Skip to main content

लेख

एका वेड्याची रोजनिशी.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 15/06/2017 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire एका वेड्याची रोजनिशी. ऑक्टोबर ३ आज एक विचित्र गोष्ट घडली. आज जरा उशीराच उठलो. सावित्रीबाई माझी न्याहरी घेऊन आल्या तेव्हा मी त्यांना किती उशीर झालाय हे विचारले. १० वाजून गेलेत हे ऐकल्यावर मी घाईघाईने आवरले. खरं सांगायचं तर आज ऑफिसला जायची इच्छाच नव्हती कारण तिथे जाऊन साहेबाचा कडू औषध घेतल्यासारखा चेहरा पहावा लागला असता.

अगरीयांच्या शोधात

लेखक अमृता गंगातीरकर यांनी बुधवार, 14/06/2017 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका डॉक्युमेंटरी फिल्मच्या संदर्भात मध्य प्रदेश आणि छत्तीसगढच्या आदिवासींचा रहिवास असलेल्या जंगलात भटकण्याचा अनुभव मिळाला. खनिज वितळवून लोह मिळवणाऱ्या अगरीया नावाच्या आदिवासी जमातीला हुडकून त्यांच्या ह्या पुरातनकालापासून चालत आलेल्या पद्धतीवर फिल्म बनवण्याचा घाट आम्ही घातला होता. पूर्णपणे शहरात जगलेल्या वाढलेल्या मला ह्या आदिवासींकडून आणि त्यांच्या जगावेगळ्या लोखंड गाळण्याचा पद्धतीकडून काय अपेक्षा ठेवावी हेच कळत नव्हते. ह्या फिल्मची रिसर्चर आणि असिस्टन्ट डिरेक्टर असलेल्या मला माझा रिसर्च मला खूप वेगवेगळ्या प्रकारचे परस्परविरोधी पुरावे देत होता.

नामकरण.. एक प्रेमकथा - भाग २ (अंतिम)

लेखक दिपक लोखंडे यांनी मंगळवार, 13/06/2017 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ पासून पुढे - .................................................................. बसा मि. सागर.. डॉक्टर, काळजी करण्यासारख काही नाही ना? काळजी करु नका, बाळाची वाढ अगदी योग्यरित्या होत आहे... आणि हो, मी काही औषधे लिहुन देते. ती यांना वेळेवर घ्यायला सांगा.. आणि आता जास्त काळजी घ्यायला हवी दिवस भरत आलेत, लवकरच गुड न्यूज मिळेल.. हो डॉक्टर.. दोन आठवड्यानंतर त्यांना घेवून या, चेकअप साठी.. ............................................................. संध्याकाळी ६ वा.. (सागर व कविता गार्डनमधे...) सूर्य मावळताना किती छान दृश्य निर्माण होत ना? होय.. अहो तुम्हाला आठवतय?

पारिजात

लेखक aanandinee यांनी मंगळवार, 13/06/2017 या दिवशी प्रकाशित केले.
सुन्न मनाने तिने फोन ठेवला. समोरच्या टेबलवर ठेवलेला चहा केव्हाच थंड झाला होता, त्याखालचा सकाळचा पेपर फडफडत होता पण तिला काही सुचत नव्हतं. हुंदकाही येत नव्हता. आतून थिजल्या सारखी ती गोठून गेली होती. अण्णा जाणार हे निश्चितच होतं. त्यांचं वयही झालं होतं. होणार हे माहीत असलं तरी प्रत्यक्षात झाल्यावर गोष्ट मनाला चटका लावून जाते. गायत्रीचही तसंच झालं. अण्णांच्या मागोमाग तिच्या मनात विचार आला माईचा. माई कशी असेल? सावरली असेल का? तिने चटकन माईला फोन लावला. पण कोणी फोन उचललाच नाही.      माईशी बोलल्यालासुद्धा आता बरेच महिने होऊन गेले होते.

इंग्लीश स्कूलचं फॅड

लेखक परशुराम सोंडगे यांनी शुक्रवार, 09/06/2017 या दिवशी प्रकाशित केले.
कथा आणि व्यथा इंग्लीश स्कूलचं फॅड गावचा नामा त्या दिवशी भेटला. बॅंकेच्या दारात.गडी जरा घाईतच होता.हातात बरीचं कागद होती. त्याला बॅंकेचं कर्ज काढायचं होतं. मी:अरे कर्ज कशाला काढतो?" तो:"कशाला म्हंजे? पोरग टाकलं की शाळात" मी:"शाळात टाकलं ?त्यासाठी कर्ज ?" तो:"मग ?"इंग्लीश स्कूल मध्ये टाकलं. रोज येतं की स्कूलबसात बसून पाटादयाला." मी: "किती पैसं भरलं ? तो:आता भरलं पंच्चीस. पुन्हा दयाचं वीस.तसं काय नाही .सारे संभाळून घेतात आपल्याला.रामाचं पोरग घेतलं की पियोन म्हणून ." मी:"आरं,एवढ पैसं कशी आणणाऱ ?" तो:"कसं म्हंजे? काय झाडाला तोडायचेत व्ह? उचल घेणारं .बायको भी समजदार.

