Skip to main content

लेख

नियतीचे वर्तुळ

लेखक सचिन काळे यांनी रविवार, 02/07/2017 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
रेखा झपझप पावलं उचलत चालत होती. कामावर जायला फार उशीर झाला होता. आठ तेराची लोकल आज पुन्हा सुटणार होती. आजकाल कामावर जायला उशीर होणं रोजचंच झालं होतं. अलार्म वाजूनसुद्धा तिची बिछान्यातून बाहेर पडायची इच्छाच होत नसे. रात्र रात्र डोळ्याला डोळा लागत नसे. ती सतत प्रदीपचाच विचार करी. तासंतास त्याचेच विचारचक डोक्यात फिरत राही. प्रदीपबरोबर आपण जसं वागलो त्याचे ती मनातल्या मनात सारखं समर्थन करण्याचा प्रयत्न करीत राही. आपलं वागणं चूक की बरोबर होतं याचा ती निर्णय करू शकत नव्हती. रेखाचे वडील तीन वर्षांपूर्वीच एका खाजगी शाळेतून शिपाई म्हणून रिटायर झाले होते.

पारिजात मनातला

लेखक मनीमोहोर यांनी रविवार, 02/07/2017 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाचं आणि आपल्या केशरी देठाच्या नाजूक पांढऱ्या शुभ्र फुलांचं सारं वैभव धरणीमातेला अर्पण करणाऱ्या पारिजातकाचं माझ्या मनात अगदी घट्ट नातं आहे . काळ्या भोर डांबरी रस्त्यावर पावसाची फुलं उमलू लागली की पारिजातकाच्या सगळ्या आठवणी माझ्या मनात दाटी करतात ... न चुकता .. दरवर्षी . पारिजातकाची अगदी पहिली आठवण खुप लहानपणीची आहे . वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे आम्ही खूप घरं बदलली . त्या पैकी एका घराच्या अंगणातच खूप मोठं परिजातकाचं झाडं होतं . श्रावण महिन्यात ते बहरलं आणि रोज अंगणात फुलांचा सडा पडू लागला . आमची आजी देवभोळी होती . तिने प्राजक्ताचा लक्ष शंकराला वहाण्याचा संकल्प केला .

नावात बरंच काही असतं!

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शनिवार, 01/07/2017 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे नावात काय आहे, असं म्हटल्याबरोबर आपल्याला शेक्सपिअर हे नाव आठवतं. हो, फक्‍त नावच आठवतं. कारण शेक्‍सपिअर नावाची व्यक्‍ती कोणी पाहिली? निदान मी तरी नाही. व्यक्‍तीच काय पण शेक्‍सपिअरचं छायाचित्रही मी अद्याप पाहिलं नाही. आपण पाहतो ते शेक्‍सपिअरचं चित्र आहे. असो. म्हणजे नावात काय आहे, हे वाक्‍य म्हणायला कितीही आकर्षक वाटत असलं तरी प्रत्यक्षात नावात बरंच काही असतं. नातेवाईकातल्या एका मुलीचं लग्न होतं. लग्नपत्रिका मिळाली. वराचं नाव वाचलं. तेजेंद्र उर्फ बंडू आणि कंसात नाना. नावाखाली एम एस ई बी असं लिहिलेलं.

एक red wine नातं!

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 30/06/2017 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
ती त्याच्याहून साधारण आठ वर्षांनी मोठी. तिच लग्न झाल होत. एक मुलगा आणि प्रेमळ नवरा असा सुखी संसार. पण तरीही त्याची आणि तिची झक्कास मैत्री होती. दोस्ती झाली तेव्हा नुकतेच इंटरनेट सुरु झाले होते. भेटण कमी व्हायचं दोघांच. पण याहू मेसेंजरवर खूप गप्पा व्ह्यायच्या. ती त्याला सतत चिडवायची कोणत्या ना कोणत्या मुलीवरून. तो ते एकदम खेळीमेळीने घ्यायचा. अशीच दोघांची दोस्ती वाढत होती. त्याच्या घरी गणपतीला नवऱ्याला आणि लेकाला घेऊन ती गेली होती. तिच्या मनात होतं कदाचित् त्याचे पालक आणि तिचा नवरा असे सगळे मिळून एक कौटुंबिक मैत्री होईल. पण तस काही झाल नाही.

शब्दकोशांच्या मनोरंजक विश्वात

लेखक हेमंतकुमार यांनी शुक्रवार, 30/06/2017 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर नजर जाई. तिथे मोठ्या व आकर्षक अक्षरात ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन लिहिलेले होते. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. मोठे होता होता मी विविध प्रकारचे तीन भाषांतील साहित्य वाचत गेलो आणि एका निष्कर्षाप्रत येउन ठेपलो.

