा उपयोग होऊ शकेल. भूमीच्या अंतर्भागात असणारे पाण्याचे साठे शोधून काढणे हे मोठे आव्हान भूगर्भशास्त्रज्ञांसमोर पूर्वीही होते, आताही आहे.

जलसाक्षरता : पाण्याच्या देशात!

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 15/05/2016 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे मला एका संपादक मित्राने विचारलं, ‘लोकसंस्कृतीतील ओव्यांमध्ये वा लोकगीतांमध्ये पाणी वाचवण्यासंदर्भात काही मौखिक परंपरा असतील तर त्या उपयोजित करत लेख लिहाल का?’ मी म्हणालो, ‘नाही.’ मी पटकन दिलेल्या ‘नाही’ उत्तराने त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, ‘का?’ ‘कारण आपल्या लोकसंस्कृतीच्या परंपरेत इथं पाणीच पाणी आहे. भारत हा पर्वतांचा आणि नद्यांचा देश आहे. पूर्वीपार नदीच्या काठांवरच गावं वसलेली होती. इथं भरपूर जंगलं होती. म्हणून पाऊसही भरपूर कोसळायचा. पावसाच्या झड्या लागायच्या. पाण्याचे महत्व कळण्याचे दिवस नव्हतेच पूर्वी.

बालगंधर्व.... भाग - २ शेवटचा...

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 13/05/2016 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
खालील लेख वाचताना एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायला हवी "त्या काळात एखाद्या कारकुनाचा पगार महिना ८ रुपये असायचा तर चांगल्या मास्तरांचा ३०-३५.'' बालगंधर्व.... भाग - १ पहिला... बालगंधर्व....

निसर्ग, पर्यावरण आणि आपण २: नैसर्गिक असंतुलनामध्ये मानवाची भुमिका

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 12/05/2016 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्ग, पर्यावरण आणि आपण १: प्रस्तावना नैसर्गिक असंतुलनामध्ये मानवाची भुमिका मागच्या लेखात आपण बघितलं की, निसर्गाच्या नियमानुसार सर्व सृष्टी चालते. त्याची एक व्यवस्था असते. जर ह्या व्यवस्थेवर ताण पडला, तर निसर्गही बदलतो. जसं गुरुत्वाकर्षण हा एक नियम आहे. जर आपण वाकडे तिकडे चाललो तर आपण ह्या नियमामुळेच पडतो. त्याच प्रकारे आपण आणि निसर्ग ह्यांच्यात तणाव निर्माण होऊ शकतो.

बालगंधर्व.... भाग १

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 12/05/2016 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र दिनानिमीत्त बालगंधर्वावरील हा लेख लिहिण्यास घेतला होता. उशीर झाला आहे मान्य ! यातील माहिती बर्‍याच जणांना माहीत असेलच पण मी लिहिले कारण मला या भारी माणसाला आदरांजली वहायची होती... लागोपाठ येणार्‍या माझ्या लिखाणाला तुम्ही सहन कराल अशी आशा आहे. यानंतर मात्र लगेच लेख टाकणार नाही याची खात्री बाळगा.... खालील लेख वाचताना एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायला हवी "त्या काळात एखाद्या कारकुनाचा पगार महिना ८ रुपये असायचा तर चांगल्या मास्तरांचा ३०-३५.'' बालगंधर्व....

अवचिता परिमळू...

लेखक मनमेघ यांनी बुधवार, 11/05/2016 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
अवचिता परिमळू । झुळकला अळुमाळु । मी म्हणे गोपाळू । आला गे माये ।। चांचरती चांचरती । बाहेरी निघाले । ठकचि मी ठेले । काय करु।। मज करा का उपचारू । अधिक तापभारू । सखी ये सारंगधरू । मज भेटवा का ।। तो सावळा सुंदरू । कासे पीतांबरू । लावण्य मनोहरू । देखियेला।। भरलिया दृष्टी । जव डोळा न्याहाळी । तव कोठे गेला वनमाळी । गे माये ।। बोधुनी ठेले मन । तव जाले अनेआन । सोकोनि घेतले प्राण । माझे गे माये ।। बाप रखुमादेवीवरू । विठ्ठल सुखाचा । तेणे काया-मने-वाचा । वेधियेले ।। रात्रीची जेवणे झाली, आवरा आवर करून मी झोपायला निघाले. अचानक कुठून तरी मंद सुगंध येऊ लागला. कशाचा बरं सुगंध आहे हां?

श्वानांचे प्रेम

लेखक अनाहूत यांनी सोमवार, 09/05/2016 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
तस पाहिलं तर कुत्रा या प्राण्याबद्दल मला फारस कधी प्रेम नव्हत . पण या प्राण्याला माझ्याबद्दल नेहमी प्रेम वाटत आलेले आहे . पूर्वी अगदी फार भुंकणारे कुत्रेहि मला भुंकत नसत . याच कारण काही माहित नाही . पण बहुधा माझा अंधविश्वास याला कारणीभूत असावा असे वाटते . मला असे वाटायचे कि आपण जीन्स घातली असल्यामुळे त्याचे दात काही या जीन्सला पार करून आपल्यापर्यंत पाहोचणार नाहीत व फक्त आपण हात वर केला तरी तो आपल्या हाताला चावू शकणार नाही . त्यावेळी मित्र परिचित नातेवाईक यांच्याकडच्या कुत्र्यांनाही फार प्रेम व्यक्त करूस वाटायचं .

निसर्ग, पर्यावरण आणि आपण १: प्रस्तावना

लेखक मार्गी यांनी रविवार, 08/05/2016 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना आज पर्यावरणात अनेक ठिकाणी उद्रेक होताना दिसतात. देशामध्ये अनेक ठिकाणी दुष्काळ पसरला आहे, पहाडामध्ये वणवे पेटत आहेत आणि संपूर्ण जगात कुठे भूकंप येत आहेत, कुठे वादळ तर कुठे लँडस्लाईड. आपल्या देशाच्या संदर्भात दुष्काळाची समस्या अगदी गंभीर स्थितीत आहे. अशावेळी प्रश्न पडतो की, ह्या सगळ्यांसाठी आपण काय करू शकतो? ह्या विषयावर आपल्याशी बोलू इच्छितो. आजवर ह्या विषयाबद्दल जे समजून घेतलं ते आपल्याला सांगू इच्छितो. दुष्काळाच्या संदर्भात वर दिसत असलेली स्थिती ही मूळ समस्येची समोरची बाजू. समस्येचं समोर येणारं आणि दिसत असलेलं रूप.