एक ट्रेक ---- झपाटलेला (भाग १)

लेखक अमर विश्वास यांनी शुक्रवार, 09/06/2017 या दिवशी प्रकाशित केले.
वीस वर्षापुर्वीची गोष्ट आहे.. 1995 च्या डिसेंबरची एक रात्र,, साधारण आठची वेळ... स्थळ : आनंद नगर मधला एक फ्लॅट... चार मित्र कोंडाळ करून बसले आहेत.. कुणीच काही बोलत नाही... प्लॅंचेट वगैरे काही नाही.. तसाही माझा असल्या गोष्टींवर विशवास नाही.... हो.. पण आधी आमची ओळख करून देतो.. आम्ही चौघ... विन्या, सुन्या, मन्या आणि मी म्हणजेच अम्या किंवा अमर्या किंवा.. जाउदे सगळीच टोपणनावे सांगण्यासारखी नाहीत. चौघही इंजिनियरिंगचे विद्यार्थी. परिक्षा, व्हायावा नुकत्याच संपलेल्या.. त्यामुळे श्रमपरिहार करायला आम्ही एकत्र जमलो होतो. या सुट्टीत काय करायचे हाही विषय होताच. च्यायला..

एक भुताचा अनुभव

लेखक खट्याळ पाटिल यांनी शुक्रवार, 09/06/2017 या दिवशी प्रकाशित केले.
नोंद : लेखा चा उद्देश अंधश्रद्धा ला खतपाणी घालणे नाहि. तेव्हा मी महाविद्यालय मध्ये शिकत होतो तेव्हाची हि माझी गोष्ट आहे. पहाटे लवकर उठून व्यायाम शाळेत जाण्यासाठी मी माझे गजराचे घड्याळ एक तासाने पुढे करून ठेवत असे, जेणे करून ५ वाजता गजर वाजला तर मी ४ वाजताच उठून एक तास अभ्यास करून फ्रेश होऊन मग ५ वाजत व्यायाम शाळेत जाईल असा होता. सकाळी लवकर ४ ला उठणे खूप जिकरीचे आणि अवघड वाटे म्हणून हि खटाटोप केली होती. असो, त्या दिवशी पण मी नेहमी प्रमाणे ५ वाजताचा गजर वाजताच उठलो, पण आदल्या रात्री मित्रांसोबत चिवडा खात खात खूप खमंग भुतांच्या गप्पा मारल्या होत्या.

फिक्सींग

लेखक रघुनाथ.केरकर यांनी गुरुवार, 08/06/2017 या दिवशी प्रकाशित केले.
राजा: हळु रे .... कित्या इतको राग काढतय... शिवा: मेल्या तुका आदी मी वळखाकच नाय मरे.... राजा: सांगतय काय...? तेवाच मायझया ह्यो वाकर काढलय मानेर शिवा : सॉरी सॉरी हा.... चुकान झाला रे.... राजा: मेल्या भगभगता कसला.... कितकी ती धार काढलय शींगांका. येक दिवस शाप झरान जातली. इतक्यात शिवा ने जोर कमी केला. राजा बैल अजुन तसाच मस्तक रेटत शिवा बैलाला पुढे ढकलत राहीला. दोन्ही बैलांचे मालक हातात कासरे धरुन झुंज बघत होते.

त्या तिथे, पलीकडे... टेकाडे

लेखक सरनौबत यांनी गुरुवार, 08/06/2017 या दिवशी प्रकाशित केले.
शाळा भरायच्या एक-दीड तास आधी घरून निघणारी 'इंटरनॅशनल स्कूल' ला जाणारी मुलं पाहिली कि आपला 'बालपणीचा काळ किती सुखाचा' होता ते जाणवतं. पुण्यात एरंडवणे भागात बालपण गेलं. शाळा सायकलने ५ मिनिटे आणि कॉलेज १५ मिनीटांवर. अर्थात शाळा, कॉलेज, ऑफिस इ. गोष्टी घरापासून अगदी जवळ असणारे इतरही अनेक भाग पुण्यात आहेत. मात्र ह्याचबरोबर अजून एक ठिकाण ५ मिनिटांच्या अंतरावर आहे. ते म्हणजे माझी लाडकी 'हनुमान टेकडी'. कर्वे रस्त्यासारख्या प्रचंड वाहतुकीच्या रस्त्यालगत हे एक अदभुत जग वसलेलं आहे. अगदी लहानपणी आमच्या सोसायटीतल्या ठाकूर काकांबरोबर आम्ही सगळी लहान मुलं संध्याकाळी टेकडी वर जायचो.

'विश्वास'कार श्वेता भट्टड : मुलाखत भाग १ (पर्यावरण दिनानिमीत्त)

लेखक मंजूताई यांनी गुरुवार, 08/06/2017 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्गायण मंडळाच्या मार्च महिन्यात सभेला परगावी असल्यामुळे जाता आलं नाही व उपस्थित मंडळींकडून कळलं की एक अफलातून काम करणार्‍या महिलेशी ओळख झाली व तिच्या कामाचा परिचय झाला. कलेच्या माध्यमातून ती समाजजागृती, समाजसेवा करते एवढंच जाणून घेतलं,जास्त खोलात न जाता , उत्कंठा दाबून ठेवत. नागपूरल्या परतल्यावर प्रत्यक्ष भेट घेऊनच तिच्या कामाची सविस्तर माहिती घ्यायचं ठरवलं. कोर्‍या पाटीने भेट घ्यायला तिच्या घरी पोचले अन अवाकच झाले. एकतर आपल्या मनामध्ये एखाद्या समाजाविषयी आपले पूर्वग्रह असतात, ते मोडीत निघाल्याने अन दुसरे म्हणजे तिचं धारिष्ट्य!