(why is there nothing rather than something ???????)

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 30/06/2017 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

हरणेश्वराय नम:

लेखक सौन्दर्य यांनी बुधवार, 28/06/2017 08:01 या दिवशी प्रकाशित केले.
हरणेश्वराय नम: “जा, दूर हो माझ्या नजरेसमोरून" स्व:ताच्या डोळ्यातील अश्रू पुसत, हुंदके आवरत सीतामाई कडाडल्या. “स्व:ताच्या मोहक रंगरुपाने मला फसवलेस, रावणासारख्या दुष्ट व्यक्तीला मदत केलीस आणि माझ्या नशिबी माझ्या प्रिय पतीचा विरह लादलास त्याबद्दल मी तुला कदापि क्षमा नाही करणार.” “माई, माझी बाजू तर ऐकून घ्या” तो मृगाधीपती सांगण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला मध्येच अडवत सीतामाई पुनः कडाडल्या. “कसली बाजू ? हेच ना की मला तुझ्या रुपाने भुलवलंस, मला मोहात पाडलंस आणि मी मोहात पडले” डोळ्यातील अश्रू पुसत सीतामाई संतापाने ओरडल्या. “जा, आता हेच तुमच्या भाळी लिहिले आहे.

शेजाऱ्याचा डामाडुमा - काही प्रसिद्ध / अप्रसिद्ध नेपाळी व्यक्तिमत्वांची ओळख आणि संदर्भ सूची - नेपाळ भाग ११ (शेवट)

लेखक अनिंद्य यांनी सोमवार, 26/06/2017 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचे भाग येथे वाचता येतील : भाग १० काही प्रसिद्ध / अल्प-प्रसिद्ध नेपाळी व्यक्तिमत्वांबद्दल थोडक्यात : -  अंतिम नेपाळ नरेश - राजे ज्ञानेंद्र “स्वस्ति श्री गिरीराज चक्रचूडामणी नारायणेत्यादि विविध विरुदावली विराजमान मनोन्नत महेंद्रमाला बिरेन्द्रमाला परम-नेपाल-प्रताप-भास्कर परम-ओजस्वी-राजन्य परम-गौराबमया-तेजस्वी-त्रिभुवना-प्रजातंत्र-श्रीपाद परम-उज्ज्वला-किर्तीमया-नेपाल-श्रीपाद

मोरनी बागा मा बोले आधी रात मा - कथा ( काल्पनीक ) -- भाग ३

लेखक सिरुसेरि यांनी सोमवार, 26/06/2017 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
मोरनी बागा मा बोले आधी रात मा - कथा ( काल्पनीक ) -- भाग ३ भाग १ ------ http://www.misalpav.com/node/40043 भाग २ ------ http://www.misalpav.com/node/40076 " काय ? या लोकगीताचे मुळ उगमस्थान हा रानी शरावतीका महल ? ते कसं काय ? " तिघींनीही चकीत होउन विचारले . "वह इक लंबी कहानी है मॅडमजी . वह सुनानेमें थोडा टाईम लगेगा . " गाईड शांतपणे म्हणाला . कहानी म्हणल्यावर तिघींचीही उत्सुकता अजुनच वाढली . "हां तो सुनाईये ना .

आजोळच्या आठवणींची सोनेरी पानं

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 26/06/2017 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
सचिन काळे यांचा 'आठवणींच्या हिंदोळ्यावर' हा लेख आणि पुरवणी लेख वाचल्यानंतर नॉस्टॅल्जिक झाले. गिरगावातल्या आजोळच्या आठवणी मनात जाग्या झाल्या. त्या तुमच्याशी शेअर करते आहे. आजोळच्या आठवणींची सोनेरी पानं आपल्या सर्वांच्याच लहानपणच्या आजोळच्या अशा काही ना काही आठवणी असतात. मामाच्या गावाला झुकझुक गाडीतून जातानाच गाण तर आपण सर्वानीच लहानपणी अनेकदा म्हंटल असेल. माझ्या बाबतीत सांगायचं तर माझं आजोळ गिरगावातल आणि माझा जन्म उपनगरातला. त्यामुळे आम्ही खरच कायमच लोकलने चर्नीरोडला उतरून मग चालत  जायचो सिक्का नगरला. आजोळी  माझी आज्जी, आजोबा, दोन मामा आणि एक मामी असे सगळे राहायचे.