गावात पहिली लुना
- डॉ. सुधीर रा. देवरे
मी चौथी पाचवीत असेल तेव्हाची गोष्ट. गावात ज्यांच्या जवळ सायकल, हाताला हँडो शँडो घड्याळ आणि घरात फिलिप्सचा रेडिओ तो माणूस श्रीमंत असल्याचे समजले जायचे. रेडिओचा शबनमसारखा लांबलचक पट्टा खांद्याला अडकवून गाणे ऐकत मळ्यात जाणारे लोक पहायला मिळायचे. मळ्यात बारे देताना विविध भारतीवरचे गाणे ऐकणारे सालदारही कुठे कुठे पहायला मिळायचे.
अशाच दिवसात माझ्या वडील बहिणीचे लग्न ठरले आणि हुंड्यात कबूल केल्याप्रमाणे दाजींना फिलिप्सचा रेडीओ द्यायचा होता म्हणून आण्णांनी सटाण्याहून दोन मसाल्यांवर चालणारा नवा करकरीत रेडीओ आणला.
मिसळपाव