Skip to main content

लेख

लग्नविधी आणि इतर विधी (भाग: दोन)

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 01/06/2018 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे विधी संज्ञेचे लग्न विधी आणि इतर विधी असे भाग करावे लागतील. ग्रामीण विधींमध्ये अनेक अंधश्रध्दा आढळत असल्या तरी ग्रामीण विधींतूनच भाषेला अनेक नवीन शब्द, वाक्‍प्रचार, म्हणी मिळलेल्या आहेत. लोकपरंपरा आणि विधी जसजश्या नष्ट होऊ लागतात तशा भाषेतील अनेक संज्ञा, वाक्प्रचार, म्हणी यांचाही अस्त होऊ लागतो. ग्रामीण भागातील लग्न विधी परपरेत खालील गोष्टींचा समावेश होतो.

बाबा नव्हताच तिथे .....

लेखक अनाहूत यांनी शुक्रवार, 01/06/2018 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नातही मला कायकाय सुचत , मी सायंटिस्ट असते तर माझे बहुतेक शोध स्वप्नातून जागी झाल्यावरच लागले असते . आताही किती भारी सुचलंय मला . हे आधी बाबाला सांगते त्याला हे फार आवडेल आणि त्याचही तो काहीतरी सुचवेल . बाबा, अरे बाबा कुठे आहेस ? घरभर फिरून आले पण बाबा नव्हताच तिथे . अरे मी काय शोधतेय , बाबा तर किती वर्ष झाली सोडून गेलाय आपल्याला .... कायमचा . मला का आठवलं नाही . का बाबा सोडून दुसरं काही आठवल नाही . असच आहे . मला असं काही सुचलं कि फक्त बाबा हवा असतो बाकी काही नाही . पण आता तो नाही . पण असं कस होईल .

फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : ५

लेखक रा.म.पाटील यांनी बुधवार, 30/05/2018 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
फेस्टिव्हल डायरीज ..!! (Decorate Your Love) : कथा - ५ लग्न.. ( प्रेमाची सप्तपदी..) सर्व उपस्थित लोकांच्या नजरा नव्या नवरीवर खिळल्या जेव्हा नवरीने हॉलमध्ये प्रवेश केला आणि त्याची नजर मात्र नवरीमागून येणाऱ्या एका करवलीवर.. हीच का ती त्याच्या आयुष्याच्या पिक्चरची हिरॉईन.. स्पीकरवर गाणे लागले होते.. 'तुम्हे जो मैने देखा, तुम्हे जो मैने जाना, जो होश था, वो तो गया..' त्याला हवे तसेच ते गाणे.. न तिची एन्ट्री..

आकाश के उस पार भी आकाश है

लेखक पुष्कर यांनी बुधवार, 30/05/2018 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला असा कधी प्रश्न पडला आहे का, की माणूस नेहमी सगळ्या वस्तूंना ठराविक आकारच का देतो? आमची घरे चौकोनी असतात. आमची पुस्तके चौकोनी, संगणकसुद्धा एका विशिष्ट आकाराचा; सगळीकडे चौकोन, आयत, त्रिकोण, गोल हेच आकार. आम्ही एखादे वेळी त्रिकोण किंवा पिरेमिड बांधतो. पण पृथ्वीवर सगळीकडे जमीन उंच-सखल आहे, आम्ही ती सपाट करून टाकतो. खोल भागात भराव टाकतो, डोंगर फोडून काढतो. पण सृष्टी अशी कुठे आहे? कुठला डोंगर अगदी बरोबर त्रिकोणी अथवा शंकू आकाराचा असतो? ढगांना कधी विशिष्ट आकार असतो का? आपले हात, पाय, नाक, डोळे, सगळेच वेगळे आकार. हे आकार आपण भूमितीमध्ये शिकतच नाही.

औषधशास्त्र, औषधे, वैद्यक: २

लेखक सुधीर कांदळकर यांनी बुधवार, 30/05/2018 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
हिपोक्रेटस इ.स.पू. ४६० मध्ये जन्माला आला तर सुश्रुत इस.पू. सुमारे ६०० वर्षे. म्हणजे सुश्रुत हा कालक्रमाने हिपोक्रेटसच्याही अगोदरचा आहे. महाभारतातील एका उल्लेखाप्रमाने सुश्रुत हा विश्वामित्र ऋषींचा पुत्र होय. सुश्रुतसंहिता या ग्रंथाचा आजही आदराने उल्लेख केला जातो. सुश्रुतसंहितेत १८४ श्लोक आहेत . त्यात ११२० व्याधींचे तसेच ७७० औषधी वनस्पतींचे वर्णन आहे. ६४ खनिज स्त्रोत असलेल्या औषधांचे आणि ५७ प्राणीस्रोत असलेल्या औषधांचे वर्णन आहे. शस्त्राने शरीराचा छेद घेणे, टोचणे, शरीरात घुसलेली बाह्य वस्तू बाहेर काढणे, जखम चिघळू नये किंवा बरी व्हावी म्हणून रसायनांच्या साहाय्याने चटका देणे इ.

