नावात बरंच काही असतं!
- डॉ. सुधीर रा. देवरे
नावात काय आहे, असं म्हटल्याबरोबर आपल्याला शेक्सपिअर हे नाव आठवतं. हो, फक्त नावच आठवतं. कारण शेक्सपिअर नावाची व्यक्ती कोणी पाहिली? निदान मी तरी नाही. व्यक्तीच काय पण शेक्सपिअरचं छायाचित्रही मी अद्याप पाहिलं नाही. आपण पाहतो ते शेक्सपिअरचं चित्र आहे. असो. म्हणजे नावात काय आहे, हे वाक्य म्हणायला कितीही आकर्षक वाटत असलं तरी प्रत्यक्षात नावात बरंच काही असतं.
नातेवाईकातल्या एका मुलीचं लग्न होतं. लग्नपत्रिका मिळाली. वराचं नाव वाचलं. तेजेंद्र उर्फ बंडू आणि कंसात नाना. नावाखाली एम एस ई बी असं लिहिलेलं.
मिसळपाव