रम्य ते बालपण- आंब्याचा सिझन

लेखक OBAMA80 यांनी मंगळवार, 29/05/2018 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
आंबा या शब्दांतच मला फार रस आहे. सर्व फळांचा हा राजा. त्यात देवगडचा/रत्नागिरी हापूस म्हणजे जणू चक्रवर्ती सम्राटच. केसरी, तोतापूरी, पायरी, बैंगनपल्ली इ. बाकीच्या आंब्याच्या जाती या सम्राटाचे जणू मांडलिक राजेच. उन्हाळ्यात दिग्वीजयाला निघालेला हा सम्राट पुण्या-मुंबईतच श्रीमंताचा पाहुणचार करत रमायचा. सोलापूरसारख्या कोकणापासून दूर रहाणार्‍या आम्हां सामान्य जनतेला आमच्या लहानपणी याची फारच वाट पहावी लागायची. सामान्य जनतेला हा सम्राट फारच “महाग” होता.

न्याय .... कलियुगातला

लेखक Jayant Naik यांनी गुरुवार, 24/05/2018 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
न्याय – कलियुगातला. स्थळ: सम्राट सूर्यकेतू यांचा दरबार. काळ: इंग्रजांचे भारतात राज्य यायच्या थोड्या आधीचा काळ. सम्राट सूर्यकेतू गंभीर पणे न्यायाधीश राजकुमार रवीन्द्रना म्हणाले, “ राजकुमार आपली न्यायाधीश पदी नेमणूक झाल्यापासून येव्हडा सर्वाना संभ्रमित करणारा विवाद समोर आला नव्हता.. काल आपण वादी आणि प्रतिवादी या दोघांची बाजू ऐकून घेतली. दोन्ही बाजूंच्या साक्षी पण संपल्या आहेत. आता आपण निर्णय देण्याची वेळ आली आहे.

मा.ल.क.-२

लेखक शाली यांनी बुधवार, 23/05/2018 06:03 या दिवशी प्रकाशित केले.
एका गावातुन दुसऱ्या गावात जायचे असल्यास मधले काही मैलांचे जंगल पार करुन जावे लागत असे. जंगलातुन जाणारा रस्ता अतिशय सुंदर होता. घनदाट वनराई, मधेच गवताळ कुरणे, विस्तिर्ण जलाशय, लहाण-मोठ्या टेकड्या. पण रस्ता कितीही सुंदर असला तरी निर्जन होता. त्यामुळे वाटमारी करणाऱ्यांचा हा आवडता परिसर होता. गावातुन रस्ता ज्या ठिकाणी जंगलात शिरायचा तेथे एक टुमदार धर्मशाळा होती. कारण कुणालाही जंगल पार करायचे असले की तो या धर्मशाळेत थांबे. सकाळपर्यंत दोघे-चौघे जमा होत. मग एकमेकांच्या सोबतिने जंगल पार केले जाई. एकट्याने जायची सोयच नसायची दरोडेखोरांमुळे. आषाढाचे दिवस होते.

दूर देशी गेला बाबा....विडंबन

लेखक OBAMA80 यांनी रविवार, 20/05/2018 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
माननीय सलीलजी कुलकर्णी व संदीपजी खरे यांची माफी मागून, माझ्या एका अत्यंत आवडीच्या त्यांच्याच गाण्यावर माझे विडंबन सादर करत आहे. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- गीतकार : संदीप खरे, गायक : सलील कुळकर्णी दूरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई नीज दाटली डोळ्यांत परी घरी कुणी नाही कसा चिमणासा जीव, कसाबसा रमवला चार भिंतीत धावून दिसभरं दमवला आता पुरे, झोप सोन्या कुणी म्हणतच नाही नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी कोणी बोलायाला ना

ग्रामीणांचे लग्नसोहळे (भाग:एक)

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 16/05/2018 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे आधी ‍तीन दिवसांचा लग्न समारंभ व्हायचा. तो आज दोन दिवसांवर आला. लग्नाची तारीख धरली की आधी सर्व भाऊबंद बस्त्याचा दिवस नक्की करायचे. भाऊबंदांना गोळा करून तालुक्याच्या गावी मोठ्या कापडाच्या दुकानात बस्त्याला जायचं. बस्ता म्हणजे नवरा नवरीसाठी घेतले जाणारे नवे कपडे. या बस्त्यात पहिल्यांदा फडकी नावाचं कापड खरेदी करायची परंपरा होती. ती आता नामशेष झाली आहे. बाकी बस्त्यात वराला दोन पोषाखांचे कापड, नवरीला पाच साड्या, परकर, झंपरचे कापड, वरमायांसाठी लुगडे, सुख्यासाठी कापड, टॉवेल, उपरणे – टोप्या आदी कापडे बस्त्यात असायचे. पूर्वी गावात तीन दिवसांचे लग्न असायचे.